10 सप्टेंबरचं 2019,वृषभ राशीच्या लोकांना मिळणार मानसन्मान आणि भेटवस्तू

10 सप्टेंबरचं 2019,वृषभ राशीच्या लोकांना मिळणार मानसन्मान आणि भेटवस्तू

मेष - दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमवाल

आज तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरममुळे निराश व्हाल. दुर्लक्षपणा केल्याने एखादी  चांगली संधी गमवण्याची शक्यता आहे. नात्यातील ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. धुर्त लोकांपासून सावध रहा.


कुंभ - अचानक धनलाभाचा योग आहे

आज तुम्हाला अचानक धनलाभ मिळण्याचा योग आहे. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्ती मिळेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी प्रेमाने वागा. वाहन चालवताना सावध राहा. घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. 


मीन - विवाहात अडचणी येण्याची शक्यता आहे

आज तुमचे जोडीदाराशी भावनिक नाते निर्माण होणार आहे. विवाहातील अडचणी दूर होतील. कामाच्या ठिकाणी अधिकारी कौतुक करणार आहेत. पदोन्नतीची शक्यता आहे. राजकारणातील स्थान मजबूत होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. 

 

वृषभ - मानसन्मान आणि  भेटवस्तू मिळतील

आज तुम्हाला रखडलेले पैसे परत मिळणार आहेत. मानसन्मान आणि भेटवस्तूत वाढ होईल. राजकारणातील पकड मजबूत होणार आहे. पदोन्नतीची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळेल. 


मिथुन - नवीन प्रोजेक्ट सुरू करताना सावध रहा

आज कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमचा  तणाव वाढवणार आहेत. नवीन कामाला सुरूवात करताना सावध रहा. विरोधकांपासून स्वतःचा बचाव करा. तुम्ही आज एखाद्याला स्वतःकडे आकर्षित करणार आहात. कौटुंबिक वाद लवकर सुटणार आहेत. 


कर्क - वृद्धांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता

आज घरातील वृद्ध व्यक्तीचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येतील. वादविवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक खर्च वाढणार आहे. मित्रांशी भेट झाल्याने उत्साह वाटेल. घराबाबत असलेला वाद लवकर सुटणार आहे. 


सिंह - एकटेपण दूर होईल

आज तुमचे एकटेपण दूर होणार आहे. एखाद्याबाबत प्रेमाची भावना मनात निर्माण होईल. व्यवसायात राजकारणाची साथ मिळू शकते. नवीन कामांमुळे पदोन्नती आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत रोमॅंटिक आणि अविस्मरणीय प्रवास घडेल.


कन्या - क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी मिळेल

आज विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी मिळेल. व्यावसायिक कामात चांगले यश मिळेल. रचनात्मक कार्यातील लोकांचा विशेष सन्मान होण्याची शक्यता आहे. 


तूळ - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता 

आज तुम्ही कमी वेळात जास्त फायद्याच्या एखाद्या योजनेत फसणार आहात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढउतार येतील. कर्ज घेणे शक्य असल्यास टाळा. आत्मविश्वास कमी राहील. कौटुंबिक सहकार्य मिळणार आहे. 


वृश्चिक -  मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल

आज तुम्हाला फ्रेश आणि हलकं वाटणार आहे. मानसिक ताणापासून मुक्तता मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. एखादी वाईट बातमी  ऐकल्यामुळे प्रवास करावा लागेल. 


धनु - प्रेमात निराशा मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला प्रेमात अपयश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय अथवा नोकरीत समस्या येतील. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. वाहना चालवताना सावध रहा. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल.


मकर - आईची तब्येत बिघडण्याची शक्यता

आज तुमच्या आईच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे तुम्ही निराश होणार आहात. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. खऱ्या प्रेमाचा शोध घेणार आहात. एखाद्या क्रीडा स्पर्धेत यश मिळेल. देणीघेणी सावधपणे करावी लागतील.

अधिक वाचा

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

Bappa ला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार दाखवा हा नेवैद्य