13 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना धनलाभ

13 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना धनलाभ

मेष - जोडीदाराला पायदुखीचा त्रास जाणवेल

आज तुमच्या जोडीदाराला पायदुखीचा त्रास जाणवणार आहे. दिवसभर कामात व्यस्त असाल. भावंडांचे सहकार्य मिळेल. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. प्रेमात यश मिळेल. 


कुंभ - आईचा हेल्थ रिपोर्ट चांगला असेल

आज तुमच्या आईचा हेल्थ रिपोर्ट चांगला असेल. घरात  आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सामाजिक संस्थेद्वारा मानसन्मान मिळणार आहे. व्यवसायातील योजना यशस्वी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. 


मीन - वडीलांशी वाद होण्याची शक्यता

आज तुमचा तुमच्या वडीलांशी वाद होण्याची शक्यता आहे. नवीन मित्रांशी सावधपणे वागा. भागिदारापासून दूर राहा. विरोधक उघडपणे आव्हान देणार आहेत. भावनिक छळ होण्याची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 

 

वृषभ - नवीन योजनांची सुरूवात कराल

आज प्रॉपर्टीचा वाद संपण्याची शक्यता आहे. नवीन योजनेला सुरूवात कराल. खाजगी कामांसाठी प्रवास करावा लागेल. जोखिमेच्या कामांपासून दूर रहा. प्रेमसंबंध सुधारण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. 


मिथुन -  नातेसंबंध मजबूत होतील

आज तुमच्यासाठी दिवस आनंदाचा असेल. कौटुंबिक नातेसंबंध मजबूत होतील. एखादे महत्त्वाचे काम आज तुम्ही पूर्ण करणार आहात. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. 


कर्क -  चांगली संधी गमवाल

आज तुमच्या आळशी स्वभावामुळे तुम्ही एखादी चांगली संधी गमावणार आहात. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून तणाव मिळू शकतो. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. भावंडांच्या आरोग्याची काळजी घ्या. 


सिंह - सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू मिळतील

आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू मिळणार आहेत. नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. रचनात्मक कार्यातून मानसन्मान आणि धनसंपत्ती मिळेल. पदोन्नती मिळण्याची संधी मिळेल. परदेशी जाण्याचा योग आहे. 


कन्या - नवीन काम सुरू कराल

आज तुम्ही एखादे नवे काम सुरू करणार आहात. कामाच्या ठिकाणी वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 


तूळ - मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे

आज तुमच्या मुलांना दातदुखीचा त्रास होऊ शकते. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कार्यात दुर्लक्षपणा करू नका. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक - खरे प्रेम मिळण्याची शक्यता

आज तुम्ही स्वतःहून इतरांना मदत करणार आहात. सामाजिक स्थान वाढण्याची शक्यता आहे. नवीन लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. आज तुम्हाला तुमचे प्रेम मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. 


धनु - नवीन कामे मिळणार आहेत

आज तुमचा दिवस चांगला असेल. आज तुम्ही जे काम सुरू करणार आहात ते काम वेळेच्या आधी पूर्ण होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रयत्नांची नवी  दिशा मिळेल. एखाद्या राजकीय पक्षात जाण्याची संधी मिळेल. नवीन कामे मिळणार आहेत. 


मकर -  फसवणूक होण्याची शक्यता आहे

आज तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. फसवणूक होण्याची शक्यता आहे. दिखावा करण्याच्या प्रयत्नात कर्जबाजारी व्हाल. देणी-घेणी सांभाळून करा. जवळच्या लोकांची चांगली साथ मिळेल. रखडलेली  कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम असेल. 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

राशीनुसार निवडा तुमचे करिअर