16 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ

16 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ

मेष - धनसंपत्तीबाबत वाद होण्याची शक्यता

आज पैशांबाबत आज वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील कामे रखडण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. एखादे काम पूर्ण झाल्यामुळे सामाजिक सन्मान मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 


कुंभ - मैत्रीचे रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता

आज एखाद्या खास व्यक्तीबद्दल प्रेमाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबतीत तुम्ही आज एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहात.  


मीन - यश मिळण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला एखाद्या खास कामात यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी  तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे लाभ मिळेल. व्यावसायिक कामत तुमची प्रशंसा होणार आहे.रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 


वृषभ -आरोग्य उत्तम राहणार आहे

आज तुमचेआरोग्य चांगले असणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. रोमांटिक जीवनात आजचा दिवस अविस्मरणीय असेल. प्रवास रोमांचक असेल. 


मिथुन - मानसिक कष्ट होतील

आज तुमच्या जोडीदाराकडून मानसिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. अधिकारी आणि मित्रांसोबत विनाकारण वाद घालू नका. उत्पन्न वाढणार आहे. देणीघेणी सांभाळून करा. व्यावसायिक भागिदारासोबत वाद होण्याची शक्यता 


कर्क - घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी वाढेल

आज तुम्हाला घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी वाढणार आहे. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधीत समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ मिळणार आहे.

सिंह -  अचानक धनलाभ मिळणार आहे

आज तुम्हाला व्यवसायातील गुंतवणूकीतून नफा मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी उत्पन्न वाढणार आहे. राजकारणातील महत्त्वकांक्षा पूर्ण होतील. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. परदेशी जाण्याचा योग आहे. 


कन्या - बिघडलेले संबंध सुधारणार आहेत

आज कुटुंबातील लोकांच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका. जोडीदाराशी बिघडलेले संबंध सुधारणार आहेत. कामाच्या ठिकाणी विरोधकांसोबत नम्रपणे वागा. मित्रांसोबत लॉंग ड्राईव्हला जाल. व्यावसायिक भागिदारीत फायदा होईल.


तूळ - विद्यार्थ्यांचे अभ्यासात दुर्लंक्ष होणार आहे

आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात दुर्लंक्ष होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढउतार येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण दगदग होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातील रस वाढणार आहे. मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होणार आहे. 

 

वृश्चिक - रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता

प्रॉपर्टीतील खरेदी विक्रीत फायदा होणार आहे. रखडलेली धनसंपत्तीत मिळणार आहे. व्यवसायात राजकारणी लोकांची मदत मिळेल. महत्त्वपूर्ण कामातील रखडडेली कामे पूर्ण होणार आहेत. संबंध चांगले होणार आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील गोडी वाढणार आहे. 


धनु - व्यवसायातील आव्हाने वाढणार आहे

आज व्यवसायातील तुमची आव्हाने वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी घाई आणि दुर्लक्ष केल्यामुळे चुका होतील. अधिकारी नाराज होण्याची शक्यता आहे. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळणार आहे. 


मकर - मानसिक ताणतणाव वाढणार आहे

आर्थिक समस्यांमुळे मानसिक ताणतणाव वाढणार आहे. जोडीदाराची साथ आणि सहवास मिळणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. सामाजिक संस्थेद्वारा सन्मानित होणार आहे. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. 

अधिक वाचा

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव