18 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीचा मानसिक ताण होईल दूर

18 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीचा मानसिक ताण होईल दूर

मेष - प्रेमयुगूलांना प्रेमात मिळेल यश

आज प्रेमयुगूलांना प्रेमात यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नियोजित लक्ष्य साध्य करणे सोपे जाईल. व्यवसायातील भागिदारीतून फायदा मिळेल. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. प्रवासाला जाण्याचा योग आहे.


कुंभ - महत्त्वपूर्ण कामात आळस करू नका

आज एखाद्या महत्त्वाच्या कामाचा आळस करू नका. अचानक प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भटकणार आहे. आत्मविश्वासात कमी जाणवेल. कोर्ट कचेरीसाठी दगदग करावी लागेल. 


मीन - संशयीवृत्ती आणि ताणतणावापासून दूर राहा

आज तुम्ही तुमच्या संशयवृत्तीपासून दूर राहा. विनाकारण आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध मजबूत असतील. 


वृषभ - विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता

आज उच्च शिक्षण आणि अभ्यासात विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. मुलांच्या यशामुळे  घरात आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी रचनात्मक कामे करून तुम्ही स्वतःची वेगळी छाप सोडणार आहात. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.


मिथुन - व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता 

आज एखादी महागडी वस्तू खराब झाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. टीकेपासून दूर राहा. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. विरोधक नमणार आहेत. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता  आहे. 


कर्क - मानसिक तणाव दूर होईल

आज तुमचा मानसिक तणाव दूर होणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. व्यवसायातील देणीघेणी यशस्वीपणे पार पाडाल. विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. उत्पन्न आणि खर्चावर समतोल राखण्याचा प्रयत्न करा. 


सिंह - प्रेमसंबंधात अपयश मिळण्याची शक्यता

आज तुमच्या प्रेमसंबंधात तुम्हाला अपयश येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक देणीघेणी सांभाळून करा. घरात वेळ न दिल्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात कलह निर्माण होऊ शकतात. सध्या प्रवास करणे टाळा. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.


कन्या - जोडीदाराला पायदुखीचा त्रास होण्याची शक्यता

आज तुमच्या जोडीदाराला पायदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सावधगिरी बाळगा. कोर्टकचेरीत यश मिळेल. कामातील कौशल्याने अधिकाऱ्यांना खुश कराल. पदोन्नतीची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. 


तूळ-  रखडलेले पैसे परत मिळतील

आज तुम्हाला व्यवसायात फायदाच फायदा होईल. रखडलेले धन परत मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान आणि धनवृद्धी होईल. जोडीदाराची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्या येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.


वृश्चिक - एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल

आज तुमची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होणार आहे. नियोजित काळात लक्ष साध्य करण्यात विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यवसायातील कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. देणीघेणी सांभाळून करा. 


धनु - नवीन काम सुरू करणे टाळा

आज कोणतेही नवे काम सुरू करू नका. कामाच्या  ठिकाणी तुमच्यावर टीका झाल्याने घाबरून काम सोडण्याचा विचार कराल. मन निराश आणि असमाधानी असेल. वादविवादांपासून दूर राहा. धार्मिक कार्यातील रस वाढेल. 


मकर - रखडलेले पैसे परत मिळतील

आज तुम्हाला भाग्योदयाची संधी मिळेल. प्रॉपर्टीचे वाद मिटणार आहेत. नवीन ओळखीतून व्यवसायाची वाढ होण्याची शक्यता आहे. जवळच्या लोकांना वेळ द्या. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. रचनात्मक कार्यातून प्रगती होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात