20 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक वातावरण आनंदाचे

20 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक वातावरण आनंदाचे

मेष - लक्ष्य प्राप्तीसाठी कठीण मेहनत घ्यावी लागेल

आज तुम्हाला लक्ष्य प्राप्तीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे.  मुलांकडून एखादी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 


कुंभ - कामाच्या ठिकाणी समस्या वाढतील

आज तुम्हाला मुलांचे करिअर आणि  चिंता सतावणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन टेकनिकमुळे त्रास जाणवेल. त्वरीत लाभ मिळवण्यासाठी तडजोड कराल. देणी घेणी सुधारण्याची शक्यता आहे. 


मीन -  उत्पन्नाचे साधन वाढेल

आज उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. पैशांबाबत एखादी आनंदवार्ता मिळेल. व्यावसायिक विस्तार आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. आत्मविश्वास वाढेल. भावनिक संबंधांमध्ये जवळीक  वाढण्याची शक्यता आहे. रचनात्मरृक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. 


वृषभ - मनात अज्ञात भिती निर्माण होण्याची शक्यता

आज घरातील काही समस्यांमुळे मनात अज्ञात भिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जोखिम घेणे टाळा. व्यावसायिक भागिदारी फायद्याची ठरेल. रचनात्मक कार्यात वाढ होईल. जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल. 


मिथुन - कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल

आज एखाद्या जुन्या नात्याविषयी मनात विशेष भावना जागृत होतील. कौटुंबिक वातावरण सुखाचे आणि आनंदाचे असेल. घरातील लोकांना वेळ द्या. नातेसंबंध दृढ होणार आहेत. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची असलेले मतभेद दूर होतील. 


कर्क - नोकरीचा शोध संपण्याची शक्यता

आज बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. 


सिंह -  एखादे काम रद्द होण्याची शक्यता 

व्यवसायात मेहनत करूनही मनासारखा परिणाम दिसणार नाही. एखादे काम रद्द होण्याची शक्यता आहे. एखादी महागडी वस्तू खरेदी करणे टाळा. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


कन्या - आरोग्य सुधारण्याची शक्यता

आज तुम्हाला प्रसन्न आणि ताजे वाटणार आहे. आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य असेल. काम वेळेत पूर्ण करा. आर्थिक बाबतीत सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


तूळ - प्रेमात त्रिकोण निर्माण होण्याची शक्यता

आज तुम्हाला प्रेमात त्रिकोण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. संपत्तीबाबत नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मनाविरूद्ध कामे करावी लागतील. मुलांकडून समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक - तणावामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे 

घरात ताणतणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तणावामुळे तुमचे आरोग्य बिघडणार आहे. कामाच्या ठिकाणी काम करणे कठीण  जाणार आहे. व्यावसायिक भागिदारीतून फायदा होईल.धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 


धनु - दिलेले  पैसे परत मिळण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला उधारी परत मिळणार आहे. व्यवसायातील एखाद्या कामाचा फायदा होईल. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातील सहभाग वाढणार आहे.. जोडीदारासोबत नातेसंबंध दृढ होतील. 


मकर - प्रिय व्यक्तीकडून उपहार मिळतील

आज प्रिय व्यक्तीची भेट होणार आहे. जोडीदाराकडून सरप्राईझ मिळेल. राजकारणातील रस वाढणार आहे. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सन्मान मिळण्याची  शक्यता आहे. 

अधिक वाचा

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार निवडा तुमचे करिअर