23 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ

23 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ


मेष - नात्यात कटूपणा येईल

आज तुमच्या नात्यात कटूपणा येण्याची शक्यता आहे. मिळून मिसळून राहिल्यास आनंद मिळेल. मनात शांती आणि प्रसन्नतेची भावना निर्माण करा. सुखसुविधांमध्ये वाढ होणार आहे. धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल. 

कुंभ - पायाच्या दुखण्याने हैराण व्हाल

आज तुम्हाला पायाचे दुखणे जाणवणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची नवीन संधी मिळेल. घरात मंगल कार्य घडणार आहे. 


मीन - अचानक धनलाभ होण्याचा योग

आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. व्यावसायिक कार्यात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदारीने वागल्यामुळे कौतुक होईल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. 


वृषभ - कामाच्या ठिकाणी समस्या वाढतील

आज तुमच्या राजकारणातील समस्या वाढणार आहेत. कामाच्या ठिकाणी समस्या वाढणार आहेत. मामाकडून चांगली बातमी मिळेल. कोर्टकचेरीतून समस्या सुटणार आहेत. नवीन मित्र तयार कराल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. 


मिथुन - धनलाभ होण्याची शक्यता

आज तुम्हाला जोडीदाराकडून धनसंपत्ती मिळणार आहे. कौटुंबिक सुखसाधनांमध्ये वाढ होईल. व्यावसायिक कामे रद्द होतील. रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. विद्यार्थ्यांना खेळात विशेष यश मिळेल.  


कर्क - अभ्यासात समस्या येतील

आज तुमच्या अभ्यासात अडचणी येण्याची शक्यता आहे. आवश्यक कामे करण्यासाठी वेळ द्या. नोकरीसाठी घरापासून दूर जावे लागेल. कौटुंबिक मतभेद वाढण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. 


सिंह - त्वचेबाबत समस्या निर्माण होतील

आज त्वचेबाबत समस्या निर्माण होणार आहेत. प्रियकर नाराज होतील. एखादा आनंदवार्ता समजेल. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. मित्रांसोबत भेटीगाठी वाढतील. व्यावसायिक प्रवास सुखकर होईल. 


कन्या - अविवाहितांसाठी अनुकूल काळ 

अविवाहितांसाठी अनुकूल काळ आहे. सहकाऱ्यांना समस्या दूर करण्यात यश मिळेल. प्रतिष्ठित लोकांशी जवळीक वाढेल. आत्मविश्वास मजबूत होईल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. 


तूळ-  नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता

आज नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. राजकारणात एखाद्या पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. वादविवादांपासून दूर राहा. एखादे जुने काम केल्यामुळे आत्मविश्वास आणि सामाजिक सन्मान वाढण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक - व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता 

व्यवसायात उत्पन्न वाढेल मात्र समस्या वाढतील. व्यवसायातील पैसा डूबण्याची शक्यता आहे. जोखिमेच्या कामांपासून दूर राहा. व्यवहाराच्या समस्या सुटतील. जोडीदाराची साथ आणि मदत मिळेल. 


धनु - मन उत्साहित आणि आनंदी राहील

आज तुमचे मन उत्साहित आणि आनंदी राहील. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात दिवस घालवाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळेल. महत्त्वपूर्ण रखडलेली कामे पूर्ण करा. वाहन चालवताना सावध राहा. 


मकर - कौटुंबिक वाद होण्याची शक्यता

कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक गोष्टी करताना सावध राहा. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. धार्मिक कार्यात रस वाढेल. उत्पन्नाचे नवे साधन मिळण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'