26 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांच्या धनसंपत्ती होणार वाढ

26 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांच्या धनसंपत्ती होणार वाढ

मेष - जोडीदारासोबत तणाव वाढण्याची शक्यता

आज तुमच्या जोडीदारामुळे तुमचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. मुलांमुळे चिंता वाढू शकते. कामाच्या ठिकाणी बदल होण्याचे संकेत आहेत. व्यावसायिक कामात यश मिळण्याचा योग आहे. धार्मिक कार्यातील रस वाढेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. 


कुंभ - एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता 

तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. तुमची एखादी वस्तू हरवण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करू नका. विद्यार्थ्यांना यश मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. देणी-घेणी सांभाळून करा. 


मीन - मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल

मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळेल. रोजच्या कामे करण्यात उत्साहित व्हाल. भौतिक सुखसाधनांमध्ये वाढ होईल. नातेसबंधात जवळीक वाढेल. उत्पन्नाची नवीन साधने वाढणार आहे. कोर्ट कचेरीत यश मिळणार आहे.


वृषभ - डोळ्यांच्या समस्या येण्याची शक्यता

आज तुमच्या डोळ्यांच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढू शकते. आर्थिक स्थितीत प्रगती होईल. वाहन चालवताना सावध राहा. जोडीदारासोबत मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 


मिथुन - संपत्ती खरेदी करण्याची शक्यता 

आज तुमच्या धनसंपत्तीत वाढ होऊ शकते. एखादी चल- अचल संपत्ती खरेदी कराल. नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत झालेली भेट सुखद असेल. व्यवसायात राजकारणाची मदत मिळेल. 


कर्क - भावंडांचा गैरसमज दूर होईल

आज तुमच्या भावंडांमधील गैरसमज दूर होणार आहे. जोडीदारासोबत प्रवासाचा बेत आखाल. नवीन व्यावसायिक भागिदाराशी भेट होईल. कोर्ट कचेरीत यश मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.


सिंह - व्यवसायातील कामे रद्द होण्याची शक्यता

आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. व्यवसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने समोर येतील. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. 


कन्या - अचानक धनलाभाचा योग आहे

अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज पदोन्नतीचा योग आहे. व्यावसायिक कामांसाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनात वाढ होऊ शकते. आई-वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्या. 


तूळ - विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील

आज कामाच्या ठिकाणी विनाकारण समस्या येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीसोबत जवळीक वाढेल. आईवडीलांच्या तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक स्थिती मजबूत असेल. 


वृश्चिक - शारीरिक थकवा आणि आळस जाणवेल

आज तुमची विनाकारण  दगदग होईल. शारीरिक थकवा आणि आळस जाणवणार आहे. उत्पन्नातील संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी आणि आनंद मिळेल. व्यवसायासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. 


धनु - प्रिय व्यक्तीमध्ये मन गुंतेल

आज तरूणांच्या जीवनात प्रेम प्रकरण निर्माण होऊ शकते. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीसोबत नातेसंबंध अधिक दृढ होतील. भविष्यातील योजनांमुळे त्रस्त व्हाल. आर्थिक स्थितीत सुधारणा येण्याची शक्यता आहे. 


मकर - नोकरीचा शोध पूर्ण होईल

आज तुमच्या नवीन नोकरीचा शोध पूर्ण होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. एखाद्या संस्थेकडूम सन्मान मिळेल. धार्मिक कार्यात वाढ होण्याची शक्यता आहे. एखादी भेट लाभदायक ठरेल. 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’ 

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी