27 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या धनसंपत्ती वाढ

27 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या धनसंपत्ती वाढ

मेष - दीर्घ आजारपणातून सुटका मिळेल

आज तुमचा एखादा जुना आजार बरा होईल. सामाजिक आणि राजकारणातील कामात व्यस्त राहणार आहात. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. 


कुंभ -  रखडलेली कामे पूर्ण होतील

आज व्यवसायातील एखादा महत्त्वाचा निर्णय घेणे सोपे जाईल. रखडलेली कामे जलद गतीने पूर्ण होतील. उत्पन्नाचे साधन वाढणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. सामाजिक मानसन्मानात वाढ होईल. 


मीन - आज नात्यात व्यवहार करू नका

आज नात्यात व्यवहार करू नका. प्रवासात क्रेडिट अथवा डेबिट कार्ड चोरीला जाण्याची शक्यता आहे. काम करताना सावध राहा. पैशांसंबंधीत समस्या येण्याची  शक्यता आहे. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. राजकारणात आव्हाने येण्याची शक्यता आहे. 


वृषभ - प्रेम प्रस्ताव मिळेल

आज तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून प्रेमप्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या अप्रिय व्यक्तीची भेट त्रासदायक ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा. एखादी वाईट बातमी ऐकल्यामुळे प्रवास करावा लागेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


मिथुन - रक्तातून युरिन इनफेक्शन होण्याची शक्यता

आज तुम्हाला युरिन इनफेक्शन होण्याची शक्यता आहे. दिवसभ कामासाठी दगदग करावी लागेल. कौटुंबिक भावनिक साथ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


कर्क - धनसंपत्तीत वाढ होईल

आज तुम्हाला एखादा महागडी भेटवस्तू अथवा धन मिळण्याची शक्यता आहे. दिलेले पेैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत प्रवास सुखकर असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. 


सिंह - जबाबदाऱ्या पूर्ण होतील

आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात. तुमच्या नात्यातील मधुरता येईल. व्यवसायात राजकारणाची मदत होईल. विरोधक नमणार आहे. देणी घेण्याचे प्रश्न सुटणार आहेत.


कन्या - व्यवसायातील कामे रद्द होऊ शकतात

आज तुम्ही तुमच्यावर ईर्ष्या करणाऱ्या लोकांपासून  सावध राहा. कामाच्या ताणामुळे निराश व्हाल. एखादे व्यावसायिक काम रद्द होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. 


तुला - नवीन वाहन खरेदी करण्याचा योग आहे

आज तुम्ही एखादे नवे वाहन खरेदी कराल. रचनात्मक कार्यातून धन आणि मानसन्मान मिळेल. नवीन व्यवसायासाठी प्रयत्न करा यश मिळेल. सामाजिक समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. 


वृश्चिक - कामाच्या ठिकाणी ताण वाढण्याची शक्यता

आज तुम्ही कस्टमर सर्व्हिसशी निगडीत कामामुळे त्रस्त होणार आहात. कामाच्या ठिकाणी तुमचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. खोटं बोलून स्वतःचे काम काढून घेण्याचा प्रयत्न करू नका. जोडीदाराशी नाते सुधारणार आहे. पैशांसंबधी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. 


धनु - त्वचेचं इनफेक्शन होण्याची शक्यता

आज तुम्हाला आरोग्याबाबत तक्रारी जाणवणार आहेत. कडक उन्हात फिरल्यामुळे त्वचेला इनफेक्शन होऊ शकतं. आजचा दिवस आनंदाचा असेल.नवीन घराचं पझेशन मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. 


मकर - प्रेमाची जाणिव होईल

आज तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणार आहात. जोडीदारासोबत असलेला जुना वाद दूर होईल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 

अधिक वाचा 

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

राशीनुसार निवडा तुमचे करिअर