4 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कन्या राशींसाठी मैत्रीचे रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता

4 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कन्या राशींसाठी मैत्रीचे रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता

मेष - धनसंपत्ती आणि वेळ दोन्ही खर्च होण्याची शक्यता

आज तुमचा  वेळ आणि पैसा विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. देणी-घेणी सांभाळून करा. जोखिमेची कामे मुळीच करू नका. व्यावसायिक प्रवास करण्याची शक्यता आहे. राजकारणातून लाभ मिळण्याची शक्यता आहे.


कुंभ -नवीन संपर्कातून लाभ होण्याची शक्यता

आज तुमच्या कौटुंबिक समस्या सुटणार आहेत. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य मिळेल. कोर्ट कचेरीच्या गोष्टींपासून सावध रहा. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. दिखावा करण्याचा प्रयत्न करू नका. 


मीन -  उच्च शिक्षणात यश मिळेल

आज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारसरणीचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी  तुमच्या कार्यशैलीमुळे चांगल्या संधी मिळतील. नवीन योजनांंमध्ये काम करायला मिळाल्यामुळे मन आनंदी असेल. विरोधकांपासून सावध रहा. 

वृषभ -आरोग्यात सुधारणा होईल

आज तुमच्या तब्येतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. नियमित दिनक्रम आणि आहाराबाबत सावध रहा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.


मिथुन - संबंधांमध्ये दूरावा येण्याची शक्यता

आज तुमच्या आढमुठे स्वभावामुळे तुमच्या संबंधांमध्ये दूरावा येण्याची शक्यता आहे. नवीन संबंधांमधून फसवणूक होण्याची शक्यता आहे. आर्थिक  निर्णय जाणिवपूर्वक घ्या. सामाजिक कार्यासाठी दगदग करावी लागेल.


कर्क - मन आणि आरोग्यावर विपरित परिणाम होईल

आज तुमच्या नात्यातील कडवटपणा वाढण्याची शक्यता आहे. मन आणि आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नातेसंबंध सुधारतील. प्रवासाचा योग आहे. धार्मिक आस्था वाढण्याची शक्यता आहे.  


सिंह - सुख-सुविधांसाठी खर्च कराल

आज तुम्हाला प्रॉपर्टीसंबंधीत वादविवादात तुम्हाला यश मिळणार आहे. सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे वाढण्याची शक्यता आहे. राजकारणात लाभ मिळेल. सामाजिक मानसन्मान वाढणार आहे. 


कन्या - मैत्री प्रेमात बदलेल

आज तुमची एखाद्या व्यक्तीशी खास मैत्री होण्याची शक्यता आहे. मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांशी नातेसंबंध मजबूत आणि सहकार्याचे असतील. भागिदारीत नवीन कामांची सुरूवात कराल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.


तूळ - कामाच्या ठिकाणी समस्या येतील

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. व्यापारात नुकसान सहन करावे लागेल. व्यवसायात लोभीपणा टाळा. विरोधकांपासून सावध रहा.  


वृश्चिक - भूतकाळातील गुंतवणूकींचा फायदा मिळेल

आज नवीन योजना तयार कराल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकींमधून फायदा मिळेल. आर्थिऱक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात आनंदी वातावरण असण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.


धनु - अभ्यासातून मन भटकेल

आज विद्यार्थ्यांवर नकारात्मक विचारसरणीचा विपरित परिणाम होईल. अभ्यासातून मन रमेल. एकाग्रता वाढवण्याचा विचार करा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता. वादविवादांपासून  दूर राहण्याचा प्रयत्न करा. प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. 


मकर - आईला गुडघेदुखीचा त्रास होण्याची शक्यता

आज तुमच्या आईच्या गुडघेदुखीचा त्रास जाणवणार आहे. कुटुंबात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद जाणवतील. कामाच्या ठिकाणी  मनाविरूद्ध कामे करावी लागतील. कोर्ट कचेरीच्या समस्या सुटतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम