6 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या तरूणांना मिळेल यश

6 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या तरूणांना मिळेल यश

मेष - नातेसंबंधात तणाव येण्याची शक्यता

घरातील मोठ्यांच्या मदतीने नात्यातील ताण-तणाव दूर होतील. व्यावसायिक मेहनतीचा चांगला फायदा होईल. मुलांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल.


कुंभ - अधिकाऱ्यांसोबत वाद घालू नका

आज कोणत्याही वरीष्ठ अधिकाऱ्यासोबत वाद घालू नका. रागावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत काम करण्याचा प्रयत्न करू नका. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. वाहन चालवताना सावध रहा. 


मीन - आईची तब्येत बिघडण्याची शक्यता

आज तुमच्या आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे भावनिक सहकार्य मिळेल. कोर्ट कचेरीत समस्या येतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

 

वृषभ - तरूणांना यश मिळेल

आज तरूणांना मनासारखी नोकरी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. एखाद्या व्यक्तीच्या आकर्षणात अडकण्याची शक्यता आहे. 


मिथुन - साठवलेले पैसे खर्च करावे लागतील

कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात साठवलेले पैसे खर्च करणार आहात. कर्ज काढल्यामुळे ताण वाढेल. आत्मविश्वास कमी जाणवेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यात चांगले यश मिळेल. 


कर्क - आनंदाची बातमी मिळेल

आज तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळाल्यामुळे तणाव कमी जाणवेल. मन उत्साहित राहणार आहे. मित्रांच्या मदतीने पिकनिकला जाण्याची योजना आखाल. व्यावसायिक कामे लाभदायक ठरतील. उत्पन्नाची साधने वाढणार आहेत. कोर्ट-कचेरीत सावध रहा. 


सिंह - तणाव वाढण्याची शक्यता

आज तुमच्या प्रिय व्यक्तीच्या रागावण्यामुळे  निराश वाटणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव जाणवेल. जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्याचा विचार करा. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे आनंद वाटेल.


कन्या - आरोग्य बिघडण्याची शक्यता 

आज तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मंद गतीमुळे त्रास जाणवेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा योग आहे. व्यवसायातील कामांच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे.  


तूळ - अचानक धनलाभ मिळेल

आज एखाद्या व्यावसायिक योजनेला सुरूवात करण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होईल. मनाविरूद्ध प्रवास करावा लागेल. कौटुंबिक सुख-साधनांमध्ये वाढ होईल. जोडीदारासोबत नातेसंबंध चांगले राहतील.


वृश्चिक - नवीन नातेसंबंधांमधून भाग्योदय

आज तुमचे भाग्य चमकणार आहे. इतरांच्या सल्याचे मोकळेपणाने स्वागत करा. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्ती वाढ होईल. व्यावसायिक प्रवासाची योजना आखाल. जोडीदारासोबत नातेसंबंध मजबूत होतील. 


धनु - रखडलेली  कामे करणे कठीण जाईल

आज तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली असेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. पदोन्नतीत समस्या येणार आहेत. व्यवसायासाठी विनाकारण मेहनत घ्यावी लागेल. 


मकर -  धनलाभाचा योग 

आज तुम्हाला कुटुंबातील मोठ्या व्यक्तीकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. युवांना मेहनत केल्यामुळे यश मिळेल. सामाजिक मानसन्मान आणि भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी