7 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीसाठी आजचा दिवस समाधानाचा

7 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीसाठी आजचा दिवस समाधानाचा

मेष - मन अशांत राहील

आज तुमचे मन असमाधानी असेल. मानसिक समस्यांचा त्रास होणार आहे. एखादे झालेले काम रद्द होण्याची शक्यता आहे. अज्ञात व्यक्तीकडूनन मदत घेऊ नका. विरोधकांपासून विशेष सावध राहा. रचनात्मक कार्यात मन रमवा. 


कुंभ - अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल

आज नवीन व्यवसायातून तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळणार आहे. चल-अचल संपत्तीच वाढ होईल. जोडीदारासोबत व्यवसायासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली संधी येईल.  


मीन - करिअरची संधी गमवाल

आज युवक करिअरची एखादी चांगली संधी गमावणार आहेत. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. विरोधकांपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त काम करावे लागेल. जोडीदारासोबत नाते मजबूत राहील. 

 

वृषभ - मुलांकडून आनंदवार्ता मिळेल

आज तुम्हाला कठीण काळात तुमच्या घरच्या मंडळींची चांगली साथ मिळणार आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अधिकारी खुश असतील. व्यवसाायात सहकाऱ्यांची मदत मिळणार आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. 


मिथुन - आयात-निर्यातीत यश मिळेल

आज तुम्हाला आयात-निर्यातीच्या व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. पदोन्नतीच्या प्रयत्नात यश मिळू शकते. रचनात्मक कार्यात प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न करा. अति  उत्साहापासून दूर राहा. देणी-घेणी सांभाळून करा. 


कर्क - आर्थिक स्थिती खराब होण्याची शक्यता आहे

आज व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. उत्पन्न  आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकारणात तुमची ओळख वाढणार आहे. आत्मविश्वास वाढेल. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाची साधे वाढतील. 


सिंह - उत्साहित राहाल

आज पूर्ण दिवस तुम्हाला उत्साहित वाटेल. व्यवसायात एखाद्या मित्रांची मदत मिळू शकते. वाहनसुखात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन योजना यशस्वी होतील. महत्त्वाची  रखडलेली कामे पूर्ण होतील. 


कन्या - नातेसंबंधांमध्ये तणाव येण्याची आहे

शंका-कुशंकांमुळे नातेसंबंध दुरावण्याची शक्यता आहे. एखाद्याच्या दबावामुळे तुम्हाला निर्णय घेणं कठीण जाणार आहे. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जोखिमीच्या कामांपासून दूर रहा. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 


तूळ- जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या

आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. नियमित दिनचर्या करताना सावध रहा. व्यावसायिकांची प्रगती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. वाहन चालवताना नियम न पाळल्यास समस्या जाणवतील. 


वृश्चिक - आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळणार आहे.आर्थिक लाभाची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळतील. कौटुंबिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण  असेल.

  

धनु - प्रिय व्यक्तीसोबत जवळीक वाढेल

आज तुमची आकर्षक व्यक्तीशी ओळख होणार आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत जवळीक वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक गोष्टींमध्ये सक्रिय व्हाल. विरोधकांचा त्रास कमी होईल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. 


मकर - आळस करू नका

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली स्थिती निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. आळस करू नका. वादविवादांपासून दूर रहा. विद्यार्थ्यांना नकारात्मक विचारसरणीचा त्रास जाणवेल. पैशांबाबत चांगली बातमी मिळेल.  

आधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
 

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात