8 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या विवाहातील अडचणी होतील दूर

8 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या विवाहातील अडचणी होतील दूर

मेष - नवीन समस्यांमध्ये गुंतण्याची शक्यता

आज तुम्ही एखाद्या नव्या समस्येत गुंतू शकता. भविष्याबाबत चिंता सतावेल. स्वभावातील चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचारसरणीचा  परिणाम जाणवेल. महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा. 


कुंभ -  विद्यार्थ्यांचे अभ्यासातून मन भरकटण्याची  शक्यता 

आज विद्यार्थ्यांचे अभ्यासातून मन भरकटणार आहे. स्पर्धा परिक्षांचा निकाल मनाविरूद्ध असू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. धार्मिक कार्यात मन रमवा. आरोग्याची काळजी घ्या. 


मीन - आर्थिक लाभाची शक्यता

आज एखाद्या मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता आहे. विरोधी पक्षातील लोक तुमच्यात येतील. तुमच्या योजना गुप्त राखा. व्यावसायिक कामांसाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा तणाव वाढणार आहे.

 

वृषभ - त्वचेला एलर्जी येण्याची शक्यता

आज तुमच्या मुलांच्या त्वचेवर एलर्जी येण्याची शक्यता आहे. वाहतुकीच्या साधनांमुळे त्रास जाणवेल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. एखादी शुभवार्ता कानी पडेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. 


मिथुन - विवाहातील अडचणी दूर होतील

आज तुमच्या विवाहातील अडचणी दूर होणार आहेत. कौटुंबिक समस्या कमी होतील. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. एखाद्या राजकीय पक्षात जाण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. रखडेलेली कामे पूर्ण कराल.


कर्क - नोकरीचा शोध संपेल

आज तरूणांना मनासारखी नोकरी मिळणार आहे. नवीन कामात व्यस्त राहणार आहात. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढणार आहे.कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. 


सिंह - देणी-घेणी सांभाळून करा

आज तुम्हाला देणी-घेणी करताना समस्या जाणवतील. व्यवसायातील एखादे काम अचानक बंद होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटामुळे निराश व्हाल. आत्मविश्वास कमी जाणवेल. आईवडिलांकडून भावनात्मक आणि आर्थिक सहकार्य मिळेल.


कन्या - आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला तुमच्या आईची काळजी घ्यावी लागेल. महत्त्वाची कामे आणि कठीण कामे आज सहज होणार आहेत. उत्पन्न आणि खर्च यात नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम न मिळाल्यामुळे कामातील रस कमी होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना सफळ होतील.


तूळ - खऱ्या प्रेमाचा शोध घ्यावा लागेल

आज तुम्ही तुमच्या सार्वजनिक जीवनातील प्रतिमेमुळे निराश होणार आहात. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून सावध रहा. खऱ्या प्रेमाचा शोध सुरू राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात समस्या येतील. वाहन चालवताना सावध रहा. 


वृश्चिक -डोळे आणि डोकेदुखीची समस्या जाणवेल

आज आळस आणि जास्त झोप यामुळे तुम्हाला डोळे सुजण्याची अथवा डोकेदुखी जाणवणार आहे. कौतुकाची अपेक्षा करू नका. कोर्ट कचेरीपासून दूर रहा. आर्थिक स्थिती चांगली असेल. तंत्रज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ असेल. 


धनु - कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुन्या कामांना गती मिळेल. आरोग्य उत्तम राहील. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. रचनात्मक कार्यात रस वाढेल.  


मकर - भावंडाच्या मदतीने व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता

आज विद्यार्थ्यांना शिक्षकांची मदत मिळणार आहे. तुमच्या व्यवहार आणि ओळखींमुळे काम पूर्ण होतील. भावंडांच्या मदतीने व्यवसायात विस्तार होईल.जोखिमेची  कामे करू नका. सामाजिक संस्थेद्वारा सन्मानित होण्याची शक्यता आहे. 

 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का