ADVERTISEMENT
home / आरोग्य
प्रेगन्सीदरम्यान Gynaecologist ची निवड करताना

प्रेगन्सीदरम्यान Gynaecologist ची निवड करताना

पहिल्यांदा आई होताना मनात अनेक शंकाकुशंका असतात. काय खावं आणि काय खाऊ नये, कसं झोपावं कसं झोपू नये, बाळाचे आरोग्य कसं  आहे, बाळाची वाढ कशी होत आहे अशा अनेक प्रश्नांनी मनात काहूर निर्माण होत असतं. मनात आई होण्याचा आनंद असला तरी सर्व काही नीट पार पडेल ना ही चिंतादेखील सतावत असते. त्यामुळेच या काळात बाळ आणि आई दोघांची काळजी घेण्यासाठी योग्य Gynaecologistचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. मात्र  अनेक गायनेकॉलॉजिस्टमधून नेमक्या कोणत्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा हा मोठा प्रश्नच असतो. शिवाय कुटुंबातील मंडळी, ओळखीची माणसं आणि मित्रमंडळी त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरकडे जाण्यासाठी आग्रह करतात. यासाठी प्रेगन्सीनंतर गायनेकॉलॉजिस्टची निवड करताना या गोष्टी जरूर लक्षात घ्या. 

Shutterstock

गायनेकॉलॉजिस्टची निवड करताना या गोष्टी जरूर लक्षात घ्या.

फॅमिली डॉक्टर अथवा विश्वासू लोकांचा सल्ला घ्या

आई- बाबा होणं हा जितका तुमच्यासाठी आनंदाचा अनुभव असतो तितकाच तुमच्या कुटुंबातील लोकांसाठीदेखील असतो. कुटुंब, मित्रमंडळी तुमच्या या आनंदात उत्साहाने सहभागी होतात. ज्यामुळे बऱ्याचदा डॉक्टर निवडण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील मंडळी, नातेवाईक अथवा मित्रमंडळी काही सूचना  देतात. जर तुमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असेल तर त्यांच्या सांगण्यानुसार डॉक्टरची निवड करा. अथवा तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य त्या गायनेकची निवड करा. 

ADVERTISEMENT

इंटरनेटवर रिसर्च करा

तुम्हाला गोड बातमी मिळाल्यानंतर सर्वात आधी मनात प्रश्न पडतो ते म्हणजे कोणत्या डॉक्टरांकडे तपासणी करावी. कधी कधी तुम्हाला याबाबत सल्ला देण्यासाठी कुणीच उपलब्ध नसतं. कधी कधी लग्नानंतर नवं शहर आणि नव्या ठिकाणी शिफ्ट झाल्यामुळे याबाबत कोणाला विचारावं याबाबत मनात शंका येत असते. असं असेल तर सरळ इंटरनेटवर सर्च करा. आजकाल नेटवर सर्वकाही माहिती मिळणं शक्य आहे. त्यामुळे नव्या शहरातील सर्वोत्तम गायनेकॉलिजिस्ट तुम्ही नेटवरून माहिती घेऊन निवडू शकता. अशा वेळी डॉक्टरांचे स्पेशलायझेशन आणि अनुभव ही माहिती तुम्हाला नेटवर नक्कीच मिळू शकते. 

घर आणि ऑफिसपासून क्लिनिकचे अंतर लक्षात घ्या

तुमच्या गायनेकचे क्लिनिक अथवा हॉस्पिटल कुठे आहे हे फारच महत्त्वाचे आहे.  विशेषतः पहिल्या तिमाहीत आणि शेवटच्या तिमाहीत तुम्हाला वारंवार सोनोग्राफी करण्यासाठी आणि बाळाची वाढ तपासण्यासाठी क्लिनिकमध्ये जावं लागतं. अशा वेळी तुमची फार दगदग होऊ नये यासाठी क्लिनिक शक्य असल्यास तुमच्या घर आणि ऑफिसपासून जवळ असेल याची खात्री करून घ्या.

Shutterstock

ADVERTISEMENT

डॉक्टर पुरूष आहे की महिला आहे ते आधीच पाहा

बऱ्याचदा महिलांना पुरूष गायनेकॉलॉजिस्टकडे चेकअपसाठी जाणं अतिशय संकोचल्यासारखं वाटत असतं. अशावेळी डॉक्टर कितीही अनुभवी असले तरी गरोदर महिला त्यांना तपासणी करू देत नाहीत. जर तुम्हाला देखील असा संकोच वाटत असेल तर आधीच महिला गायनेकची निवड करा. ज्यामुळे तुम्हाला हेल्थ चेकअप करण्यासाठी संकोच वाटणार नाही. 

तुमच्या आरोग्यसमस्यांचा विचार करा

जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर त्यासाठी आधीच विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याच महिलांना आधीपासून मधुमेह, थायरॉईड समस्या असतात. ज्यामुळे अशा महिलांना प्रेगन्सी दरम्यान विशेष काळजीची गरज असते. जर तुमच्या गायनेककडे या समस्यांवर उपचारांसाठी योग्य ती उपाययोजना असेल तरच तुम्हाला फायदा होऊ शकतो. यासाठीच आधीच अशा गायनेकची निवड करा जे तुम्हाला तुमच्या या आरोग्य समस्यांवर गरोदरपणातही उपचार देतील. ज्यामुळे तुमच्या बाळाची वाढ आणि तुमचे आरोग्य दोन्ही सुखरूप असेल.

आर्थिक परिस्थितीचा विचार करा

आजकाल गरोदरपण आणि बाळाचा जन्म ही एक खूप खर्चिक गोष्ट झाली आहे. अशावेळी गायनेकची निवड करताना तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीचादेखील विचार करायला हवा. कधी कधी एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टरची फी न परवडण्यासारखी असू शकते. शिवाय बाळंतपण त्यानंतर होणारा हॉस्पिटलचा  खर्च या सर्व गोष्टी अशावेळी खर्चिक असतात. यासाठीच तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार डॉक्टर निवडा. 

यासोबतच हे ही वाचा

ADVERTISEMENT

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पदाने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा

आई व्हायचंय…तर गर्भावस्थेबद्दल सर्व गोष्टी घ्या जाणून

ADVERTISEMENT

नंदिता पालशेतकरांच्या ‘या’ हेल्थ टीप्सने प्रत्येक स्त्री होईल निरोगी

रेडिओलॉजिस्ट शिल्पा लाड सांगत आहेत निरोगी जीवनाचा ‘आरोग्यमंत्र’

16 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT