logo
ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
जाणून घ्या घरातील देवपूजेची भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

जाणून घ्या घरातील देवपूजेची भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

सणासुदीचे दिवस सुरु झाले की, घरात पूजेची भांडी काढली जातात. चांदीची आणि तांब्याची पूजेची भांडी घरात सगळ्यांकडेच असतात.आता ही भांडी धुणे म्हणजे तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते कारण इतर भांड्यांप्रमाणे तुम्हाला ही भांडी घासता येत नाही. तुम्हाला पूजेची ही भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायची असेल तर मग हे तुम्ही नक्कीच वाचायला हवे.

सणासुदीला पुरूषांमध्ये वाढतोय ‘भिकबाळी’ घालण्याचा ट्रेंड 

तांब्याची भांडी

shutterstock

ADVERTISEMENT

 सर्वसाधारण सगळ्याच मराठी घरांमध्ये तांब्याची पूजेची भांडी असतात. कलश, फुलपात्र, ताम्हण, पळी, समई अशी सर्वसाधारण भांडी सगळ्यांकडे असतात. इतरवेळी काळी पडणारी  तांब्याची भांडी धुतल्यानंतर छान चकचकीत दिसतात.घरच्या घरी तांब्याची भांडी धुण्याची जाणून घ्या सोपी पद्धत 

कोकम आणि मीठ: कोकणाकडील प्रत्येकाच्या घरात ओले कोकम हे असतातच. दोन ते तीन कोकमच्या पाकळ्या घेऊन त्यात मीठ घालून तुम्ही तांब्याची भांडी घासली की, ती छान चकचकीत होतात .( कोकमाचा वापर करताना तोंडाला पाणी सुद्धा हमखास येते)

चिंच: आंबट चिंचेचा गोळा तर हमखास आपल्या घरात असतोच. तुम्ही चिंचेचा वापर करुनही ही भांडी स्वच्छ करु शकता. चिंच आणि मीठ घेऊन तुम्ही तुमची तांब्याची भांडी हमखास धुवू शकता. 

(यांचा वापर करुन तुम्ही ज्यावेळी भांडी साफ करता त्यावेळी तुमच्या हाताला त्रासही होत नाही )

ADVERTISEMENT

रेडिमेड पावडर : हल्ली बाजारात तांब्याची भांडी धुण्यासाठी रेडीमेड पावडर मिळते. ती पावडर वापरुन देखील तुम्ही तुमची तांब्याची भांडी धुवू शकता. ही पावडर वापरताना एक गोष्ट लतत्रात ठेवा जर साफ करणारी पावडर जर चरचरीत असेल तर त्याचा वापर करु नका. कारण त्यामुळे तुमच्या तांब्याच्या भांड्यांना चरे पडतील.

बाप्पाच्या आगमनानिमित्त खास Modak Mania

चांदीची भांडी

Instagram

ADVERTISEMENT

अनेकांच्या घरी पुजेची चांदीची भांडीदेखील असतात. चांदीची भांडी दिसायला फारच सुंदर असतात. पण ही भांडी धुणे डोक्याला ताप होऊन जाते. कारण जर चांदीची भांडी उघडी राहिली तर ती अनेकदा काळी पडतात. मग काय ही भांडी पुन्हा लख्ख करायची कशी अशा प्रश्न पडतो. 

कोलगेट पावडर:  तुम्ही कोणत्याही सोनाराकडे गेलात तरी देखील ते याच पद्धतीचा अवलंब करुन कोलगेट पावडरचा वापर करतात. हल्ली बाजारात फारच कमी ठिकाणी ही कोलगेट पावडर मिळते. कोलगेट पावडर कोरडीच भांड्यावर वापरा. तुम्हाला तुमची भांडी स्वच्छ झालेली दिसतील. 

बेकींग सोडा:  साधारण एक लीटरभर पाणी घेऊन त्यात साधारण एक मोठा चमचा बेकिंग सोडा घाला. तुमच्याकडे अॅल्युमिनिअम फॉईलचा गोळा घालून पाणी उकळून घ्या. उकळलेल्या पाण्यात अगदी 10 सेंकद ठेवा आणि चांदीची भांडी काढून लख्ख करुन घ्या. 

लिंबू सोडा : प्यायच्या सोडामध्ये लिंबू पिळून त्यात साधारण तासभर तरी तुमची चांदीची भांडी ठेवून द्या. तुम्हाला तुमच्या चांदीच्या भांडीवरचा मळ, काळपट निघून गेलेला दिसेल. पण रोज हा प्रयोग करु नका कारण त्यामुळे तुमची भांडी खराब होतील. 

ADVERTISEMENT

केचअप:  हो तुम्ही खात असलेल्या टोमॅटो केचअपमुळेही तुमची चांदीची भांडी स्वच्छ होऊ शकतात. भांड्यावर टोमॅटो केचअप लावून ती हातानेच घासून घ्या. त्यासाठी कोणत्याही तारेचा वापर करु नका. 

अशाप्रकारे तुम्ही तुमची पूजेची भांडी स्वच्छ करु शकता.

बाप्पाचा नेवैद्य असतो खास, कसे वाढावे ताट

01 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT