ADVERTISEMENT
home / Fitness
शुद्ध तुपाची ओळख करणे जाते कठीण, मग असे ओळखा शुद्ध ‘तूप’

शुद्ध तुपाची ओळख करणे जाते कठीण, मग असे ओळखा शुद्ध ‘तूप’

साधारण ऑगस्ट महिन्यानंतर सणांची रांगच लागते. मग काय आता सण आहे म्हणजे घरात गोडधोड पदार्थ बनवणे आलेच आणि या गोडधोड पदार्थांसाठी तूप नको का? हल्ली अनेक जण फराळ किंवा देवाचे जेवण यामध्ये तूपाचा हमखास वापर करतात. हल्ली तूपाच्या नावाखाली अनेक ठिकाणी डालडाच विकला जातो. त्यामुळे तुपाची खरी चव कशी असते हे अनेकांना आजही माहीत नाही. आज आपण शुद्ध तूप कसे ओळखायचे याची अधिक माहिती घेऊया.

पूजेसाठी करण्यात येणाऱ्या पंचामृताचे फायदे

असं तयार केलं जातं तूप

shutterstock

ADVERTISEMENT

तूप खाल्ल्यावर येईल रुप असे म्हणतात ते अगदी खरे आहे. आता रुप काही एकाएकी पटकन मिळत नाही. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की, तूप बनण्याची प्रक्रिया ही फार मोठी असते. घरी तूप बनवयाचे म्हटले तर दूधाची साय साठवून ठेवावी लागते. फ्रिजमध्ये साठवून ठेवलेली साय ही साधारण एक मोठा टोपभर झाली की, मग तुम्हाला तूप करायला हरकत नाही. साय फ्रिजमधून काढून त्यातून लोणी काढले जाते. तयार लोण्याचा गोळा कढवला जातो. अगदी मंद गॅस वर फार लक्ष देत तूप कढवावे लागते. तयार आहे तुमचे घरगुती ‘तूप’

गर्भावस्थेत खाऊ नका हे पदार्थ

तुपाची शद्धता अशी ओळखावी

shutterstock

ADVERTISEMENT

आता तुम्ही घरात आणलेले तूप शुद्ध आहे की, नाही हे तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही या गोष्टीतून तूप शुद्ध आहे की नाही ते ओळखा

तूप हलके असते

एका डब्यात तुम्ही तूप भरुन ठेवा त्याला घट्ट झाकण लावून ठेऊन द्या. तुम्हाला तूप काही वेळाने बाहेर आलेले दिसेल. हे उदाहरण देण्याचे कारण इतकेच तूप हलके असते ते अगदी कशातूनही सहज बाहेर येऊ शकते.

तूप लगेच वितळते

ADVERTISEMENT

जर तुम्ही घरी कोणता पदार्थ तुपात बनवत असाल तर एका पॅनमध्ये तूप घ्या. जर तुमचे तूप पटकन वितळले तर समजून जा की, तुम्ही आणलेले तूपच आहे. पण जर तुम्ही गरम कढईत तूप टाकल्यानंतर ते वितळण्यास फार वेळ लागत असेल तर तुमच्याकडे शुद्ध तूप नाही.

 तूप लगेचच मुरते 

तूपाची ओळख पटवण्याची आणखी एक ओळख म्हणजे तूप लगेच मुरतं. तुम्ही हातावर तुपाचे काही थेंब घ्या. ते तुमच्या त्वचेवर चोळा. तुम्हाला तूप तुमच्या त्वचेमध्ये मुरलेले दिसेल. तुम्हाला तुमच्या त्वचेला तूप लावले आहे हेही जाणवणार नाही. पण तूप लावलेली जागा तुम्हाला अगदी मुलायम वाटेल. तूप हे अगदी सहज मुरुन जातं. तेलाप्रमाणे ते तवंगत नाही त्यामुळेच ते दिसत नाही. तुम्ही बाजारातून आणलेलं तूप तुमच्या त्वचेत मुरलं तर समजून जा तूप शुद्ध आहे.

तुपाचा सुगंध टिकून राहतो  

ADVERTISEMENT

हल्ली अगदी कमी किमतीत तूप काही ठिकाणी मिळतं. आता स्वस्तात तूप मिळत असेल तर ते आपण लगेचच किलो दोन किलो घेऊन मोकळे होते. तूप खराब होत नाही त्यामुळे घरात एकाचवेळी बरचं तूप आणलं जातं. पण तूप शुद्ध असेल तर त्याला कडवतानाचा एक धुरकट वास असतो. तसा वास साधारण तुपाला येतो. पण हल्ली बाजारात तुपाचा इसेन्स घालून डालडा विकला जातो. पण कालांतराने त्यातील तुपाचा सुगंध निघून जातो. पण तूप शुद्ध असेल त्याचा सुगंध कायम टिकून राहतो.

तुपाच्या कणी होत नाहीत

जर तुम्ही घरी तूप कडवत असाल तर तुम्हाला तुपाचे टेक्शचर माहीत असेलच. तूप कडवून झाल्यानंतर ते बरणीत भरेपर्यंत तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल की, तुपाच्या कधीही कणी होत नाहीत. जर तुमच्या तुपाच्या कणी झाल्या असतील तर तुम्हाला तुपाच्या नावाखाली डालडा देण्यात आला आहे.

तुपाचा रंग 

ADVERTISEMENT

जर तुम्ही गाईचे तूप घेतले असेल तर ते पिवळेधम्मक असते. तर म्हशीच्या दुधाचे तूप हे पांढऱ्या रंगाचे असते. गायीच्या तुपापेक्षा म्हशीच्या तुपात फॅट अधिक असते.

 Healthy Fitness साठी नक्की ट्राय करा महत्त्वाचे नियम

shutterstock

ADVERTISEMENT
06 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT