ADVERTISEMENT
home / आरोग्य
वारंवार ‘मिसकॅरेज’ होत असेल तर करा हे उपाय

वारंवार ‘मिसकॅरेज’ होत असेल तर करा हे उपाय

आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. मात्र आई होण्याचं सुख सर्वांनाच प्राप्त होत नाही. कारण गर्भधारणेचा काळ जितका सुखद असतो तितकाच तो आव्हानात्मकही असतो. या काळात प्रत्येक स्त्रीने स्वतःची आणि पोटातील बाळाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताणतणाव, आरोग्य समस्या, चुकीच्या सवयी यामुळे कधीकधी या आनंदाला गालबोट लागतं. ज्यामुळे महिलांना वारंवार मिसकॅरेजच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. एखाद्या वेळेस मिसकॅरेज होणं हे जरी स्वाभाविक असलं तरी त्यामुळे त्या स्त्रीच्या मनावर खूप मोठा आघात होतो. ज्याचा परिणाम भविष्यात तिच्या मनात खोलवर रुतून राहतो. वास्तविक मिसकॅरेज हा एक अपघात असून त्याचा परिणाम तुमच्या पुढील जीवनावर होता कामा नये. मात्र हे माहीत  असुनही पुन्हा आई होताना तिच्या सतत मनात भुतकाळातील घटनेची चिंता सतावत राहते. जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर पुढच्या वेळी गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना या काही गोष्टींची काळजी जरूर घ्या. 

पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या –

आजकाल जीवनशैलीत इतके बदल झाले आहेत की त्याचा परिणाम तुमच्या आहारपद्धतीत दिसून येतो. खाण्या-पिण्याच्या चुकीची वेळ आणि सवय तुमच्या आरोग्यावर नकळत परिणाम करत असते. निरोगी जीवनासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार घेणं फारच गरजेचं आहेच. मात्र जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल आणि भुतकाळात तुमचं मिसकॅरेज झालेलं असेल तर तुम्ही आहाराबाबत सावध राहणं फारच गरजेचं आहे. शक्य असल्यास अशा काळात महिलांनी घरी तयार केलेला आणि सात्विक आहार घ्यावा. म्हणजेच जंकफूड, चायनिज, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि घराबाहेर शिजवण्यात आलेले अथवा उघड्यावरील खाद्यपदार्थ मुळीच खाऊ नयेत. 

गर्भधारणेआधी आयुर्वेदिक उपचार घ्या –

गर्भधारणा आणि गर्भाचे पोषण या फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत.गर्भधारणेसाठी त्या स्त्रीचे शरीर निरोगी असणं फार गरजेचं आहे. आजकाल महिलांमध्ये अनेक आरोग्य समस्या आढळून येतात. यासाठी गर्भधारणेपूर्वी या आरोग्यसमस्यांवर योग्य ते उपचार जरूर करावे. आयुर्वेदिक उपचार केल्यास नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. आयुर्वेदिक तज्ञ्ज यासाठी पंचकर्माद्वारे शरीर डिटॉक्स करण्याचा सल्ला देतात. पंचकर्म उपचारांमुळे स्त्री आणि पुरूष दोघांचेही शरीर निरोगी आणि सुदृढ होते. मात्र हे उपचार करण्यापूर्वी तज्ञ्जांचा सल्ला  अवश्य घ्या.

ADVERTISEMENT

Shutterstock

वजन कमी करा –

आजकाल बैठी जीवनशैली आणि तासनतास बसून काम करण्याचा परिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच होत असतो. बैठी जीवनशैली असल्यामुळे तुमचे वजन वाढते आणि ज्यामुळे गर्भधारणेत अपयश अथवा गर्भाचे योग्य पोषण न झाल्यामुळे मिसकॅरेज होण्याची शक्यता असते. यासाठीच डॉक्टरांच्या सल्लानुसार घरातील कामे अथवा योगासने,व्यायाम करा. ज्यामुळे तुमचे वजन अती प्रमाणात नक्कीच वाढणार नाही. वजन कमी करण्यासाठी शरीराची योग्य हालचाल होणे फार गरजेचे आहे. 

मेडिटेशन करा –

मेडिटेशन हा मनाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी खात्रीशीर उपाय आहे. काम अथवा इतर चिंता तुमच्या मनात सतत सुरू असतात. शिवाय गर्भधारणेतील अपयश, मिसकॅरेज, घरातील अथवा इतर लोकांनी याबाबत विचारलेले प्रश्न याचा परिणाम तुमच्या मनावर सतत होत असतो. मन आणि शरीर यांचा जवळचा संबंध असल्यामुळे मानसिक अस्वास्थातून अनेक शारीरिक व्याधी नकळत निर्माण होत असतात. यासाठीच शरीर आणि मनाचे आरोग्य राखण्यासाठी मेडिटेशन तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

दगदग करू नका –

महिला एकाच वेळी अनेक कामे करण्यात तरबेज असतात. जोडीदार, घर, व्यवसाय, ऑफिस, घरातील मंडळींची काळजी, इतर जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी दररोज त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असते. एवढी कामे आणि त्यासाठी करावी लागणारी धावपळ यामुळे तुमच्या शरीराची तुम्ही नीट काळजी घेत नाही. म्हणूनच जर तुम्हाला वारंवार मिसकॅरेजला सामोरं जावं लागत असेल तर या जबाबदाऱ्या इतरांसोबत वाटून घ्या. फार दगदग न करता थोडं  स्वतःकडे लक्ष देऊन तुम्ही तुमचं आई होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणी अशी घ्यावी स्वतःची काळजी

ADVERTISEMENT

हळदीच्या अतीसेवनामुळे वाढू शकतो Miscarriage चा धोका

12 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT