लांब आणि चमकदार केसांसाठी त्यांची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुमचे केस ऑईली, ड्राय ,कलर केलेले अथवा फ्रिझी असतील तर तुम्हाला केसांची विशेष निगा राखावी लागते कारण असे केस लवकर खराब होतात. केसांवर नियमित तेल लावणे, हेअर मास्क, हेअर सिरम वापरणे, वेळच्या वेळी हेअर स्पा करणे, वारंवार कर्लर अथवा स्टेटनर न वापरणे अशा अनेक गोष्टींचा हेअर केअरमध्ये समावेश होतो. मात्र या सर्व गोष्टींप्रमाणेच तुम्ही दररोज केसांची काळजी कशी घेता हेदेखील फार महत्त्वाचे ठरते. साधं आणि सोपं उदाहरण घ्यायचं झाल्यास तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांची कशी काळजी घेता यावर तुमच्या केसांचे आरोग्य अवलंबून आहे. दररोज रात्री झोपताना काही गोष्टींबाबत दक्षता घेत तुम्ही तुमच्या केसांची निगा राखू शकता. यासाठी जाणून घ्या रात्री झोपण्यापूर्वी केसांची कशी काळजी घ्याल.
झोपण्यापूर्वी फॉलो करा या हेअर केअर टिप्स
रात्री झोपण्यापूर्वी केस धुवू नका
केस जेव्हा ओले असतात तेव्हा ते तुटण्याची शक्यता अधिक असते. यासाठी शक्य असल्यास रात्री झोपण्यापूर्वी केस कधीच धुवू नका. मात्र जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी लवकर घराबाहेर जायचे असेल तर केस आदल्या दिवशी रात्री धुवावेच लागतात. असं करावं लागल्यास केस धुतल्यावर ते व्यवस्थित कोरडे केल्याशिवाय झोपू नका. मात्र केस कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका. त्याऐवजी अंघोळ केल्यावर केसांवर टॉवेल गुंडाळून ठेवा ज्यामुळे केसांमधील पाणी टॉवेल शोषून घेईल आणि तुमचे केस लवकर कोरडे होऊ शकतील.
Shutterstock
केस घट्ट बांधून झोपू नका
काही जणींना केस मोकळे सोडून तर काही जणींना केस घट्ट बांधून झोपायची सवय असते. जर तुम्हाला केस मोकळे ठेवायची सवय असेल तर झोपेत केस अंगाखाली येवून तुटू शकतात. शिवाय केस घट्ट बांधून ठेवले तरी येणाऱ्या ताणामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी अगदी सैलसर पोनीटेल अथवा वेणी घालून मगच झोपा. ज्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होणार नाही.
झोपण्यापूर्वी केस विंचरा
सकाळी उठल्यावर कॉलेज अथवा ऑफिसला जाण्याची घाई सर्वांना असते. मात्र बऱ्याचदा या घाईत लांब केसांचा गुंता सोडवणे कठीण जाते. केसांचा गुंता सकाळी सोडवण्यासाठी वेळ मिळत नसेल तर हा उपाय जरूर करा. रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरून गुंता सोडवून घ्या. केसांची सैलसर वेणी अथवा पोनी टेल बांधून झोपी जा. सकाळी उठल्यावर तुमच्या केसांमधील गुंता नक्कीच कमी झालेला असेल.
हेअर बॅन्ड निवडताना काळजी घ्या
केस व्यवस्थित बांधले जावेत यासाठी अनेकींना केस घट्ट इलॅस्टिक बॅन्डने पोनीटेल बांधायची सवय असते. मात्र अशा इलेस्टिक बॅन्डमुळे तुमचे केस लवकर तुटू शकतात. यासाठीच बाजारात अनेक सॉफ्ट मटेरिअलपासून तयार केलेले बॅन्ड मिळतात. सॉफ्ट बॅन्डमुळे तुमच्या केसांचं नुकसान कमी होऊ शकतं. हे सॉफ्ट बॅन्ड सॅटिन, सिल्क, कॉटन अथवा मायक्रोफायबर पासून तयार केलेले असतात. मात्र हा बॅन्ड फार घट्ट बांधू नका रात्री झोपताना अशा बॅन्डने केस सैलसर बांधूनच झोपा.
Shutterstock
झोपण्यापूर्वी केसांवर तेल अथवा सिरम लावा
तेलामुळे केसांचे संरक्षण आणि पोषण होत असते. यासाठीच केसांना वेळच्यावेळी तेल अथवा सिरम लावणं फार गरजेचं असतं. दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असल्यामुळे तुम्ही केसांना तेल लावणं टाळता. मात्र रात्री झोपताना केसांना तेल लावण्यास काहीच हरकत नसते. ज्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहू शकते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी केसांना नाराळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, बदामाचे तेल अथवा जास्मिन तेल लावा आणि बोटांनी केसांना मसाज करून केस बांधून ठेवा.
सॅटिनची बेडशीट आणि पिलो कव्हर वापरा
सॅटिनची बेडशीट आणि सॅटिनचे पिलो कव्हर हे तुमच्या बेडरूमला एक छान आणि रॉयल लुक देतात. मात्र त्याचसोबत अशा बेडशीट आणि पिलो कव्हर तुमच्या केसांच्या आरोग्यासाठीदेखील उत्तम असतात. कारण सॅटिनमुळे तुमच्या केसांमधील नैसर्गिक ओलावा आणि आर्द्रता शोषून घेत नाही. ज्यामुळे तुम्ही केसांवर लावलेलं तेल, सिरम निघून जात नाही. तेल आणि सिरम तुमच्या केसांचं संरक्षण करतं. शिवाय कॉटनपेक्षा सॅटिनचा स्पर्श अगदी मऊ आणि मुलायम असतो. ज्यामुळे तुमचे केस तुटण्याची शक्यता फारच कमी असते.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि इन्स्टाग्राम
अधिक वाचा
POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.
अधिक वाचा
केस धुताना करू नका या ‘7’ चुका
घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस
प्रवासादरम्यान तुमचेही केस होतात खराब,मग अशी घ्या काळजी