आपल्याकडे नेहमीच कपाटामध्ये भरपूर कपडे असतात. कपडे जुने झाले तरी ते आपल्याला टाकावे किंवा कधीकधी दुसऱ्याला द्यावे असं वाटत नाही. कारण खूपच लगाव असतो बऱ्याचदा आपल्याला त्या कपड्यांशी. अशावेळी प्रश्न पडतो की, या सगळ्या कपड्यांंचं नक्की काय करायचं? कपडे खूपवेळा वापरून कंटाळा तर आलाय पण टाकायचे पण नाहीयेत. अशावेळी ते तसेच पडून राहतात. तेव्हा थोडासा विचार करून आपण अशा जुन्या कपड्यांंचा कल्पकतेने विचार करून पुनर्वापर नक्कीच करू शकतो. हल्ली तुम्हाला जुने कपडे देण्यासाठी भांडीवालेही दिसत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्याच जुन्या कपड्यांचा वापर करून घरच्या घरी वेगळ्या गोष्टी तयार करू शकता. कसा वापर करता येईल आपण बघूया.
आपल्याकडे अनेक कपडे असतात. विशेषतः कुरते आणि साड्या. त्यांचे चौकोनी अथवा त्रिकोणी आकार कापून उशांसाठी शिवलेले कव्हर्स अप्रतिम दिसतात. तुम्ही हे कव्हर्स हातानेही शिवू शकता अथवा मशीनवरही शिवू शकता. इतकंच नाही तर तुम्ही मऊ कपडे एकत्र करून त्याची उशीही बनवू शकता. यामध्ये फाटलेले पण चांगले सुती कपडे तुम्ही वापरू शकता. तसंच तुमच्या जीन्सचं कापडही तुम्ही उशीसाठी वापरून त्यावर लिहिलेले उशीच्या मध्यभागी ठेऊन तुम्हाला ती उशी अधिक आकर्षक बनवता येईल.
आपल्याकडे अनेक कपडे असतात. त्याला योग्य आकार देऊन तुम्ही घरातील टेबल आणि खुर्च्यांसाठी वेगळं कव्हर तयार करू शकता. त्याशिवाय तुम्ही कपड्यांच्या लेस आणि फ्रील काढून टेबलच्या कव्हरला तसंच पडद्यांनाही लावू शकता. दिसायला हे अतिशय मोहक दिसतं. तसंच आपल्या घरातील लहान मुलांचे अनेक कपडे पडलेले असतात. त्यावर असणाऱ्या कार्टूनच्या चित्रांचा वापर तुम्ही टेबल कव्हर अथवा बेडच्या कव्हरसाठी करू शकता. जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करणं खूप सोपं आहे. तुम्ही जीन्सचे पॅच लावूनदेखील तुमची कलात्मकता दाखवू शकता.
जीन्स फाटल्यानंतर आणि अगदी खूप वर्ष वापरल्यानंतरही ती चांगली राहाते. त्याचं कापड खराब होत नाही. मग अशावेळी नक्की काय करायचं ? असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या जीन्स आणि शर्ट घेऊन त्याची स्टायलिश बॅग तयार करू शकता. या पँटचा खिशापर्यंतचा भाग हा कापून वेगळा करा. वरच्या भागाच्या तळाशी व्यवस्थित टीप मारा अर्थात शिवून घ्या. मग या पँटची छोटी शॉर्ट्स होऊ शकते अथवा तुम्ही वरच्या भागाला चैन लावून घेतलीत तर त्याची स्टायलिश बॅग तयार होते. तसंच तुमच्या जीन्सच्या स्कर्टचीही बॅग तुम्ही तयार करून घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या जुन्या कपड्यांचा चांगला पुनर्वापरही होतो आणि कपडे टाकूनही द्यावे लागत नाहीत. तसंच इतर बॅग्ज खरेदी करण्यासाठीचे पैसेही वाचतात.
आपण कपडे खरेदी करताना मोठ्या हौसेने प्रिंटेड कपड्यांची खरेदी करतो. पण काही वेळा वापरून झाल्यानंतर प्रिंंटेड कपड्यांचा कंटाळा येतो. पण ते टाकून द्यावे अथवा इतर कोणाला द्यावे असंही वाटत नाही. मग अशा वेळी तुम्ही प्रिंटेड कपड्यांपासून लँप शेड तयार करू शकता. असे लँप शेड तुमच्या घरालाही अधिक शोभा आणतात. तसंच हे तयार करणंही अतिशय सोपं आहे. त्यामुळे तुम्ही जर प्रिंटेड कपड्यांचं काय करायचं असेल असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय अप्रतिम आहे.
आपल्या वॉर्डरोबमध्ये अशा अनेक साड्या असतात ज्या वर्षानुवर्ष तशाच पडून असतात अथवा आपल्या आईच्या साड्या तिला नेसायच्या नसतात. मग अशावेळी तुम्ही या साड्यांचे ड्रेस शिवून घालू शकता. ज्यांना शॉर्ट ड्रेस घालण्याची हौस असेल त्यांना जुन्या साडीतून शिवण्यासारखा हा चांगला पर्याय आहे. ड्रेस बनवण्यासाठी तुम्हाला कॉटन सिल्क मटेरिअलमधल्या मोठ्या काठाची साडी लागेल. तुम्ही तु्म्हाला हवं तसं बाह्या मोठ्या, फ्रंटला राऊंडनेक आणि मागे राऊंड डिपनेक आणि पोटली वर्क करु शकता. हा पॅटर्न शिवायला सोपा आहे. याला थोडा घेर देण्यासाठी कंबरेपासून खाली असलेल्या भागाला जास्त चुण्या ठेवण्यास सांगा. जर तुम्हाला बॉक्स प्लेटस आवडत असतील तर त्यात व्हरायटीही आणू शकता.
जुन्या साड्यांपासून शिवा ड्रेसचे असे हटके पॅटर्न्स
POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.
तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.