ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
वॅक्सिंग नंतर त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

वॅक्सिंग नंतर त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

अंगावरील अनावश्यक केस कमी करण्यासाठी वॅक्सिंग हा एक उत्तम पर्याय आहे. वॅक्सचा वापर करून तुम्ही तुमच्या अंगावरील नको असलेले केस काढून टाकू शकता. वॅक्सिंग मुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. एवढंच नाही तर वॅक्समुळे तुमच्या त्वचेवरील सन टॅनिंगही कमी होतं. मात्र बऱ्याचजणींना वॅक्सिंग केल्यावर अंगावर काही वेळा लाल रंगाचं पुरळ उठतं अथवा दाह आणि जळजळ जाणवते. ज्यामुळे वॅक्सिंग करण्याआधीच त्याची भितीच जास्त वाटू लागते. मात्र असं असेल तर वॅक्सिंग केल्यावर होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी हे काही उपाय तुमच्या फायद्याचे ठरू शकतात. 

वॅक्सिंगनंतर होणारा दाह कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

बर्फ अथवा थंड पाण्याने त्वचा पुसून घ्या

वॅक्स केल्यावर लगेच त्वचेवर बर्फ अथवा थंड पाण्याने स्पंज केल्यामुळे त्वचेचा होणारा दाह कमी होतो. शिवाय यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो. तुम्ही यासाठी आईस पॅकचा वापर देखील करू शकता. या उपायामुळे तुमची संवेदनशील त्वचा पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होऊ शकते. 

shutterstock

ADVERTISEMENT

सतत त्वचेला स्पर्श करू नका

जर तुम्ही तुमच्या वॅक्स केलेल्या त्वचेला सतत स्पर्श केला तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.. कारण वॅक्सिंग केल्यामुळे तुमची त्वचाछिद्रे ओपन होतात. अशावेळी त्वचेवर हात मुळीच फिरवू नये कारण त्यामुळे तुमच्या हातावरील धुळ, माती, प्रदूषण तुमच्या वॅक्स केलेल्या त्वचेच्या संपर्कात येतात. यामधून इनफेक्शन होऊन त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता दाट असते. 

थंड पाण्याने अंघोळ करा

वॅक्स केल्यावर जर तुमच्या त्वचेवर जळजळ होत असेल अथवा अंगावर पुरळ उठत असेल तर या उपायाने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. यासाठी वॅक्सिंगनंतर अंघोळ करा. ज्यामुळे तुमच्या त्वचेचा दाह आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल. शिवाय वॅक्सिंग करताना अनेकवेळा त्वचेवर वॅक्स तसाच राहिल्यामुळे तुम्हाला वॅक्सचा चिकटपणा त्रासदायक वाटू लागतो. तोदेखील अंघोळ केल्यामुळे निघून जातो. त्वचा स्वच्छ होते. अंघोळ करताना थंड पाण्याचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेची वॅक्स करताना मोकळी झालेली त्वचाछिद्रे बंद होतात. ज्यामुळे कोणतेही इनफेक्शन होत नाही. 

त्वचेवर एखादं दाहशामक औषध लावा

जर बर्फ अथवा थंड पाण्याचा वापर करूनदेखील तुमच्या त्वचेचा दाह कमी  झाला नसेल तरच हा उपाय करा. यासाठी तुम्ही एखादी अॅंटि इनफ्लैमटरी क्रीम अथवा लोशन लावू शकता. घरगुती उपाय करण्यासाठी तुम्ही त्वचेवर फ्रीजमध्ये थंडगार केलेल्या ग्रीन टी बॅग पाण्यात बूडवुन ते पाणी लावू शकता. कारण ग्रीन टीमध्ये दाह कमी करणारे घटक असतात. याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. 

Dermatologist चा सल्ला घ्या

बऱ्याचदा त्वचेवर वॅक्समुळे होणारी जळजळ अथवा दाह काही तासांनी आपोआप कमी होते. त्यामुळे शांतपणे हा त्रास सहन करणं हाच यावर एकमेव उपाय असतो. मात्र जर तुमच्या त्वचेचा दाह दिवसभर अथवा  दुसऱ्या दिवशीदेखील तसाच असेल तर तुम्हाला याबाबत उपाय करण्याची गरज आहे हे ओळखा. जर तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तर वॅक्समध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ शकतो. यासाठी त्वचारोग तज्ञ अथवा Dermatologist चा सल्ला त्वरीत घ्या. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं अधिक नुकसान नक्कीच होणार नाही. 

ADVERTISEMENT

अगदी सोपे आणि साधे उपाय करून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. याबाबत आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा

वॅक्स करण्यापूर्वी वॅक्सचे प्रकार तुम्हाला माहीत असायला हवे

घरी वॅक्सिंग करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

चॉकलेट, रिका अथवा रेग्युलर, कोणतं Wax आहे तुमच्यासाठी अप्रतिम, जाणून घ्या

ADVERTISEMENT

 

16 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT