कपाटात कितीही कपडे असले तरी ते आपल्याला कमीच असतात. प्रत्येक पॅटर्नचे कपडे हे आपल्याला हवे असतात. तुम्ही ट्रेडिशनल वेअर घालणारे असाल तर प्रत्येकवेळी काय शिवू ? कसा पॅटर्न शिवू असा प्रश्न नक्कीच पडतो. आता तुमचा हाच प्रश्न आज आम्ही सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आज आम्ही तुमच्यासाठी काही खास ड्रेसचे पॅटर्न निवडले आहेत.तुम्हीही येत्या काही दिवसात टेलरकडे जाणार असाल तर तुम्ही यंदा यातील काही पॅटर्न नक्कीच निवडू शकता.
सध्या ऑफ शोल्डर ड्रेसेसच्या फॅशनची चलती आहे. जर तुम्हाला थोडी वेगळी नेकलाईन आणि पॅटर्न हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा पॅटर्न शिवू शकता. ब्रॉकेड किंवा सिल्क अशा मटेरिअलचा कपडा तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा ड्रेस शिवू शकता. ब्रॉक्रेडचा कपडा तुलनेने थोडा कडक असल्यामुळे ऑफ शोल्डरसाठी लागणारी पकड चांगली मिळते.त्यामुळे टेलरलाही तो शिवायल बरा पडतो. आता राहिला प्रश्न बॉटम वेअरचा तर हल्ली सिगरेट पँट किंवा स्ट्रेट फिट पँट ही अनेकांना आवडतात. साधारण नी लेंथ पर्यंतचा टॉप शिवून तुम्ही त्या खाली टाईट फिट पँट घालू शकता.
जर तुम्ही ड्रेसपीस घेतला असेल तर तुम्ही आधी टेलरला विचारुन मगच हा पॅटर्न शिवा. सणासुदीसाठी आपण थोडे हेवी ड्रेसपीस घेतो अशा ड्रेसपीसचा असा पॅटर्न शिवायला काहीच हरकत नाही.
कपडा: ब्रॉकेट,जुनी काठापदराची साडी किंवा तत्सम
लुक: आता या ड्रेसमधील लुकचा विचार करत असाल तर मोकळा गळा असल्यामुळे तुम्ही गळ्यात छान चोकर घालू शकता. कोणत्याही लग्नसमारंभासाठी किंवा सणांसाठी तुम्ही अशाप्रकारचा ड्रेस घालू शकता.
जर तुम्ही मेनटेन असाल तर तुम्हाला हा पॅटर्न शिवायला काहीच हरकत नाही. विशेषत: तुम्ही कॉटन फ्रेंडली असाल तर तुम्ही असा एखादा पॅटर्न शिवाच. आता तुम्ही फोटोत पाहात असाल तर तुम्हाला कळेल की, या ड्रेस पॅटर्नमध्ये स्टँड कॉलर पट्टी दाखवण्यात आली आहे. तुम्ही यामध्ये राऊंड नेक किंवा अन्य कोणताही नेक पॅटर्न निवडू शकता. तुम्हाला थ्री फोर्थ हँड किंवा फुल हँड निवडता येईल. फ्रंट ओपन म्हणजेच तुम्हाला हा कट पुढील बाजूने असणार आहे. तुम्ही थोडे क्रिएटीव्ह असाल तर साईड कट देखील घेऊ शकता. पण असे करताना तुम्हाला त्याचा घेर थोडा वाढवाला लागेल. आणि आता राहिला पँटचा प्रश्न तर फ्रंट ओपन असल्यामुळे तुम्हाला तंग पँट घालता येणार नाही. त्यामुळे तुम्ही यासाठी पलाझो पँटची निवड करा.
कपडा: कॉटन, लायक्रा आणि कॉटन मिक्स अशा मटेरिअलची निवड करा.
लुक: आता हा ड्रेस थोडा ट्रेंडी असल्यामुळे तुम्हाला फक्त वेस्टर्न लुक ट्राय करता येईल असे नाही. तुम्ही यावर छान झुमके, टिकली असा लुक तुम्ही आरामात करु शकता.
हल्ली अनेकांना लाँग गाऊन घालायला आवडते. पण प्रत्येक ठिकाणी हा लाँग गाऊन तुम्हाला घालता येतोच असे नाही. पण तुमचा आवडीचा लाँग गाऊन तुम्ही थोड्या वेगळ्या अंदाजात शिवलात तर तो तुम्हाला चांगला दिसेल. आता हा फोटो तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की, या खाली एक लुझ पलाझो पँट आहे. गाऊन असल्यामुळे हा ड्रेस उंचीने लांब आहे. पण हा ड्रेस कुठूनही टाईड नाही. म्हणजे तुम्ही याचे लाँग स्लीव्हज आणि त्याचा घेर पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की, हा एखाद्या A लाईन ड्रेसप्रमाणे आहे. नेकलाईनचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी स्टँड कॉलर, कॉलर( बारीक), राऊंड (कमी डीप) असलेली नेकलाईन तुम्ही निवडू शकता. हा ड्रेस तुम्हाला अगदी कोणत्याही समारंभासाठी घालता येईल. पण तुम्ही याच्या कुडत्यासाठी फ्लोरल प्रिंटची निवड करु शकता.
कपडा: फ्लोरल प्रिंट ज्युट किंवा खादीचा थोडा जाडा कपडा
लुक: आता हा पॅटर्न थोडा सैल असल्यामुळे तुम्हाला ओढणी घेण्याची काहीच गरज नाही. यावर मस्त कोल्हापुरी चपला हातात ऑक्सडाईज कडं आणि कानातलं घातलं की झालं.
जर तुम्हाला चुडीदार आवडत असेल आणि अगदी टिपिकल पण वेगळा ड्रेस हवा असेल तर तुम्ही असा एखादा पॅटर्न निवडू शकता. आता हा सिल्क मटेरिअलमधील हा कुडता असून यावर एक ट्रेंडी आणि फॅन्सी ओढणी तुम्हाला घेता येईल. हल्ली खूप जणांना ड्रेसपेक्षा त्यावर घेतली जाणारी ओढणी महत्वाची वाटते. जर तुम्ही सिंग्लेट घालण्यात कम्फर्टेबल असाल तर तुम्ही असा एखादा शॉर्ट कुडता निवडून त्यावर ट्रेडिशनल चुडीदार निवडू शकता. तुम्ही अशा प्रकारचा ड्रेस शिवताना नेहमी गडद रंगाची निवड करा. कारण मग असे ड्रेस तुम्हाला एखाद्या कार्यक्रमांना घालता येतात. हिरवा, निळा, केशरी, लाल असे रंग यामध्ये चांगले दिसतात.
कपडा: सिल्क, जॉर्जेट असे कपडे तुम्ही निवडू शकता.
लुक: सिंग्लेट ड्रेस असल्यामुळे तुम्हाला हा ड्रेस थोडा बोल्ड वाटू शकेल. पण तुम्ही यावर मोत्याची ज्वेलरी घातली तर हा ड्रेस अधिक चांगला दिसू शकतो. आता सिंग्लेट असल्यामुळे तुम्ही त्यावर भरपूर ज्वेलरी घालू शकता. तुम्ही तुमच्या ड्रेसवरील सिक्वेन्सच्या रंगानुसार ज्वेलरी घालू शकता.
तुम्हाला पँटस आणि पलाझोमध्ये काही नको असेल तर तुम्ही धोती पँटसही निवडू शकता. ही तशी जुन्या काळातील फॅशन नव्या रुपात परतली आहे असे म्हणायला हरकत नाही. शॉर्ट कुडती आणि त्याखाली धोती पँटस असा याचा सर्वसाधारण लुक असतो. धोती ड्रेस घालताना एक गोष्ट लक्षात हवी की, जर तुम्हाला त्या धोतीचा अगदीच आऊट ऑफ फॅशन लुक नको असेल तर तुम्ही कॉटन मटेरिअलची निवड करा. हल्ली कॉट्नमध्ये भरमसाट व्हरायटी मिळते.अशावेळी तुम्ही असा एखादा पॅटर्न शिवू शकता. या ड्रेसचा टॉप हा नवरात्रीत मुलं घालतात तशा केडीया सारखा असतो. धोती पण कमी अधिक फरकाने केडीयाच्या ड्रेस प्रमाणेच असते.
कपडा: तुम्ही कॉटनमधील कोणतेही ड्रेस मटेरिअल निवडू शकता.
लुक: कधीतरी तुम्हाला मस्तमौला दिसावे असे वाटत असेल तर तुम्ही असा पॅटर्न नक्कीच निवडू शकता. तुम्ही ऑक्सडाईड कानातले किंवा अशा प्रकारचे दागिने तुम्ही यावर घालू शकता.
जर तुम्हाला जॉर्जेटमध्ये काही सेक्सी ट्राय करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारचा कुडता नक्कीच शिवू शकता. आता यासाठी तुम्हाला खास कपडा निवडावा लागेल. तुम्हाला जार्जेटमध्ये थोडा लाऊड कपडा घेता येईल.म्हणजे तुम्ही या फोटोप्रमाणे एखादा गोल्डन सिल्व्हर वर्क किंवा लेस असे काही या कपड्यावर करुन घेऊ शकता.आता या मध्ये शॉर्ट ब्लाऊज शिवून तुम्हाला त्यावर कळीचा असा अटॅज जॅकेट शिवता येईल. तुम्ही एखाद्या डेनिमवर अशा प्रकारचा ड्रेस अगदी सहज घालू शकता.
कपडा: जार्जेटचे कोणतेही प्रकार
लुक: आता हा ड्रेस जरी सेक्सी ड्रेसमध्ये मोडत असला तरी तुम्ही याला थोडा इंडियन टच दिला तरी चालू शकेल. यावर तुम्ही कोणतीही ज्वेलरी किंवा काहीही अगदी सहज घालू शकता.
कोल्ड शोल्डरची स्टाईल आता तशी जुनीच झाली म्हणायला हवी. पण जर तुमच्याकडे अशा प्रकारचा ड्रेस नसेल तर तुम्ही कोल्ड शोल्डर ड्रेस शिवायला हवा. तुम्ही अगदी कोणत्याही ड्रेसपीसमध्ये अशा प्रकारचा पॅटर्न शिवू शकता. कोल्ड शोल्डर पॅटर्न करताना तुम्हाला त्या मध्ये व्हरायटी करता येऊ शकते. आता तुम्ही हाताच्या लेंथचा विचार कराल तर तुम्हाला फ्लेअर्ड हँडसुद्धा ठेवता येईल.तुम्ही यामध्ये कोणतीही चांगली नेकलाईन निवडू शकता.
कपडा: कोणतेही ड्रेस मटेरिअल यासाठी चालू शकेल
लुक: कोल्ड शोल्डर पॅटर्न सगळ्यांनाच चांगला दिसतो. तुम्ही कोणत्याही पार्टीसाठी जर ट्रेडिशनल कपडे घालण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला असा पॅटर्न नक्कीच शिवता येईल.
जर तुम्हाला टिपिकल ड्रेस घालायला आवडत नसेल तर मग असा एखादा पॅटर्न ट्राय करायला हरकत नाही. आता जर तुम्ही ताग्यातून कपडे घेत असाल तर तुम्ही एखादा प्लेन आणि एखादा प्रिंटेड कपडा घेऊ शकता. तुम्हाला एका कपड्याचा गाऊन आणि त्यावर फ्रिल जॅकेट किंवा तुम्ही फ्रिल कुडता आणि त्यावर स्लिव्हलेस जॅकेट असं काहीतरी नक्कीच घालून पाहू शकता. आता तुम्ही ही फ्रिल बॉटमला किंवा स्लिव्हजला देखील शिवू शकता. तुम्हाला यात खूप विविधता आणता येईल. यात तुम्ही अनेक व्हरायटी आणू शकता. हा एखाद्या गाऊन प्रकारात मोडतो. तुम्ही जर ड्रेसपीस घेतला असेल तर तुम्ही तुमच्या पायजमाच्या कापडापासून जॅकेट बनवू शकता.
कपडा: तुम्ही कोणतेही मटेरिअल यासाठी निवडू शकता.
लुक: आता हा प्रकारही ट्रेडिशनल आणि चांगला दिसतो. त्यामुळे तुम्ही यावर मोती, ऑक्सडाईज किंवा अशा प्रकारचे कानातले यावर घालू शकता.
तुम्ही अगदी टिपिकल ड्रेस घालणारे नसाल आणि तुम्हाला काही वेगळं घालायचं असेल तर तुम्हाला हा पर्यायदेखील तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही शॉर्ट ब्लाऊजवर पँट शिवू शकता आणि त्यावर तुम्ही छान लाँग जॅकेट शिवू शकता. तुम्ही यावर बरेच प्रयोग करुन पाहू शकता. जर तुम्हाला पंजाबी ड्रेसमध्ये तुमची बॅक कशी दिसते याची चिंता सतावत असेल तर मग तुम्ही अशा प्रकारचा पॅटर्न शिवू शकता. आता तुम्हाला असे करताना बेस प्लेन किंवा जॅकेट प्लेन करा. तुम्हाला तुमचे डोके लावून तुम्हाला हवा तसा पॅटर्न तयार करु शकता.
कपडा: तुम्हाला यासाठी कॉटन कपड्याची निवड करता येईल.
लुक: हा ड्रेस जरी तुम्हाला फार बोल्ड वाटत असला तरी तुम्ही त्यावर इंडियन ज्वेलरी घालून पाहू शकता. म्हणजे एखादा लाँग नेकपीस यावर घालता येईल जर तुम्हाला गळ्यात काही घालायचे नसेल तर तुम्ही चांदबाली किंवा असे काही देखील घालू शकता.
थोडा वेगळा पॅटर्न तुम्हाला हवा असेल तर हा पॅटर्नही तुमच्यासाठी एकदम छान आहे. आता फोटोत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की, यामध्ये इंडिगो रंगाचा कुडता आहे आणि त्याच्या जोडीला पांढऱ्या रंगाची ओढणी आणि पांढरा स्कर्ट आहे. आता स्कर्ट पलाझो पँटप्रमाणे देखील तुम्ही शिवू शकता किंवा तुम्ही A लाईन स्कर्ट शिवू शकता. कुडता थ्री कट ठेवून तुम्हाला हा कुडता शिवता येईल.नवरात्री किंवा इतर कोणत्याही समारंभासाठी हा परफेक्ट ड्रेस आहे.
कपडा: कॉटनचा कोणताही कपडा चालू शकेल. प्रिंटेट आणि प्लेन असे कॉम्बिनेशन निवडणे जास्त गरजेचे आहे.
लुक: आता हा संपूर्ण इंडियनवेअर असल्यामुळे तुम्ही यावर डिझाईननुसार ज्वेलरीची निवड करु शकता. यावर तुम्ही मोजडी किंवा असे काही नक्की घालू शकता.
आता तुम्ही हे काही पॅटर्न शिवू शकता आणि ग्लॅमरस दिसू शकता.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.