ADVERTISEMENT
home / Hair Accessories
प्रत्येक महाराष्ट्रीयन वधूकडे केसांसाठी असायलाच हव्यात या (Hair Accessories For Girls)

प्रत्येक महाराष्ट्रीयन वधूकडे केसांसाठी असायलाच हव्यात या (Hair Accessories For Girls)

लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा क्षण आहे. हा दिवस अगदी खास असावा त्यासाठी त्याची तयारीही अगदी फार आधीपासून करण्यात येते.एकदा लग्न आटोपले की, तरीही म्हणावा तितका ताण कमी होत नाही. कारण लग्नानंतर खरी कसोटी सुरु होते. पाहुण्यांची उठबस,पूजा, नातेवाईकांची भेट, देवदर्शन असे सगळे काही सुरुच असते. अशावेळी साडी नेसण आणि केस बांधणं म्हणजे डोक्याला ताप होऊन जातो. अशावेळी तुमच्याकडे केस बांधण्यासाठी अशा काही hair accessories हव्यात ज्या तुम्हाला एवढ्या घाईगडबडीतही केस बांधण्यास मदत करतील.

महाराष्ट्रीयन लग्नाचा थाटच वेगळा (About maharashtrian wedding)

Instagram

महाराष्ट्रीयन लग्नाचा थाट काही औरच असतो. प्रत्येकाच्या लग्नाच्या विधी या वेगळ्या असल्या तरी देखील लग्नात सर्वसाधारणपणे  साखरपुडा, हळद आणि लग्न असाच क्रम असतो. महाराष्ट्रीयन लग्नामध्ये फार वेळ घालवला जात नाही. म्हणजे संगीत, मेहंदी असे सगळे सोहळे होत असले तरी ते फार फार दोन आणि जास्तीत जास्त तीन दिवसांपर्यंतच असतात.हल्ली थोड्या फार प्रमाणात मॉर्डन पद्धती काही ठिकाणी अवलंबल्या जात असतील.पण तरीदेखील हा सोहळा फार ताणला जात नाही. लग्नानंतर मात्र नववधूला लगेच उसंत मिळत नाही. देवदर्शन, पूजा, पै-पाहुण्यांची उठबैस ही सुरुच असते. एकूणच नववधूचे शेड्युल या दिवसांमध्ये जास्तच पॅक असते. 

ADVERTISEMENT

तसेच महाराष्ट्रीयन नाथ डिझाइन वाचा

प्रत्येक नववधूकडे असायलाच हव्यात या Hair accessories (Hair accessories that every maharashtrian bride must have)

घरात पाहुणे, कार्यक्रमांची रेलचेल त्यात नवीन घरात वावरताना प्रत्येक नववधूला अवघडल्यासारखे होत असेल. त्यात वेगवेगळ्या गोष्टींसाठी तयारी करताना तिच्याकडे काही गोष्टी अगदी तयारच हव्यात. म्हणजे साड्या, पंजाबी ड्रेस असं सगळं तयार हवं. या सगळ्यासोबत ट्रेडिशनलवेअरवर हेअरस्टाईलचीही काळजी घ्यावी लागते. तुम्हीही लग्न करणार असाल तर मग काही hair accessories या तुमच्याकडे अगदी असायलाच हव्यात. जाणून घेऊया या accerssories विषयी

केसांच्या वाढीसाठी असलेल्या आहाराबद्दल देखील वाचा

1. केसांचा आंबाडा (Hair bun )

ADVERTISEMENT

Instagram

साधारण सगळ्या साड्यांवर अगदी इटपट करता येणारी हेअरस्टाईल म्हणजे आंबाडा. वेगवेगळ्या हेअरकटमुळे हल्ली केसांचा आंबाडा बांधणे सहज शक्य होत नाही. अशावेळी जर तुम्ही रेडीमेड आंबाडा विकत घेतला.तर तो तुम्हाला पीनअप करुन केसांना लावणे फारच सोपे जाते. तुमचे केस लहान असले तरी तुम्हाला अगदी सहज हा आंबाडा बांधता येतो. आता या आंबाडा बाबत सांगायचे झाले तर वेगवेगळ्या प्रकारचे आंबाडे मिळतात. म्हणजे केसांच्या बटींच्या वेगवेगळ्या पद्धतीने हेअरस्टाईल करण्यात येतात. तुम्हीला हव्या तशा तुम्ही निवडू शकता. शिवाय यामध्ये तुम्हाला वेगवेगळे आकारही मिळू शकतील. हल्ली हे आंबाडे लावणे अधिक सोपे असते. कारण हल्ली ते क्लीपसारखे असतात. त्यामुळे ते लावणे आणि काढणे फारच सोपे जाते. शिवाय ही अॅसेसरीज अगदी बजेटमध्ये असते. 

लुक: जर तुम्ही साडी नेसणारे असाल तर ट्रेडिशनल साडीवर आंबाडा हा छान दिसतो. शिवाय तुमचे केस संपूर्ण वर बांधल्यामुळे तुम्हाला कामही अगदी सहज करता येतं. 

Also Read Hairstyle For Party

ADVERTISEMENT

2. आर्टिफिशिअल फ्लॉवर गजरा (Artificial flower gajra)

Instagram

आता केसांचा आंबाडा घालणार असाल तर तुम्हाला त्यावर गजरा अगदी घालायलाच हवा. आता दिवसर खऱ्या फुलांचा गजरा माळणे हे शक्य नसते. मोगरा किंवा तत्सम फुलांचा गजरा हा लगेचच बावतो. यामुळेच अनेकजण गजरा किंवा आंबाड्यामध्ये फुले माळणे टाळतात. पण बाजारात हल्ली इतके सुंदर रेडिमेड गजरे मिळतात की, ते तुमच्या आंबाड्याची शोभा वाढवतात. आर्टिफिशिअल फ्लॉवर किंवा मोती या सांरख्या प्रकारामध्येही हल्ली अशाप्रकारचे गजरे मिळतात. 

लुक: आता जर तुम्ही लुकचा विचार करत असाल तर तुम्हाला कोणत्याही आंबाड्यावर किंवा हेअर डुजवर ते चांगले दिसू शकतात. तुम्हाला हव्या त्या रंगात ते मिळत असल्यामुळे तुम्ही तुमच्या प्रत्येक साडीनुसार ते घेऊ शकता किंवा तुम्हाला गोल्डन / सिल्व्हर कलर  असे रंगही यामध्ये निवडता येतील.

ADVERTISEMENT

नवरीचा शृंगार असतो खास… पुण्यातील या ठिकाणी करता येईल Best Bridal Makeup

3. डायमंड पिन्स (Diamond pins)

Instagram

जर तुम्हाला काही बेसिक हेअर स्टाईल्स माहीत असतील तर तुम्ही डायमंड पिन्सचा वापर करुन थोडे हटके दिसू शकता. तुम्हाला या पीन्स फक्त पिनअप करता यायला हव्यात. जर तुम्ही पफ, फ्रेंच रोल अशा सारख्या हेअर स्टाईल्स करताना या पिनांचा अगदी चांगला उपयोग तुम्हाला करता येऊ शकतो. या  शिवाय आंबाडा, वेणीमध्येही तुम्ही अशाप्रकारच्या डायमंड पिन्स खोचू शकता. 

ADVERTISEMENT

लुक:  साडी, ड्रेस, लेहंगा अगदी काहीही घातलं असेल आणि तुम्ही अगदी बेसिक हेअरस्टाआईल केली असेल पण तुम्हाला उठून दिसायचे असेल तर तुम्ही या डायमंड पिन्सचा वापर करु शकता.

4. हेड चेन (Pearl head chain)

Instagram

काहींना बाकीच्या सगळ्या गेटअपपेक्षा त्यांच्या चेहऱ्याकडे केसांकडे लोकांनी पाहावे असे वाटते तुम्हालाही तुमचे सुंदर केस दाखवायची इच्छा असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या हेड चेन्स, आंबाडा चेन्स निवडू शकता. आता या प्रकारची अॅसेसरीज तुम्हाला रोज घालता येणार नाही. तर तुम्हाला त्या कार्यक्रमादरम्यानच घालता येईल. तुम्ही जर नाजूक चेन निवडल्या तर तुम्हाला त्या एखाद्या इव्हेंटला वापरता येतील. अनेकदा अशा चेन तुमच्या कानातल्यांच्या मागूनही तुम्हाला घालता येतात. यात बरीच व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल.

ADVERTISEMENT

लुक:  हेड चेन हा प्रकार फारच ट्रेडिशनल असतो. तुम्ही लेहंगा किंवा एखाद्या ट्रेडिशनल ड्रेसवर मोकळे केस किंवा आंबाडे अशी हेअरस्टाईल केली असेल तर तुम्हाला ते घालता येईल.

वाचा – 25 नवीनतम आणि सोपे वधूसाठी मेहंदी डिझाइन

5. हेअर ब्रोच (Hair brooch)

Instagram

ADVERTISEMENT

कसेही केस बांधा तुम्हाला केसाला एका झटक्यात जर काही वेगळा लुक देऊ हवा असेल तर तुम्ही हेअर ब्रोच देखील वापरु शकता. हेअर ब्रोच लावणे फारच सोपे असते. तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल केली असेल तरी देखील तुम्हाला त्यावर ब्रोच लावता येतो अनेक जण अशाप्रकारचे ब्रोच घरी बनवतात देखील. पण हल्ली इतके छान हेअर ब्रोच मिळतात की, तुम्ही त्या विकत नक्कीच घ्यायला हव्यात. 

लुक: आंबाडा, पफ आणि मोकळे केस, फ्रेंच ट्विस्ट अशा कोणत्याही हेअरस्टाईलवर तुम्ही हेअर ब्रोच लावू शकता तुम्ही तुमच्या कपड्यानुसार हेअरस्टाईल निवडून मगच हेअर ब्रोच निवडा छान दिसेल.

6.फॅन्सी हेअर पिन्स (Fancy hair pins)

Instagram

ADVERTISEMENT

आता तुम्ही अगदीच ट्रेडिशनल वगैरे असे काही घालणारे नसाल आणि तुम्हाला पटकन असे काही घालायचे असेल तर तुम्ही फॅन्सी हेअर पिन्स वापरु शकता. हल्ली अनेकांना आंबाडा घालायला आवडतच असे नाही. खूप वेळा हेअर पफ करुन काहीतरी हेअर स्टाईल केली जाते. अशावेळी टिकटॅक पीन्स किंवा असे वापरावे लागतात. जर ते थोडी फॅन्सी असेल तर त्याचा लुक अगदी खासच असतो. 

लुक: अगदी कधीही तुम्हाला हे क्लीप लावता येतील. त्यामुळे कोणत्या विशेष दिवसाची वाट पाहण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही.

7. हेअर बन ब्रोच (Hair bun brooch)

Instagram

ADVERTISEMENT

आता तुम्ही म्हणाल हा आाणखी वेगळा प्रकार कोणता ? आता हा वेगळा प्रकार तुमच्या बन म्हणजेच आंबाड्याला लावू शकाल असा असतो. त्यामुळे तुम्ही जर आंबाडा घालणारे असाल तर तुमच्याकडे ही अॅसेसरीज हवी. मेटल, आर्टिफिशिअल फ्लॉवर,मोती, डायमंड स्टडेट अशा अनेक प्रकारामध्ये तुम्हाला हे हेअर बन ब्रोच मिळू शकतात. हा एकच ब्रोच घातल्यानंतर तुम्हाला अजून काहीही घालण्याची काहीही गरज नाही. 

लुक:  आंबाड्यासाठी हा ब्रोच एकदम परफेक्ट आहे. कारण तुम्ही सहज हा ब्रोच वापरु शकता.

नवरीसाठी खास ‘बजेट’मधील ५० भारतीय दागिन्यांचे डिझाईन्स (Indian Jewellery Designs In Marathi)

8. फ्लॉवर हेअर पीन (Flower hair clip)

ADVERTISEMENT

Instagram

फ्लॉवर हेअर पिन्स हा देखील एक ट्रेंड सध्या या दागिन्यांमध्ये दिसत आहे. जर तुम्हाला फुलं माळायला आवडत असतील म्हणजे आर्टिफिशिअल फुलं माळणं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अगदी नाजूक असा प्रकार नक्कीच ट्राय करु शकता. गुलाब, लिली, आर्किड अशी काही फुले यामध्ये मिळतात. ती अगदी हुबेहूब दिसतात. त्यामुळे ते दिसायला छान दिसतात. सिंगल फुलं किंवा मल्टीपल अशा फुलांच्या अरेंजमेंटमध्ये तुम्हाला हे पिन चांगले दिसतात. 

लुक: कोणत्याही हेअर स्टाईलवर तुम्ही अशा प्रकारच्या पीन्स लावू शकता. तुम्ही फुलांच्या रंगानुसार याची निवड करु शकता.

9. मोत्यांचा गजरा (Pearls gajra for bun)

ADVERTISEMENT

Instagram

मोत्यांच्या अॅसेसरीजही अनेकांना आवडतात. हल्ली केसांच्या अॅसेसरीजमध्येही मोत्यांचे काही प्रकार मिळतात. आपण वर जो प्रकार पाहिला तो आर्टिफिशिअल फुलांचा होता. पण आता त्याहीपेक्षा अधिक वापरला जातो तो म्हणजे मोत्याचा गजरा. जास्त काळ टिकू शकेल असा हा गजऱ्याचा प्रकार आहे. 

लुक: तुम्हाला कोणत्याही हेअर डुजवर अशाप्रकारे मोत्यांचे गजरे लावता येतील.मोत्यांच्या सिंगल सरीपासून ते फुलांच्या आकारात गुंफलेले मोती आंबाड्याभोवती गुंडाळू शकता. पांढरे असल्यामुळे ते अगदी मोगऱ्याप्रमाणे दिसतात.

10. फॅन्सी हेअर कंगवा (Flower hair comb)

ADVERTISEMENT

Instagram

जर तुम्हाला फक्त तुमचे मधले केस घेऊनच काही हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही अशाप्रकारचे कंगवे वापरु शकता.कंगव्याप्रमाणे असूनही ते तुमच्या केसांमध्ये अगदी सहज बसतात. चांगले राहतात. हल्ली तर या कंगव्यामध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात. हल्ली तर अनेक ब्रोचच्या खाली देखील अशाप्रकारे कंगवे असतात. 

लुक: कोणत्याही वेस्टर्न आऊटफिटवर साधी-सोपी हेअरस्टाईल करताना फॅन्सी हेअर कंगवा अगदी कमाल करतो.

तुम्हालाही पडू शकतात हे प्रश्न (FAQ)

ADVERTISEMENT

Instagram

हेअर ज्वेलरीचे वेगवेगळे प्रकार कोणते? (What are different types of hair jewellery? )

तुमच्या केसांमध्ये लावल्या जाणाऱ्या सगळ्या ज्वेलरीला हेअर अॅसेसरीज म्हणतात. हेअर ज्वेलरीचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुमच्या आंबाड्याला लावण्यासाठी तुम्हाला केसांची वेणी, हेअर पिन्स, हेअर चेन असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला त्यामध्ये मिळू शकतात. त्यामुळे तुमचे केस लांब असतील तर तुम्ही हेअर ज्वेलरीचा वापर करु नक्कीच करु शकता.

केसांसाठी कोणता बन वापरणे सोपे असते? (Which hair bun is easy to use?)

तुमच्या केसांच्या प्रकारानुसार तुम्ही तुमच्यासाठी हेअरबनची निवड करु शकता. आता जर तुमचे केस अगदीच पातळ असतील तर तुम्ही फार मोठा हेअर बन निवडू नका.कारण असे मोठे हेअर बन तुमच्या केसांना बसणार नाहीत. हल्ली क्लीप असलेले हेअर बन देखील मिळतात ते लावायला तुलनेने सोपे असतात. म्हणजे तुम्हाला इतर कोणत्याही क्लीपप्रमाणे ते लावता येतील. तुमचे केस जाड असतील तर तुम्ही जाळीचा उपयोग आंबाड्यासाठी करा कारण तुमच्या केसांचे वजन आणि आंबाड्याचे वजन तुम्हाला जास्त होऊ शकते.

केसांसाठी लहान पीन वापरले तर चालेल का? (Is it ok to use small hair pins)

तुमच्या केसांवर ही गोष्ट अवलंबून आहे. तुम्ही केसांच्या लहान लहान बट काढून जर काही हेअरस्टाईल करणार असाल तर तुम्हाला तुमच्या केसांसाठी लहान पीन वापरता येतील. शिवाय तुम्ही तुमच्या केसांना अशा पीन्स वापरताना जर त्यावर काही डिझाईन निवडली तर ते अधिक चांगले दिसतात. 

ADVERTISEMENT

हेअर अॅसेसरीज ऑनलाईन विकत घेतल्या तर चालतील का? (Is it ok to buy hair accessories online )

हल्ली सगळ्यात सोपी शॉपिंग असते ती म्हणजे ऑनलाईन.तुम्हाला Flipkart, Amazon या सारख्या वेबसाईटवर तुम्हाला चांगल्या अॅसेसरीज मिळू शकतील. खिशाला परवडणारे असे त्यांचे दर असतात. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी ऑनलाईन घेतल्या तरी चालतील.

हेअर अॅसेसरीज परत वापरु शकतो का? (Hair accessories are reusable?)

Instagram

हेअर अॅसेसरीज या परत वापरण्यासारख्याच असतात. तुम्ही त्यांचा वापर पुन्हा करु शकता. उलट तुम्ही तुमची हेअर अॅसेसरीज शेअरसुद्धा करु शकता. या मेनटेन करणे फारच सोपे असते.त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचेही काही कारण नाही.

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच   POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा. 

23 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT