ADVERTISEMENT
home / Love
जोडीदारापासून दूर असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा (Long Distance Relationship Tips)

जोडीदारापासून दूर असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा (Long Distance Relationship Tips)

प्रेम हे कधीच अंतर पाहात नाही. त्यामुळे  एकमेकांपासून अंतराने दूर असलेल्या व्यक्तीदेखील मनाने एक होतात. यालाच आपण Long distance relationship असं म्हणतो. पण हे नातं टिकवताना फार काळजी घ्यावी लागते. इतर कोणत्याही नात्याच्या तुलनेत हे नाते अत्यंत नाजूक असते. तुम्ही Long distance relationship मध्ये असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती हे नातं सुरु करताना हवी. तरच तुम्ही तुमचे नाते अगदी शेवटापर्यंत टिकवू शकता. 21 व्या शतकात राहताना केवळ आणाभाकाच चालत नाही. तर काही advnce गोष्टी सुद्धा लक्षात घ्यावा लागतात. पाहुया अशाच काही गोष्टी

एकमेंकापासून दूर असाल तर या 25 गोष्टी माहीत हव्यात (Things To Do In Long Distance Relationship)

तुम्हालाही तुमचे Long distance relationship चे नाते अधिक खुलवायचे असेल तुमच्या जोडीदाराला तुम्हाला आनंदी ठेवायचे असेल तर मग तुम्ही हमखास या 25 गोष्टींचे पालन करायला हवे

1. प्रेम दाखवा (Show Your Love)

प्रेम दाखवा

shutterstock

ADVERTISEMENT

प्रेम आहे ते प्रत्येक वेळी कशाला सांगायला हवं असं तुम्हाला वाटत असेल तर असं अजिबात नाही. प्रेमाचा नियमच असा आहे की, तुम्ही तुमचे प्रेम दाखवायला शिका. कारण जर तुम्ही प्रेम न दाखवता असा विचार करत असाल की, समोरच्याने ते समजून घ्यायला हवं. तरं असं इतरवेळी चालू शकेल. पण Long distance relationship मध्ये तुमच्यातील अंतर इतके असते की, तुम्ही वेळोवेळी समोरच्याला तुमचे प्रेम दाखवणे गरजेचे असते. 

उदा. तुमचे अंतर खूप असेल तुमच्या कामाच्यावेळाही वेगळ्या असतील पण दिवसभरातून प्रेमाचा एक मेसेज तुमच्या दोघांमधील विश्वास वाढवत असतो. त्यामुळे शक्य तितक्यावेळा तुमचे प्रेम दाखवा (हे प्रेम दाखवण्यासाठी शाहरुख खान होण्याची काहीही गरज नाही बरं का!)

2. संपर्कात राहा (Be In Touch)

एकमेकांच्या संपर्कात राहणे फार महत्वाचे असते. तुम्ही अगदी कुठेही बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर त्याची माहिती तुमच्या पार्टनरला हवी. तुम्ही जितके जास्त संपर्कात राहाल तितके तुम्ही एकमेकांना ओळखू लागता. त्यामुळे keep in touch चा मंत्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. 

उदा. तुम्ही एका देशात राहणारे नसाल तर अशावेळी तुम्हाला एकमेकांची जास्त गरज असू शकते. त्यामुळे तुम्ही जितके एकमेकांसोबत बोलू शकाल तितके चांगले. आता वेगवेगळ्या देशात असाल तर अनेकदा असे होते की, वेळा जुळून येत नाही. पण तरी देखील हे तुमच्या हातात आहेत की, तुम्हाला शक्य होईल तसा वेळ काढून तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. तुमचा एक कॉल, एक मेसेज किंवा एखादा मेल खूप फरक घडवू शकतो. तुमचे नाते अधिक घट्ट करु शकतो.

ADVERTISEMENT

3. प्रामाणिक राहा (Stay Honest)

Long distance relationship मध्ये प्रामाणिकपणा हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. तुम्ही एकमेकांना जाणून घेताना तुमच्याबाबतीतली प्रत्येक गोष्ट तुमच्या जोडीदाराला सांगायला हवी. तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या नात्यामध्ये बळकटी आणण्यास फार  मदत करत असतो. 

उदा. तुम्ही यापूर्वीही कोणत्या रिलेशनशीपमध्ये असाल काही कारणास्तव तुमचे ते नाते टिकू शकले नसेल तरी देखील त्या नात्याविषयीची माहिती तुमच्या जोडीदाराला द्या. त्यामुळे तुम्ही कशी व्यक्ती आहात हे समोरच्याला कळेलच. पण तुम्ही काही लपवून ठेवत नाही हे देखील त्या व्यक्तीला कळाल्यामुळे तुमच्याविषयीचा विश्वास वाढेल.

4. एकमेकांना वेळ द्या (Give Time To Each Other)

Couple Kissing Each Other

shutterstock

ADVERTISEMENT

Long distance relationship मध्ये प्रामाणिकपणा हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. तुम्ही एकमेकांना जाणून घेताना तुमच्याबाबतीतली प्रत्येक गोष्ट तुमच्या जोडीदाराला सांगायला हवी. तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या नात्यामध्ये बळकटी आणण्यास फार  मदत करत असतो. 

उदा. तुम्ही यापूर्वीही कोणत्या रिलेशनशीपमध्ये असाल काही कारणास्तव तुमचे ते नाते टिकू शकले नसेल तरी देखील त्या नात्याविषयीची माहिती तुमच्या जोडीदाराला द्या. त्यामुळे तुम्ही कशी व्यक्ती आहात हे समोरच्याला कळेलच. पण तुम्ही काही लपवून ठेवत नाही हे देखील त्या व्यक्तीला कळाल्यामुळे तुमच्याविषयीचा विश्वास वाढेल.

5. सकारात्मक बोला (Talk Positive)

तुम्हाला आयुष्यात relationship मध्ये कितीही वाईट अनुभव आले असले तरी देखील तुम्ही एखाद्या नव्या नात्यात असताना त्या नात्याविषयी नेहमीच सकारात्मक बोलणे गरजेचे असते. तुम्ही एकमेकांसोबत आनंदी असाल तर ते तुमच्या बोलण्यातून दिसू द्या. तुमच्या नात्याविषयी कायम सकारात्मक बोला. तुमचे नाते चांगले राहणार असे एकमेकांना जाणवू द्या.

उदा. प्रेमात कोणालाही नकारघंटा आवडत नाही. जर तुम्ही सतत तुमच्या नात्यावर शंका उपस्थित करत असाल तर असे नाते धोक्यात जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या नात्याविषयी नेहमी सकारात्मकच बोला.

ADVERTISEMENT

#MyStory… आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती

6. भविष्याविषयी बोला (Talk About Future)

Long Distance RelationshipTips In Marathi

shutterstock

प्रेमात भविष्याविषयी बोलायला अनेकांना आवडते. प्रेम, लग्न, संसार, मुलं, नातेवाईक आणि आनंद या गोष्टी अनेकांना आवडत असतात. आपल्या आवडत्या जोडीदारासोबत आयुष्यातील स्वप्न रंगवण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. त्यामुळेच तुम्ही तुमच्या प्रेमाच्या आयुष्याचे उद्दिष्ट ठरवा. तुमच्या नात्यात बळकटी आलेली तुम्हाला नक्कीच जाणवेल. 

ADVERTISEMENT

उदा. तुम्हाला लग्न कशापद्धतीने करायचे आहे. हनीमूनला कुठे जायचे आहे. तुमच्या दोघांची खोली तुम्हाला कशी सजवायची आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलू शकता. 

7. काही गोष्टी एकत्र करा (Do Things Together)

आता लांब आहोत म्हणून एकत्र असे काही करु शकत नाही असे नाही. तुम्ही दोघं एकाचवेळी एखादे पुस्तक किंवा एखादी वेबसिरीज बघायला सुरु करु शकता. एकमेकांसाठी वेबसीरिज निवडताना तुम्ही एकमेकांना बरेच काही सुचवू शकता. अशा प्रकारे तुम्ही काही गोष्टी दूर असूनही एकत्र करु शकता. खरं सांगायचं तर यातच खरी गंमत आहे. कारण तुम्ही त्यानंतर त्याविषयी अगदी तासनतास बोलू शकता.

*virgin असाल तर तुम्हाला या गोष्टी जाणून घेण्याची आहे गरज

8. एकमेकांमधील चांगल्या गोष्टींविषयी सांगा (Talk About Good Qualities In Each Other)

तुम्हाला एखागी व्यक्ती का आवडते ते तिला माहीत हवे. तुम्हाला तुमच्या जोडीदारामधील काही गोष्टी खऱ्याच आवडत असतील तर तुम्ही त्याला त्या नक्की सांगा. तुम्ही त्याची तारीफ केली तर तो हुरळून जाईल असा विचार अजिबात करु नका. उलट तुम्ही त्याला किंवा तिला त्यांच्यातील गुणांविषयी सांगाल तर त्या व्यक्तीला नक्कीच आणखी चांगले होण्याची इच्छा होईल. तो त्याच्यातील अवगूण कमी करायचा प्रयत्न करेल. 

ADVERTISEMENT

9. वाईट गोष्टींविषयी देखील सांगा (Talk About Like Dislikes)

Couple Enjoying Together

shutterstock

आता नुसतीच तारीफ करु नका. तुमच्या जोडीदाराची जी गोष्ट चुकीची आहे ती देखील तुम्ही त्याला सांगायला हवी. कारण त्यामुळे तो त्याच्यात बदल घडवून आणू शकतो. 

उदा. काहींना काहीही क्षुल्लक कारणावरुन रागवायची सवय असते. तुमच्या जोडीदराला अशी सवय असेल तर मग तुम्ही त्याला त्याचा राग कसा आवरायचा ते सांगायला हवे तरच तो स्वत:मध्ये बदल घडवून आणू शकेल.

ADVERTISEMENT

10. प्रत्येक दिवस करा शेअर (Share Each Day)

तुम्ही लांब असलात म्हणून काय झाले तुम्ही तुमचा प्रत्येक दिवस शेअर करु शकता. त्यामुळे तुमचा एकमेकांसोबतच संपर्क अधिक वाढतो. त्यामुळे दिवसाअखेरीस तुम्ही काय काय केले ? किंवा तुम्ही उद्या काय करणार आहात ही गोष्ट तुमच्या पार्टनरला सांगा. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरशी काहीच लपवत नाही असे होते. त्यामुळे आलेला प्रत्येक दिवस शेअर करा. 

उदा. तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेला असाल तुम्ही छान फोटो काढला असेल तर तुम्ही तो सोशल मीडियावर अपलोड करण्याआधी तुमच्या पार्टनरसोबत शेअर करा. 

11. एकमेकांचा आधार व्हा (Be There For One Another)

चांगल्या नाही तर प्रत्येक वाईट काळातही तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ अपेक्षित असते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वाईट काळात त्याची साथ देऊ शकत असाल तर नक्कीच त्याला तुमचा आधार वाटू शकतो. आयुष्यातील प्रत्येक गोष्टी तो तुम्हाला त्यामुळे हक्काने सांगू शकतो. 

उदा. नोकरीच्या ठिकाणी काही तक्रारी असतील तर तुम्ही सगळ्यात आी तुमच्या जोडीदाराला सांगा या शिवाय तुम्हाला काही त्रास असतील तर ते सांगायला तुम्ही अजिबात विसरु नका.

ADVERTISEMENT

12. एकमेकांना अपडेट करत राहा (Update Each Other)

दूर असल्यानंतर प्रत्येकाला भिती असते ती फसवणुकीची त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा तुम्ही एकमेकांना अपडेट करा. कारण एकमेकांना अपडेट करणे चांगले असते. 

उदा. तुमचा एखादा प्लॅन, तुम्ही सोडून कोणत्याही व्यक्तीसोबत तुम्ही बाहेर जाणार असाल तर जोडीदाराला सांगा. तुम्ही ही गोष्ट सांगितली तरच त्या व्यक्तीला तुमच्यावर अधिक विश्वास बसू शकेल.

13. कुटुंबाची ओळख करुन द्या (Get To Know The Family)

कुटुंबाची ओळख करुन द्या

shutterstock

ADVERTISEMENT

काही नाती योग्य वेळी योग्य रुपात रुपांतरीत झाली तरच त्यांना अर्थ असतो. तुम्ही long distance relationship मध्ये असाल तर तुम्हाला एक पाऊल पुढे न्यायलाच हवे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्याचा विचार करत असाल तर तुम्ही एकमेकांच्याकुटुंबाची ओळखही करुन घ्यायला हवी. त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या नाते अधिक मजबूत करायला मदत होईल.

14. एकमेकांचे वेळापत्रक जाणून घ्या (Know Each Other’s Schedule)

नात्यात अडचणी तेव्हाच सुरु होतात.जेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटत राहते की, तुमच्यासाठी त्या व्यक्तीकडे वेळ नाही ही गोष्ट. हा गोंधळ टाळायचा असेल तर तुम्हाला एकमेकांचे वेळापत्रक जाणून घेणे गरजेचे आहे. 

उदा. तुम्ही वेगळ्या देशात असाल किंवा तुमचे क्षेत्र वेगळे असेल तर नक्कीच कामाच्या वेळा या वेगळ्या असू शकतात. त्यामुळे तुम्ही हा गोंधळ टाळण्यासाठी एकमेकांचे वेळापत्रक जाणून घ्या. 

15. एकमेकांचा आदर करा (Respect One Other)

प्रत्येक व्यक्तीही वेगळी असते. त्यामुळे तिची निर्णय घेण्याची क्षमता, निर्णय घेण्याचा प्रकारही वेगळा असून शकतो. त्यामुळे एकमेकांच्या निर्णयाचा आदर करायला तुम्ही शिकायला हवे. प्रत्येकाच्या निर्णयाचा तुम्ही आदर करायला हवा. तरच तुमच्यामधील प्रेम वाढू शकेल. 

ADVERTISEMENT

16. व्हिडिओ कॉल करा (Make A Video Call)

व्हिडिओ कॉल करा

shutterstock

हल्ली टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की, तुम्ही कितीही लांब असलात तरी देखील तुम्हाला एकमेकांचा चेहरा पाहता येऊ शकतो. तो केवळ एका व्हिडिओ कॉलमुळे. दिवसातून तुम्हाला जितके शक्य असेल तितक्या वेळा एकमेकांना व्हिडिओ कॉल करा.समोरील व्यक्तीच्या व्हिडिओ कॉलची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ कॉल करा.

17. एकमेकांसाठी खरेदी करा (Shop For Each Other)

एकमेकांसाठी खरेदी करताना तुम्हाला त्या व्यक्तीची आवड निवड कळत असते. तुम्हाला एखाद्यााठी फार मोठी वस्तू खरेदी करण्याची काहीच गरज नसते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंद देऊ शकता. यामध्ये तुमचे प्रेम दिसून येत असते. 

ADVERTISEMENT

18. तुमचे खास दिवस करा सेलिब्रेट (Celebrate Your Special Day)

Couple Hugging Each Other

shutterstock

आयुष्य असतेच साजरे करण्यासाठी. त्यात तुम्ही long distance relationshipमध्ये असाल तर मग तुम्हाला तुमचे खास दिवस साजरे करता यायलाच हवे. तुम्ही कधी भेटलात तो दिवस, तुमची पहिली डेट, वर्षपूर्ती तुम्ही नक्कीच साजरी करायला हवी. 

19. एकमेकांना द्या गोड सरप्राईज (Give A Sweet Surprise)

Surprise Your Partner

ADVERTISEMENT

shutterstock

एकमेकांना सरप्राईज देणे हे किती आनंदाचे असते हे तुम्हाला एखादा सरप्राईज प्लॅन केल्यानंतर नक्कीच कळेल. तुमच्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती तिच्यासाठी काही छोटे छोटे सरप्राईज प्लॅन करा. 

उदा. एखादी भेट, एखादी ऑनलाईन गिफ्ट असे काहीतरी तुम्ही नक्कीच करायला हवे. तुमच्या जोडीदाराला मिळालेला आनंद तुम्हालाही आनंद देऊन जाईल. 

20. अति काळजी करु नका (Stop Being Over Possessive)

हो आम्हाला ही गोष्ट अगदीच कळू शकते की, तुमचे तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम आहे. पण याचा असा अर्थ होत नाही की, तुम्ही तिची अति काळजी करायला हवी. कारण ही अति काळजीही अनेकांच्या डोक्याला ताप देते. काळजीचे रुपांतर संशयात व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे खूप काळजी करणं सोडा. प्रत्येकाला एकमेकांची स्पेस द्या.तरच तुम्ही मोकळेपणाने जगू शकाल.

ADVERTISEMENT

21. कारणे देऊ नका (Avoid Excuses)

कारणे देऊ नका - Long Distance Relationship Tips In Marathi

shutterstock

नात्यात एकमेकांना समजून घेणे ही गोष्ट जितकी खरी आहे. तितकी ही गोष्ट ही महत्वाची आहे की, समोरच्याच्या सहनशक्तीचा अंत होईपर्यंत तुम्ही कारणं देऊ नका. कारण प्रत्येकवेळी तुम्ही दिलेल्या सबबी तुमच्या नात्यात अडचणी निर्माण करु शकतात. त्यामुळे नात्यात सतत कारणं देणं टाळा. 

उदा. कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन होत असेल आणि तरीदेखील तुम्ही प्रत्येकवेळी काही कामामुळे टाळत असाल तर तुमच्या कारणं देण्याचा प्रकार जोडीदाराला संशयास्पद वाटू शकतो. 

ADVERTISEMENT

22. भूतकाळात डोकावू नका (Don’t Sneak Into Past)

आता प्रत्येकाचेच पहिले प्रेम तुमच्यावरच असेल असे सांगता येत नाही. काहींच्या आयुष्यात अनेक रिलेशनशीप असतात. त्या व्यक्तीने तुम्हाला त्याबद्दल सांगितले असेल तर सतत त्या गोष्टी उकरुन काढणे चांगले नाही.काही जणांना एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीने सांगितली की, ही त्याच्या किंवा तिच्या भूतकाळातील असावी असे वाटत राहिल्यामुळे तुम्ही विनाकारण भांडत राहता. 

उदा. तुमच्या जोडीदाराचे आधीच रिलेशनशीप असेल त्याने ही माहिती तुम्हाला दिली असेल पण तुमच्यात काही कुरबुर झाल्यानंतर तुम्ही जर सतत तुमच्या भूतकाळात डोकावून पाहात असाल तर ही गोष्ट अजिबात चांगली नाही. त्यामुळे तुमचे नाते धोक्यात येऊ शकते.

23. भेटण्याचा प्लॅन करा (Plan To Meet)

एखादी भेट तुमच्या आयुष्यात काय बदल करु शकते हे तुम्हाला Long distance relationship मध्ये असल्यावर नक्कीच कळेल. तुमच्या पार्टनरची खरी किंमत तुम्हाला यामुळे करु शकते. तुम्हाला काही काळ एकत्र घालवता येईल असा काहीतरी प्लॅन करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्यात फार अंतर असल्याचे जाणवणार नाही. 

उदा. महिन्यातून एकदा एखादा मुव्ही प्लॅन आखा.मस्त तीन तास तुमच्या जोडीदारासोबत एकांतात घालवण्यात येतो किंवा मग एखाद्या रिसोर्टमध्ये मस्त निवांतपणे वेळ घालवा.

ADVERTISEMENT

24. Dirty talk नक्कीच चालू शकेल (Dirty Talks For Long Distance Relationship)

Dirty Talks For Long Distance Relationship

shutterstock

रिलेशनशीपमध्ये काही वर्ष घालवल्यानंतर आणि एकमेकांचा विश्वास संपादन केल्यानंतर प्रत्येकालाच सेक्सची गरज असते. आता  Long distance relationship मध्ये असल्यावर तुम्हाला अशी संधी सतत मिळू शकत नाही. अशावेळी तुम्ही एकमेकांसोबत Dirty sex टॉक करु शकता. आता डर्टी टॉकमध्ये एकमेकांच्या शरीराबद्दल, अवयवांबद्दल असे काही बोलणे येते.

उदा. अनेकदा dirty  टॉकमध्ये या सेक्सशी संबंधित मेसेज असतात. तुमचे नाते चांगले असेल तर तुम्ही अशाप्रकारचे मेसेज अधूनमधून करायला काहीच हरकत नाही. कारण असे मेसेज तुमच्या नात्यामधील स्पाईस कायम ठेवत असतात.

ADVERTISEMENT

25. दुर्लक्ष करु नका (Don’t Overlook Situation)

नात्यात कधीही दुर्लक्ष करु नका अगदी कोणताही कठीण प्रसंग तुमच्या दोघांच्या आयुष्यात आला असेल तरी देखील तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करु नका. एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. त्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेली एकमेकांची किंमत नक्कीच कळायला मदत होईल 

नात्यात दूर असल्याबरोबर तुम्हाला नक्कीच पडू शकतात हे प्रश्न (FAQs)

1. तुमचे एकमेकांपासून दूर असलेले नाते सुरळीत सुरु आहे हे कसे समजावे?

Long distance relationship मध्ये असणाऱ्यांना त्यांचे नाते सुरळीत सुरु आहे की नाही हा प्रश्न अगदी हमखास पडतो. जर तुम्ही एकमेकांना सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत हे तुम्हाला पुरेपूर पटत असेल तर तुम्ही नात्यात खरे आहात हे समजते. कोणताही निर्णय घेताना तुम्ही समोरच्याला विचारत असाल तर त्याचे मत तुम्हाला घेणे महत्वाचे वाटत असेल तर तुम्हाला हे नाते हवे आहे असे कळते. जर दोन्ही बाजूने या गोष्टी होत असतील तर तुमचे नाते सुरळीत सुरु आहे असे समजावे.

2. अशा नात्यांमध्ये विश्वास ठेवणे कठीण असते का?

Long distance relationship मध्ये जर पहिली कोणती गोष्ट महत्वाची असते तो म्हणजे विश्वास. अनेकदा होत असं की, काहींना पूर्वानुभवामुळे कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवणे जरा कठीण असते. त्यातच long distance relationship असेल तर मग अंतरामुळे ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. समोरची व्यक्ती आपल्याशी खरं बोलतेय ना? असे वाटणे अगदी साहजिक आहे. पण तुम्ही नात्यात थोडा वेळ घ्या. एकमेकांना समजून घ्या. जर प्रेम खरं असेल तर मग तुम्हाला वाटणारी भिती कमी होत जाईल.

3. एकमेकांपासून दूर असूनही नाते घट्ट कसे करावे?

तुम्ही एकमेकांपासून जवळ असाल तरच तुमचे नाते टिकू शकते असे तुम्हाला वाटत असेल तर ते अगदीच चुकीचे आहे. Long distance relationship ही चांगले टिकू शकते. जर तुम्ही अशा नात्यामध्ये असाल तर तुम्हाला काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्यावी लागते. त्या गोष्टी तुम्ही पाळल्यात की, तुमचे नाते घट्ट होते. Long distance relationshipमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो विश्वास तो जर तुम्ही मिळवलात तर तुम्हाला एकमेंकापासून कोणीच दुरावू शकत नाही. 

ADVERTISEMENT

4. अशा नात्यात प्रेमाची कबुली कशी द्यावी किंवा प्रेम कसे दाखवावे?

Long Distance Relationship Tips In Marathi

shutterstock

नाते कोणतेही असो त्यामध्ये तुम्हाला प्रेम दाखवावे लागते. आता प्रेम दाखवण्यासाठी तुम्हाला काही देण्याची गरज नाही. तर तुम्ही सतत फोन करुन किंवा सतत एकमेकांच्या संपर्कात राहून तुम्ही त्या व्यक्तिसाठी किती महत्वाचे आहेत ते देखील दाखवून द्या. तरच तुमचे नाते अधिक खुलेल.  

5. असे नाते नक्की का बिनसते?

नात्यात अविश्वास आला की, मग ते नातं कोणतंही असो बिनसतंच. Long distance relationship मध्ये बिनसण्याचे एकमेव कारण असते संशय. जर तुमच्या नात्याता संशयाने जागा घेतली की, मग ते नातं टिकत नाही. मुळातच अंतर असल्यामुळे सगळ्या गोष्टींची शहानिशा करताना फारच कठीण जाते. अशातच जर तुमच्या डोक्यात नको ते विचार येऊ लागले की, मग असे नाते हमखास बिनसते.

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

26 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT