#MyStory: खऱ्या आयुष्यातही होतं “Love At First Sight”

#MyStory: खऱ्या आयुष्यातही होतं  “Love At First Sight”

तुमचा विश्वास आहे का? Love At First Sight वर. मग कदाचित आजची #MyStory वाचल्यावर बसेल. जी आहे अगदी हलकीफुलकी आणि प्रेमाच्या हळूवार नात्याची. काहीवेळा आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती नकळत येते आणि आपली होऊन जाते. आजच्या या मायस्टोरीतली प्रेमकथा काहीशी अशीच आहे. मग चला वाचूया आजची #fairytale लव्हस्टोरी.

पहिली नजर ने कैसा जादू कर दिया

मी तो दिवस कधीच विसरू शकणार नाही. कदाचित नियतीने आमची पहिली भेट अशीच ठरवली होती. माझं नुकतंच कॉलेज पूर्ण झालं होतं. त्यामुळे मी जॉब जॉईन करून कॉर्पोरेट जगतात नव्यानेच प्रवेश केला होता. नवीन शहरात घरापासून दूर मी राहू लागले होते. पहिलाच जॉब असल्याने मी फारच उत्साहित होते. 


एका वीकेंडला मी आणि माझे फ्रेंड्स बॉलिंग एलीसाठी एका जवळच्याच मॉलमध्ये गेलो. तिकडे मला एक मुलगा दिसला ज्याच्या गालावरची खळी फारच गोड होती. मला हे मान्य करावंच लागेल की, मला खळी असलेली मुलं फारच आवडायची. त्यामुळेच की काय माझं त्याच्याकडे लक्ष गेलं असावं. मला आजही फक्त त्याला पाहिलं एवढंच आठवतं. कदाचित त्याच्याबरोबर त्यााच ग्रुपही होता. जेव्हा माझ्या फ्रेंड्सनी ग्रुप फोटो घ्यायचं ठरवलं. तेव्हा मला आयती संधीच मिळाली. मी त्याला रिक्वेस्ट केली आणि आमचा फोटो काढण्यास सांगितले. पण मला हे माहीतच नव्हतं की, ही कहाणी तिथेच थांबणार नव्हती. 

Shutterstock

दीड दिवसाची शोध मोहीम

मला कधीच वाटलं नव्हतं की, तो मला पुन्हा भेटेल. पण गोष्टी तिथपर्यंतच थांबल्या नाही. दुसऱ्या दिवशी मला फेसबुकवर एका मुलाची रिक्वेस आली. आमच्यात कोणीही mutual friend नसल्याने मी ती रिक्वेस्ट ignore केली. त्याच रात्री मला त्याच मुलाचा पुन्हा मेसेज आला. त्याने मला विचारलं की, मी त्याला ओळखलं का? तो म्हणाला की, मी तोच मुलगा आहे ज्याने आमचा बॉलिंग एलीच्या इथे ग्रुप फोटो काढला होता. तुम्हाला कल्पना आलीच असेल की, मी किती सरप्राईज झाली असेन ते. 

मी खूपच excited झाले होते. त्या सुंदर डिंपल असलेल्या मुलाने मला फेसबुकवर शोधल होतं. कदाचित माझ्या मित्रमैत्रिणींनी माझं फक्त पहिलं नाव घेतल्याने त्याने मला दिड दिवस घालवून फेसबुकवर मला शोधून काढलं होतं. त्यात माझं नाव खूपच कॉमन असल्याने त्याला किती फेसबुकवर किती सर्च करावं लागलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. हा सर्व विचार करूनच माझ्या मनात फुलपाखरं फिरू लागली होती. मला खूपच छान आणि अगदी स्पेशल वाटू लागलं होतं. त्याने किती कष्ट घेतले होते फक्त माझी प्रोफाईल निवडण्यासाठी. एवढंच नाहीतर मला शोधूनही काढलं होतं.  

त्या रात्री आम्ही खूप चॅट केलं. पुढचे अनेक दिवस आम्ही एकमेकांशी चॅट करत होतो. त्या वीकेंडला त्याने मला डेटवरही नेलं. मला अजूनही आमच्या दोघांत प्रेम वगैरे असल्याचं जाणवत नव्हतं. हेही खरं होत की, मला त्याच्याबद्दल फारच कमी माहिती होती. त्यामुळे पहिल्या डेटवर जाताना मी थोडी घाबरलेही होते की, तो नक्की चांगला मुलगा असेल ना. आज आमच्या नात्याला तब्बल दीड वर्ष झालं आहे. आतापर्यंत मला भेटलेल्या मुलांपैकी तो फारच क्युट आणि चांगला आहे.  

आयुष्य की परीकथा

तो माझ्या आयुष्यात आला काय...मला त्याने फेसबुकवर शोधलं काय..पहिली डेट झाली आणि आमच्या नात्याला आता दीड वर्षही झालं. काहीच प्लान नव्हतं. सगळं सहज घडत गेलं. मला हे मान्य करावंच लागेल की, माझ्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टींपैकी तो एक आहे. त्याच्यामुळे माझा love at first sight खरं असण्यावर विश्वास बसला आहे. 

तर ही होती आजची #MyStory. फ्रेंड्स तुमच्या आयुष्यात अजून कोणी आलं नसेल तर असं अचानक कोणीतरी येऊ शकतं. त्यामुळे पेशन्स ठेवा आणि चांगल्या व्यक्तीसाठी आयुष्यात जागा ठेवा. काय माहीत तुम्हाला तुमचा मि.परफेक्ट असा पहिल्या नजरेत पाहून मिळाला तर…

तुमच्याकडेही एखादी अशीच #MyStory असेल तर #POPxoMarathi ला नक्की लिहून पाठवा. आम्हाला मेल करा आणि सब्जेक्टमध्ये #MyStory मेन्शन करायला विसरू नका. 

हेही वाचा -

#MyStory: तेवढ्यात आईबाबा तिकडे आले…

#MyStory: आजही साखरपुड्याचा तो क्षण आठवला की...

#MyStory: आणि तेवढ्यात त्याची आई आली…

 

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.