सुंदर लांब, नखं आवडतात.. मग नक्की करुन पाहा nail extensions

सुंदर लांब, नखं आवडतात.. मग नक्की करुन पाहा nail extensions

ट्रेन, ऑफिस किंवा एखाद्या कार्यक्रमात एखाद्या मुलीची सुंदर नखं पाहिली की, अशी नखं आपल्यालाही हवीत असे अनेकींना वाटते. अशी सुंदर नखं पाहिल्यानंतर त्यांचे नेलपॉलिश इतके सुंदर कसे लागते किंवा त्यांच्या नखांना इतका सुंदर आकार कसा दिला जातो, असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. पण या सुंदर नखांमागे nail extensions आहे हे तुम्हाला माहीत आहे का? काय तुम्ही nail extensions हे पहिल्यांदा ऐकता आहात का? मगं तुम्हाला nail extensions म्हणजे काय? ते कसे करतात? आणि त्यामुळे तुमची नखं कशी सुंदर दिसतात. याविषयीची सगळी माहिती आपण आज घेऊयात.

सौंदर्य प्रसाधनं खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी जरूर जाणून घ्या

Table of Contents

  Nail extension म्हणजे काय? (What is nail extensions)

  shutterstock

  nail extensions म्हणजेच तुमच्या आहे त्या नखांवर आर्टिफिशिअल नख लावणे हे नखं अशापद्धतीने लावले जाते की, ते तुमचेच नखं आहे असे वाटते. तुमचे नखं लांब असू दे किंवा आखूड तुम्हाला हवा असलेला आकार तुम्हाला या nail extensionsमध्ये मिळू शकतो. शिवाय तुमच्या नखांवर ते लावल्यामुळे तुमच्या नखांनाही या nail extensionsमुळे त्रास होत नाही. तर सर्वसाधारणपणे nail extensions म्हणजे तुमच्या नखांवर केवळ खोटं नख लावणे ( पण हे नखं लावल्यानंतर नखं खोटं असल्यासारखे वाटत नाही.)

  Also Read : फ्रेंच मॅनीक्योर कसे करावे

  असे केले जाते Nail extensions (Step by step Nail extension process)

  आता Nail extensions म्हणजे काय? हे तुम्हाला कळाल असेलचं. पण ते करण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे ही पद्धत देखील तुम्ही जाणून घेणे फार महत्वाचे आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर Nail extension कसे केले जाते याची कृती तुम्हाला आधीच माहीत असेल तर तुम्हाला ते कोणत्याही नेल आर्ट पार्लरमधून करताना फार प्रश्न पडणार नाहीत. तुम्ही ज्या प्रकारे मेनिक्युअर करता अगदी त्याच पद्धतीने Nail extension सुद्धा केले जाते.

  कमकुवत नखे बद्दल देखील वाचा

  shutterstock

  1.  सगळ्यात आधी तुमच्या नखांना क्युटीकल रिमुव्हर जेल लावली जाते. ती काही वेळ ठेवून तुमच्या नखांवरील क्युटीकल काढले जाते. 
  2. नखांना नीट फाईलिंग करुन त्याला आकार दिला जातो. 
  3. नेल क्लिनिंग सोल्युशन लावून तुमचे नख स्वच्छ पुसले जाते आणि आता नखांवरील Nail extensions ची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरु केली जाते.
  4.  तुम्हाला कोणते नख लावायचे ते विचारले जाते. त्यानंतर स्पेशल ग्लूने तुमच्या नखांवर Nail extensionचे खोटे नखं लावले जाते. ते लावताना तुम्हाला नखांच्या वरच्या बाजूला लावण्यात येते.
  5. आता तुमच्या नेल बेडच्या आकारावर तुमच्या Nail extensions चा आकार असतो. त्यामुळे तुम्हाला अधिक खबरदारी या गोष्टीची घ्यायची आहे की तुम्हाला Nail extensions योग्य पद्धतीने लावले जात आहे की नाही. 
  6. Nail extensions लावल्यानंतर ते वाळवण्यासाठी एक विशिष्ट मशीनसुद्धा असते. त्यामध्ये साधारण एक मिनिटभर ही नखं वाळवण्यात येतात आणि हो ही नखं मोठी असतात. पण तुम्हाला हवा तसा या नखांचा आकार करुन मिळू शकतो. ही नखं तुमच्या खऱ्या नखांप्रमाणेच फाईल करण्यात येतात.
  7. त्यावर एक विशिष्ट सोल्युशन लावल्यानंतर हे आर्टिफिशिअल नख तुमच्या नखांप्रमाणेच दिसू लागते. त्यानंतर तुमचे नख पुन्हा एकदा फाईल केले जाते. 
  8. नखं स्वच्छ पुसून आता मात्र तुमच्या नखांना नेलपेंट लावण्याची ही वेळ आहे. 
  9. नेलपेंट लावल्यानंतर पुन्हा एकदा मशीनमध्ये ही नेलपेंट वाळवण्यात येते.
  10. आता तुम्हाला जर नखांना फ्रेंच मेनिक्युअर करायचे असेल तर तुम्ही ते ही करु शकता.

  संत्र्याची साल ठेवा जपून.. कारण संत्र्याच्या सालीचे आहेत भरपूर फायदे

  Nail extensionचे प्रकार (Types of Nail extensions)

  nail extensionsचे तीन प्रकार आहेत. वेगवेगळ्या Nail extensions च्या प्रकाराचे वेगवेगळे फायदे आहेत. म्हणजे तुम्ही अगदी कोणत्याही प्रकाराचे Nail extensions तुमची नखं सुंदर बनवण्यासाठी करु शकता. पण हे तीन प्रकार कोणते ते आधी जाणून घेऊया.

  1. जेल Nail extensions (Gel Nail extensions)

  shutterstock

  सध्या सगळीकडे प्रचलित असलेला प्रकार म्हणजे जेल Nail extensions. यामध्ये तुम्हाला खोटी नखं अशी लावली जात नाही तर जेलच्या साहाय्याने ही नखं तयार केली जातात. नखं तयार करण्याची ही  पद्धत थोडी वेगळी आहे. तुमची नखं तयार करण्यासाठी तुमच्या नखांना आधी विशिष्ट घट्ट कागद कोन आकारात लावण्यात येतो. त्यावर ही जेल लावून वाळवण्यात येते. तो कागद काढण्यात येतो. टणक झालेली जेल नीट घट्ट करण्यासाठी त्यावर सोल्युशन लावण्यात येते. आता ही नखं इतर Nail extensions पेक्षा अधिक खरी वाटतात. 

  Also Read About अंगभूत toenail साठी उपाय

  2. अॅक्रेलिक Nail extensions (Acrylic Nail extensions)

  shutterstock

  भारतात सर्वसाधारणपणे तुम्हाला अशापद्धतीनेच Nail extensions सहज कुठेही मिळू शकतील. अॅक्रेलिक मटेरिअलची तयार नखं बाजारात मिळतात. त्यांनाच अॅक्रेलिक Nail extensions असे म्हटले जाते. आता यामध्येही वेगवेगळे प्रकार येतात. तुम्हाला लख्ख पांढऱ्या रंगापासून ते ट्रान्सफरंट अशा रंगांच्या शेडमध्ये तुम्हाला हे Nail extensions अगदी सहज मिळू शकतात. कोणत्याही ब्युटी स्टोअर्समध्ये तुम्हाला ही Nail extensions मिळू शकतात. 

  3. फायबरग्लास Nail extensions (Fiberglass Nail extensions)

  Instagram

  Nail extensions चा हा तिसरा प्रकार असून तो थोडा वेगळा आहे. कारण तुम्हाला यामध्ये नखांचा तयार आकार मिळत नाही. तर तुम्हाला पातळ पातळ तारा अशा स्वरुपात Nail extensions मिळते. तुम्हाला ग्लू लावून त्यावर या स्ट्रिंग लावायच्या असतात. त्यावर विशिष्ट प्रकारचे नेल सोल्युशन लावले जाते आणि त्याचा आकार आणला जातो. हे नखं तुमच्या नखांचा पटकन आकार घेते शिवाय दिसायलाही चांगले दिसते.

   

  Nail extension चे वेगवेगळे प्रकार (Different Designs Of Nail extensions)

  आता हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हालाही Nail extensions करुन पाहायची इच्छा झाली असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास डिझाईन्सची निवडही केली आहे. तुम्ही या डिझाईन्सचा आधार घेऊन तुमची नखं सुंदर बनवू शकता. मग आता या 10 डीझाईन्स कोणत्या ते देखील पाहूया.

  काळवंडलेल्या buttlocks च्या त्वचेसाठी सोपे घरगुती उपाय

  1. फ्रेंच मेनिक्युअर विथ ट्विस्ट (French Manicure With Twist )

  Instagram

  जर तुम्हाला फ्रेंच मेनिक्युअर हा प्रकार करुन आवडत असेल तर हा प्रकार तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे. पण याला थोडा ट्विस्ट देण्याचे काम या डीझाईनमध्ये देण्यात आलेले आहे. फ्रेंच मेनिक्युअरवर काळ्या रंगाच्या नेलपॉलिशने अत्यंत बारीक काम करण्यात आले आहे.  दोन सरळ रेषा आणि एक सुंदर बो टाय यामध्ये काढण्यात आल्या आहेत. तुम्हाला फार काही डार्क आवडत नसेल तर तुम्ही ही डिझाईन करुन पाहू शकता. 

  वाचा: नखे डिझाइन

  2. ब्युटीफुल टीप्स (Beautiful tips)

  Instagram

  आता काही जणांना संपूर्ण नखाला नेलपेंट लावलेली आवडत नाही. अशावेळी जर तुम्हाला थोडासा वेगळा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही अशी डिझाईन नक्कीच करु शकता.  नखांच्या वरील बाजूला नेलपेंटचा रंग अगदी लाईट लावण्यात आला आहे. तर नखांच्या टीप्सवर हा रंग गडद करण्यात आला आहे.आता या फोटोमध्ये तुम्हाला आबोली रंगाची नेलपेंट लावलेली दिसत आहे. पण तुम्ही अगदी कोणताही रंग घेऊ शकता. तुम्हाला जर जास्त इफेक्ट हवा असेल तर तुम्ही यापेक्षा अधिक वेगळा प्रयोगही करुन पाहू शकता. 

  3.शिमर ऑन टीप्स ( Shimmer On Tips)

  Instagram

  आता तुम्हाला जर थोडेसे पार्टीवेअर नखं हवे असतील तर तुम्ही हा प्रकार नक्की ट्राय करुन पाहायला हवा. कारण तुम्हाला पार्टीसोबतच इतर कोणत्याही वेळी  अशी नखं चांगली वाटू शकतात. या नखांसाठी जेल पॉलिशचा उपयोग करण्यात आला आहे. त्यावर त्याच रंगाची शिमर किंवा ग्लिटर नेलपेंट वापरण्यात आली आहे. आता नखांच्या टीपना ही शिमर लावण्यात आली आहे तुम्हाला जर नखांच्या आतल्या बाजूला ही डिझाईन करायची असेल तर तुम्ही ते देखील करु शकता. तुम्ही यामध्ये वेगवेगळे प्रयोग देखील करुन पाहू शकता. 

  4. ब्लॅक इज ब्युटीफुल (Black Is Beautiful)

  Instagram

  आता जर तुम्हाला काळा रंग आवडत असेल तर मग तुम्ही ही nail extensions डिझाईनही तुम्ही करुन पाहायला हवी. तुम्ही काळा रंग नखांना लावण्यात कर्म्फटेबल असाल तर तुम्ही काळ्या रंगाचे शेड्स लावू शकता. या डिझाईन प्रमाणे तुम्ही तुमच्या पाच बोटांना काळ्या रंगाशी निगडीत वेगवेगळे रंग तुमच्या नखांना लावू शकता. शिवाय एका नखाला ग्लिटर नेलपेंटही लावू शकता.

  5.व्हाईट इज नेक्स्ट लेवल (White is next level)

  Instagram

  आता नेलपेंटमध्ये वेगवेगळे रंग ट्राय करायला अनेकांना आवडते. तुम्ही पांढरा रंग कधी लावून पाहायला आहे का? नसेल पाहिला तर मात्र तुम्ही हे नक्की ट्राय करुन पाहू शकता. इथे पांढऱ्या रंगाची मॅट नेलपेंट नखांना लावण्यात आली आहे. आता तुमची नखं फारच पांढरी वाटू नये म्हणून त्यावर थोडा वेगळेपणा आणण्यासाठी स्टोन लावण्यात आले आहेत. तुम्ही हे देखील नक्कीच ट्राय करुन पाहू शकता.

  वाचा - खराब नख साफ करण्याच्या पद्धती

  6. क्रोम नेल्स ( chrome nails)

  Instagram

  हल्ली अशा प्रकारच्या नेलपेंटस अगदी सहज बाजारात मिळतात. एखादा ग्लासी आणि ग्लॉसी लुक यामध्ये नखांना येतो तो फक्त आणि फक्त या नेलपेंटसमुळे. तुम्हाला यामध्ये गोल्डन रंगाची झाक अधिक दिसेल. पण ही अशी नखं तुम्ही केल्यानंतर नक्कीच तुमच्या नखांकडे अनेकांचे लक्ष जाईल. तुम्हाला एखाद्या पार्टीसाठी करायला नक्की आवडेल. आता इतर किंमतीच्या तुलनेत याची किंमत अधिक असू शकते.

  7. ज्वेल नेल्स (Jewel nails)

  Instagram

  आता तुम्हाला जर तुमच्या नखांना थोडं आणखी छान करायचं असेल तर तुम्ही हा प्रकार नक्की ट्राय करु शकता. पार्टी किंवा एखाद्या स्पेशल समारंभात तुम्हाला हे करुन पाहायला नक्कीच काही हरकत नाही. पण असा प्रकार करताना वर स्टोन्स किंवा अन्य काही नेल डेकोरेटिव्ह गोष्टी लावल्या जातात. पण त्यांना जपणे फारच गरजेचे असते.

  8. डबल ट्रबल (double trouble)

  Instagram

  एकाच वेळी तुम्हाला दोन आवडीचे रंग नखाला लावण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच डबल ट्रबल म्हणजेच दोन रंगाचा हा प्रकार ट्राय करु शकता. हे करताना तुम्ही कोणते कलर कॉम्बिशन निवडता हे फारच महत्वाचे असते.त्यावरच तुमचे नखांचे सौंदर्य अवलंबून असते. हे तुम्हाला रोजच्यासाठी करता येईल.

  9. मल्टी कलर (multi colors nails)

  Instagram

  आता काहींना प्रत्येक नखाला वेगवेगळा रंग लावायला आवडतो. तर तुमच्यासाठी ही डिझाईन एकदमच बेस्ट आहे. कारण या मध्ये एकाच वेळी तुम्हाला वेगवेगळे रंग लावता येतील तुम्ही इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे रंग लावू शकता किंवा एखादा रंग घेऊन तुम्ही त्याचा लाईट शेड करुनही तुम्ही nail extensions डिझाईन करु शकता.

  10. समर नेल्स (summer nails)

  Instagram

  आता याला समर नेल्स म्हणण्याचे कारण इतकेच की, तुम्ही अशाप्रकारच्या नखांची डिझाईन करताना फ्रेश रंगाचा वापर करता. म्हणजे पिवळा, राणी कलर किंवा अॅक्वा ब्लू या रंगाचा अधिक वापर यामध्ये केला जातो. तुम्ही मस्त कोणत्या सुट्टीवर जात असाल तर तुम्ही हे nail extensions नक्कीच करु शकता.

  नखांसंबधी तुम्हालाही पडतात का हे प्रश्न (FAQ)

  Nail extensions किती दिवस टिकते (How long Nail extensions last for ? )

   Nail extensions हे तुमच्या वापरण्यावर असेल जर तुमचे पाण्यातील काम जास्त असेल तर कदाचित हे Nail extensions आपोआप निघू शकतात. त्यामुळे या Nail extensionsची ठराविक अशी गॅरंटी देता येत नाही. Nail extensions केल्यानंतर तुम्हाला त्याची वेळोवेळी काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला घरी काळजी घेता येत असेल तर तुम्ही दर 15 दिवसांनी याची काळजी घेऊ शकता किंवा दर महिन्याला जाऊन तुम्ही नेल आर्ट क्लिनिंगमध्ये जाऊन तुमच्या नखांना काही दुखापत झाली नाही हे नक्की तपासून पाहा. 

  खोटी नखं तुमची खरं नखं खराब तर करत नाही ना? (Fake nails or Nail extension ruin your nails )

  Nail extensions हे तुमच्या नखांचे सौंदर्य वाढवते. Nail extensions लावण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स जर जास्त वापरले गेले तर त्याचा त्रास नक्कीच तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे Nail extensions कुठेही करु नका. योग्य पार्लर किंवा क्लिनिकमध्ये तुम्ही Nail extensions केले तर तुमची नखं खराब होणार नाहीत. Nail extensions करताना तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही ते करणाऱ्यांना सांगा.

  तुमच्या इनॅमलला या सगळ्यामुळे त्रास होऊ शकतो का? (Is this process affect your nail enamel)

  तुमचे Nail enamel तुमच्या नखांसाठी आवश्यक असते. नखांवर प्रयोग करताना तुमची नखं मजबूत आहेत की नाही हे देखील पाहा. जर तुमची नखं चांगली असतील तर तुमच्या नेल इनॅमलला लगेचच त्रास होणार नाही. पण जर तुम्ही सतत प्रयोग आणि चुकीचे प्रयोग केले तर मात्र तुमच्या नखांना याचा त्रास होऊ शकतो.

  अॅक्रलिक आणि जेल Nail extensions मध्ये काय फरक आहे ? (What is difference between acrylic and gel Nail extension)

  अॅक्रेलिक Nail extensions हे तुमच्या नखांना बसवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कारण ते तुमच्या नखांना बसवण्यासाठी नखांना खूप फाईल करावे लागते. शिवाय ते लावताना कधीकधी नखं सुद्धा दुखावली जातात.( जर ती नीट लावली गेली नाही तर). त्या उलट जेल Nail extensions असतात. यामध्ये केवळ एक सोल्युशन मिळते. जे नखांप्रमाणे लावले जाते आणि त्यानंतर ही जेल टणक होती आणि नखांचा आकार घेतात. त्यानंतर तुमच्या नखांना आकार दिला जातो.

  Nail extensions साठी किती पैसे आकारले जातात? (Approx price for Nail extension )

  मुंबईत फार कमी ठिकाणी Nail extensions करुन मिळते. त्यामुळे त्याच्या किमती या अधिक आहेत. साधारण 700 रुपयांपासून याची सुरुवात होते ते अगदी 2हजार रुपयांच्या पुढे यांचा खर्च आहे. जर तुम्ही स्पेशल डिझाईन करुन हवी असेल तर याचा खर्च हा जास्त होतो. 

  आता तुम्हाला तुमची नखं सुंदर करुन हवी असेल तर तुम्ही नक्कीच Nail extensions करुन पाहू शकता. 

  देखील वाचा - 

  पैसै वाचवा, घरच्या घरी काढता अॅक्रेलिक नखं