ADVERTISEMENT
home / Festival
Navratri Special : नऊ दिवसांमध्ये देवीला दाखवण्याचे नेवैद्य

Navratri Special : नऊ दिवसांमध्ये देवीला दाखवण्याचे नेवैद्य

 

शारदीय नवरात्रौत्सव (Navratri) संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. देशात प्रत्येक ठिकाणी नऊ वेगवेगळ्या शक्तीशाली रूपांची उत्साहात पूजा-अर्चना केली जाते. अशी श्रद्धा आहे की, या काळात पूर्ण विश्वासाने देवीची प्रार्थना केल्यास तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होते. भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करतात. या दिवसांमध्ये देवीमातेला आवडणाऱ्या पदार्थांच्या नेवैद्यही दाखविला जातो. तुम्हीही हे नेवैद्य दाखवून देवीमातेला प्रसन्न करू शकता. 

जाणून घ्या काय आहेत नऊ दिवस देवीमातेला दाखवण्यासाठीचे नेवैद्य.

पहिली माळ

 

पहिल्या दिवशी माता दुर्गैच्या पहिल्या रूपाची देवी शैलपुत्रीची आराधना केली जाते. पर्वतराज हिमालयाच्या घरी पुत्री रूपाने प्रगट झाल्याने तिचं नाव ‘शैलपुत्री’ असं पडलं. या देवीचं वाहन आहे वृषभ. त्यामुळे देवीला वृषारूढा या नावानेही ओळखलं जातं. या देवीच्या उजव्या हातात त्रिशूल असून डाव्या हातात कमळ आहे. ही देवी आहे प्रथम दुर्गा. या देवीला सतीच्या नावानेही ओळखले जाते. 

कोणता नेवैद्य दाखवाल – नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या चरणी गाईच्या शुद्ध तुपाचा नेवैद्य दाखवावा. हा नेवैद्य दाखविल्याने तुम्हाला मिळेल आरोग्याचा आशिर्वाद. ज्यामुळे तुम्ही सदैव राहाल निरोगी. 

उपवासाच्या वेळी काय खायला हवं

ADVERTISEMENT

दुसरी माळ

 

दुसऱ्या दिवशी माता दुर्गैचं रूप आहे देवी ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण. ब्रह्मचारिणीचा अर्थ झाला तपाचं आचरण करणारी. भगवान शंकराला पतीच्या रूपात करण्यासाठी देवीने घोर तपस्या करून प्राप्त केलं होतं. या कठीण तपस्येमुळे देवीचं तपश्चारिणी अर्थात्‌ ब्रह्मचारिणी नाव प्रचलित झालं. 

कोणता नेवैद्य दाखवाल – नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीला साखरेचा नेवैद्य दाखवावा आणि घरातील सदस्यांना द्यावा. यामुळे आयुष्य वाढतं.

Navratri ke Bhajan in Hindi

तिसरी माळ

 

तिसऱ्या दिवशी माता दुर्गेच्या तिसऱ्या रूपाची देवी चंद्रघंटाची आराधना केली जाते. नवरात्रीतील उपासनेच्या तिसऱ्या दिवशीच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे आणि या दिवशी पूजा केली जाते चंद्रघंटा देवीची. 

ADVERTISEMENT

कोणता नेवैद्य दाखवाल – नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दूध किंवा दूधापासून बनवलेल्या मिठाई किंवा खीर यांचा नेवैद्य देवीला दाखवून ब्राम्हणाला दान करावे. यामुळे दुःखापासून मुक्तता होते आणि आनंदाची प्राप्ती होते.

वाचा – साबुदाणा खाण्याचे फायदे

चौथी माळ

 

नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेच्या चौथ्या रूपाची माता कुष्मांडाची आराधना केली जाते. जेव्हा सृष्टी नव्हती. चोहीकडे अंधकारच अंधकार होता तेव्हा या देवीने आपल्या मंद आणि स्मित हास्याने ब्रम्हांडाची रचना केली होती. त्यामुळे या देवीला सृष्टीची आदिस्वरूपा किंवा आदिशक्ती असंही म्हणण्यात आलं आहे. या आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीत देवीची गाणी गाऊन आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. 

कोणता नेवैद्य दाखवाल – नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मालपुआच्या नेवैद्य दाखवावा आणि मंदिरातील ब्राह्मणाला दान करावा. ज्यामुळे बुद्धीची विकास होऊन निर्णयशक्तीही वाढते.

ADVERTISEMENT

Chaitra Navratri Wishes in Hindi

पाचवी माळ

 

नवरात्रौत्सवाच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंदमाता मोक्षाचे दरवाजे उघडणारी आणि सुख देणारी देवी आहे. तिची पूजा श्रद्धेने केल्यास सर्व इच्छांची पूर्ती होते. 

कोणता नेवैद्य दाखवाल – नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळ्याचा नेवैद्य दाखवावा. त्यामुळे देवीकडून आरोग्यदायी आयुष्याचा आशिर्वाद मिळेल.

वाचा – नवरात्रौत्सवासाठी खास शुभेच्छा (Navratri Wishes In Marathi)

ADVERTISEMENT

सहावी माळ

 

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. या देवीची उपासना आणि आराधना केल्याने भक्तांना सहजपणे अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चारही फळांची प्राप्ती होते. तसंच आयुष्यभराची सर्व पापं नष्ट होतात. 

कोणता नेवैद्य दाखवाल – नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मधाचा नेवैद्य दाखवावा. ज्यामुळे तुमच्या आकर्षण शक्तीत वृद्धी होईल.

सातवी माळ

 

नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. माता कालरात्रीचं रूप हे श्याम रंगातील आहे. तिचे केस विस्कटलेले, गळ्यात माळा आणि तीन डोळे आहेत. तिची भक्ती केल्याने ब्रम्हांडातील सर्व सिद्धीची दारं उघडतात, असं म्हटलं जातं. 

कोणता नेवैद्य दाखवाल – सातव्या दिवशी देवीला गूळाचा नेवैद्य दाखवावा. हा नेवैद्य दाखवल्याने अचानक येणाऱ्या संकटापासून तुमचं रक्षण होईल.

ADVERTISEMENT

आठवी माळ

 

नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी शक्ती पूजा केली जाते.महागौरीची पूजा-अर्चना आणि उपासना कल्याणकारी आहे. 

कोणता नेवैद्य दाखवाल – नवरात्रीच्या आठव्या दिवशी नारळाचा नेवैद्य दाखवावा. या नेवैद्याने संतान संबंधींच्या समस्यांपासून सुटका होते.

नववी माळ

 

नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्ध‍ीदात्री भक्तांना सिद्ध‍ीचा आशिर्वाद देते. भगवान शंकराने या देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. या देवीच्या कृपेनेच शंकर देवाचं अर्ध शरीर देवीचं झालं होतं. याच कारणामुळे शंकर देवाचं अर्धनारीनटेश्वर नाव प्रचलित झालं. 

कोणता नेवैद्य दाखवाल – नवमीच्या दिवशी तिळाचा नेवैद्य दाखवावा. यामुळे मृत्यूचं भय दूर होईल आणि भविष्यातील वाईट घटनांपासूनही बचाव होईल.

ADVERTISEMENT

 

हेही वाचा –

नवरात्रीत करा आरोग्यदायी ‘हादग्याची भाजी’

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे घ्या जाणून, शरीर राहतं निरोगी

प्रत्येकाला माहीत हव्या #Navratri शी निगडीत या गोष्टी

ADVERTISEMENT

नवरात्रीचे नऊ रंग, जाणून घ्या नवरात्रीच्या 9 रंगांचे नक्की काय आहे महत्त्व

27 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT