ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
नवरात्रीला स्पेशल दिसण्यासाठी ‘9’ प्रकारच्या पारंपरिक साड्या

नवरात्रीला स्पेशल दिसण्यासाठी ‘9’ प्रकारच्या पारंपरिक साड्या

साडी हा प्रत्येकीसाठी अगदी आवडीचा विषय असतो. सण समारंभ आले की पारंपरिक ठेवणीतल्या साड्यांकडे आपलं लक्ष आपसूक वळलं जातं. कारण लग्न अथवा सणसमारंभालाच अशा भरजरी साड्या नेसल्या जातात. खरंतर पारंपरिक साड्यांची फॅशन कधीच जात नाही ज्यामुळे त्या तुम्ही वर्षानूवर्ष नेसू शकता. शिवाय बरेच दिवस या साड्या कपाटाबाहेर न काढल्यास त्या लवकर खराब होऊ शकतात. यासाठी सणासमारंभात त्या आवर्जून नेसाव्या. सणाला खास दिसण्यासाठी तुमच्या वॉर्डरोब कलेक्शनमध्ये काही ठराविक प्रकारच्या साड्या असायलाच हव्या. नवरात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नेसता येतील अशा नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुमच्याकडे असतील तर क्या बात है…. आजकाल ऑफिसमध्ये देखील नवरात्रीचे नऊ रंग आणि नऊ प्रकारच्या साड्या नेसण्याचा ट्रेंड आहे. तेव्हा यंदा या पारंपरिक साड्या नेसून नवरात्रीचा हा सण साजरा करा. 

नवरात्रीसाठी 9 प्रकारच्या पारंपरिक साड्या

1.साड्यांची महाराणी पैठणी –

पैठणी साडीला साड्यांची महाराणी असं म्हटलं जातं म्हणूनच ती महाराष्ट्राची शान आहे. तुमच्या वार्डरोबमध्ये एकतरी पारंपरिक, रिअल पैठणी असायलाच हवी. पैठणी साड्यांमध्ये बालगंधर्व, महाराणी, पेशवाई असे विविध प्रकार आहेत.  नवरात्र अथवा विजयादशमीला पैठणी नेसून तुम्ही आपली संस्कृती जपू शकता. पैठणी साडी नेसून वावरणं थोडं कठीण असलं तरी तुम्ही या सणाला त्यामुळे खास दिसाल हे मात्र नक्की

लग्नाचा विभाग याबद्दल देखील वाचा

ADVERTISEMENT

Instagram

2.कांजिवरम साडी –

साड्यांमध्ये कांचीपुरम अथवा कांजीवरम साडीचंदेखील एक वेगळंच स्थान आहे. कांजीवरम साडी प्रत्येकालाच आपल्या वॉर्डरोबमध्ये असावी असं वाटतं. बऱ्याच कार्यक्रमामध्ये अथवा सणांसाठी ही साडी एक उत्तम पर्याय आहे. दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे तुम्ही सणाला ही साडी नक्कीच नेसू शकता. या साड्यांमध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कांजिवरम नेसा आणि खास दिसा. 

अँड हसनंदानी बद्दल देखील वाचा

ADVERTISEMENT

Instagram

3.इरकल साडी –

इरकल ही साडी देखील एक पारंपरिक साडी आहे. गडद रंगाची एखादी इरकल साडी आणि त्यावर पारंपरिक ठुशी अथवा वज्रटेक हा दागिना तुम्हाला एक खास लुक नक्कीच देईल. यासाडीचा पोत हा गर्भ रेशमी  आणि रेशीम अशा दोन प्रकारचा असतो. हातमागावर विणलेली तलम आणि मऊ पोताची ही साडी तुम्हाला नक्कीच खास लुक देईल. शिवाय ऑफिसमध्ये सण साजरा करताना नेसण्यासाठी ती अगदी हलकी आणि सोपी आहे. 

Instagram

ADVERTISEMENT

4.नारायण पेठ साडी –

नारायण पेठ ही साडी प्रत्येक महाराष्ट्रीय महिलेकडे असतेच.  या साडीचं वैशिष्ट्य असं की ती फारच हल्की असते. ज्यामुळे तुम्ही सणासुदीला ती नेसून तुमची इतर कामं करू शकता. पूर्वी या साड्या एकसमान पदराच्या असायच्या मात्र आता या साड्यांमध्ये पदरावर डिझाईनदेखील मिळते. कामासाठी रेल्वेमधून प्रवास करताना नऊ दिवस साडी नेसायचा प्लॅन असेल तर ही साडी अगदी परफेक्ट आहे.

Instagram

5.चंदेरी साडी –

चंदेरी साडीची फॅशनदेखील अनेक वर्षांपासून कायम आहे. अतिशय नाजूक आणि तलम अशी ही साडी तुम्हाला सणासुदीला स्पेशल लुक नक्कीच देऊ शकते. हिरव्याकंच अथवा काळ्याभोर चंदेरीसाडीवर सोनेरी अथवा चंदेरी बुट्या तुमचा लुक अगदी खास करतील. तेव्हा या सणाला एक वेगळा आणि पारंपरिक लुकसाठी चंदेरी नेसण्यास काहीच हरकत नाही. 

ADVERTISEMENT

Instagram

6. जिजामाता साडी –

नऊवारी जिजामाता साडी आजकाल अनेक कार्यक्रमात महिला नेसतात. कारण ती साडी अतिशय हलकी असते आणि नऊवारी नेसूनही तुम्हाला अवघडल्यासारखं वाटत नाही. पण या साडीतील सहावारी प्रकारही नवरात्रीसाठी नक्कीच नेसू शकता. या नवरात्रीत देवीचं दर्शन अथवा देवीची ओटी भरण्यासाठी जाताना तुम्हाला ही साडी अगदी सोयीची आहे. कारण यात तुम्हाला फार त्रास होत नाही आणि लुक अगदी पारंपरिक दिसतो. फक्त या साडीवर ब्लाऊज मात्र अगदी हटके ट्राय करा. ज्यामुळे तुमचा लुक अगदी परिपूर्ण होईल.

ADVERTISEMENT

Instagram

7. मदुराई सिल्क साडी

दक्षिणेकडील कांचीपुरम साडीप्रमाणे मदुराई सिल्कदेखील साड्यांमधील एक उत्तम पर्याय आहे. ज्यांना हलक्या वजनाच्या साड्या नेसायला आवडतात त्यांच्यासाठी ही साडी अगदी उत्तम आहे. या साड्यांमधील विविध प्रकार सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे एखादी मदुराई सिल्क नेसून तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. 

Instagram

ADVERTISEMENT

8. पटोला अथवा इकत साडी

पटोला साडी ही गुजरातमधील एक लोकप्रिय साडीचा प्रकार आहे. गुजरातमधील राजघराण्यात या साड्या नेसल्या जात असत. या साड्यांवर हत्ती, मोर अशा डिझाईन असतात. या साडीच्या डिझाईनवरून त्यांची ओळख निर्माण होते. नवरात्र उत्सव महाराष्ट्र, बंगाल आणि गुजरातमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तेव्हा यंदाच्या सणाला तुम्ही एखाादी गुजराती पटोला साडी नक्कीच नेसू शकता.

Instagram

9. कॉटन अथवा लीनन साडी

आजकाल कॉटन लीनन साड्यांचा ट्रेंड आहे. त्यामुळे हातामागावर विणलेली, तलम आणि मऊ पोताची प्लेन लीलन साडी आणि त्यावर मिक्स मॅच ब्लाऊज घालून तुम्ही एक हटके आणि छान लुक करू शकता. ऑफिसमधील कॅज्युअल लुकसाठी या साड्या अगदी मस्त पर्याय आहेत. ज्यामुळे तुमचा लुकही छान दिसतो आणि उगाचच साडी नेसल्यावर येणारा अवघडपणाही वाटत नाही. 

ADVERTISEMENT

Instagram

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

पावसाळ्यात सिल्कच्या साड्यांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

ADVERTISEMENT

साडी पेटीकोट विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

Cotton and Handloom Blouse Designs: कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स

25 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT