ADVERTISEMENT
home / अॅस्ट्रो वर्ल्ड
जाणून घ्या, सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

जाणून घ्या, सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

 

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म हा वेळ, महिना आणि वर्षानुसार असतो.  प्रत्येक महिना आणि दिवस तशीच वेळेचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. त्यामुळे प्रत्येक माणूस हा जन्माला एकाच दिवशी आला असला तरीही त्याची स्वभाववैशिष्ट्यं वेगळी असतात. तसंच त्याच्या आवडीनिवडी, त्याचा चांगुलपणा वाईटपणा या सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे अवलंबून असतात. सप्टेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात ते आपण पाहणार आहोत. सप्टेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या अतिशय दयाळू आणि नाजूक असतात. प्रत्येक लहानसहान गोष्टीत या व्यक्ती सावधानता बाळगतात. पण आपल्या जिद्दी स्वभावामुळे नाहक त्रासही देतात. या राशीचा स्वामी हा बुध आहे. तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा जन्म सप्टेंबर महिन्यात झाला असेल तर जाणून घ्या या व्यक्तींची नक्की स्वभाववैशिष्ट्यं काय आहेत. 

सप्टेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत जाणून घेऊया –

 

1 – या व्यक्ती आपल्या उतावीळ स्वभावासाठी ओळखल्या जातात. आपलं चांगलं वाईट नक्की कशात आहे हे या व्यक्तींना पटकन कळत नाही. त्यामुळेच त्यांना कोणीही फसवू शकतं. कोणी यांच्याविषयी उलटसुलट बोललं तर या व्यक्ती ते सहन करू शकत नाहीत. 

2 – या व्यक्तींचं वैशिष्ट्य असं आहे की, आपला मार्ग या व्यक्ती स्वत:च शोधतात. आपल्या मेहनतीने समाजामध्ये आपली जागा निर्माण करतात. एखाद्या गोष्टीच्या मागे या व्यक्ती लागल्या तर काहीही झालं तरी या गोष्टी पूर्ण करतातच. 

3 – सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती या थोड्या सणकी अर्थात एकाच गोष्टीच्या मागे लागणाऱ्या असतात. या व्यक्तींना कोणतीही गोष्ट आवडली तर ती गोष्ट त्यांना पाहिजेच असते. कधी कधी याच गोष्टींमुळे या व्यक्तींना नुकसानही सहन करावं लागतं. 

ADVERTISEMENT

4 – या व्यक्ती फिटनेस करिअरमध्ये जास्त पुढे जातात. पण या व्यक्तींना नोकरी मिळायला थोडा वेळ लागतो. कारण या राशीच्या व्यक्ती मत तर सगळ्यांचं घेतात पण निर्णय मनाचाच असतो. बऱ्याच व्यक्ती या व्यक्तींना आपला आदर्श मानतात. 

5 – या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत अतिशय नॉटी आणि मस्तीखोर असतात. पण आपल्या जोडीदाराकडून या व्यक्तींना बऱ्याच अपेक्षा असतात. या कारणानेच त्यांना जोडीदार थोडा उशीरा मिळतात आणि लग्न होण्यासही वेळ लागतो. या व्यक्ती अगदी मनापासून प्रेम करतात. तसंच आपल्या जोडीदाराची काळजीही घेतात आणि त्यांच्यासाठी एक चांगला आणि उत्तम जोडीदार होण्याचा प्रयत्नही करतात. 

6 – यांच्या आसपासच्या लोकांना या व्यक्ती अतिशय शांत आणि स्वमग्न असणाऱ्या वाटतात. पण या व्यक्ती दुसऱ्यांचं निरीक्षण करण्यात हुशार असतात. याचं डोकं खूपच शार्प असतं आणि कोणत्याही समस्येचं समाधान या व्यक्तींजवळ सहज सापडतं. 

7 – या व्यक्ती भावनेपेक्षाही प्रॅक्टिकली विचार करण्याला अधिक महत्त्व देतात. त्यामुळे बऱ्याचदा काही व्यक्तींना या व्यक्ती भावनारहित वाटतात. कोणत्याही भावना यांना महत्त्वाच्या वाटत नाहीत असाही गैरसमज यांच्याबद्दल होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला आपल्या खास अंदाज आणि सौंदर्यामुळे या व्यक्ती सर्वांच्या जवळच्या असतात. यांच्याशी मैत्री करावी असं प्रत्येकाला वाटत असतं.   

ADVERTISEMENT

8 – योग्य तऱ्हेने प्रत्यके काम करणं या व्यक्तींना आवडतं. तसंच कोणतंही काम चुकीचं तर होणार नाही ना याचीही या व्यक्तींना सतत काळजी लागून राहिलेली असते. याशिवाय समोरच्या व्यक्ती आपलं बोलणं ऐकून घेतील की नाही या सगळ्या गोष्टींचीही चिंता या व्यक्तींना असते. 

9 – या महिन्या जन्म झालेल्या मुलींमध्ये भावना, रोमँटिक आणि प्रॅक्टिकल अशी तिन्ही वैशिष्ट्यं असतात. त्यामुळे हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन असतं. जेव्हा प्रेमाच्या बाबतीत डोक्यापेक्षा मनाने विचार करायची वेळ येते तेव्हा या व्यक्ती खरंच प्रेमात आहेत असं म्हणावं लागतं. 

10 – या व्यक्ती छुपे रुस्तम असतात. आपल्याला कितीही त्रास होत असला तरीही या व्यक्ती कधीही तो त्रास व्यक्त करत नाहीत. तसंच या व्यक्ती नेहमी हसतमुख राहतात. इतरांच्या तुलनेत कोणत्याही नव्या गोष्टी शिकण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात असते. 

भाग्यशाली क्रमांक – 4, 5, 16, 90, 29

ADVERTISEMENT

भाग्यशाली रंग – चॉकलेटी, निळा आणि हिरवा

भाग्यशाली वार –  बुधवार

भाग्यशाली खडा – पाचू

सप्टेंबरमध्ये जन्म झालेले प्रसिद्ध व्यक्तीमत्व –

ADVERTISEMENT

करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर कपूर, लता मंगेशकर, मनमोहन सिंह, नरेंद्र मोदी, आयुष्मान खुराना इत्यादी

हेदेखील वाचा

एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या

जाणून घ्या मे महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात कशा

ADVERTISEMENT

जाणून घ्या जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात तरी कशा

27 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT