गणेशोत्सव संपल्यानंतर वेध लागतात ते नवरात्रौत्सवाचे. नवरात्रौत्सव म्हटला की, सर्वात पहिले मनात विचार येतो तो अर्थातच देवीच्या आगमनाचा. पण त्यातही पुढचा विचार असतो तो नवरात्रौत्सव साजरा कुठे करायचा? यावर्षी मुंबईत नक्की कुठे कुठे गरबा खेळायला जायचा प्लॅन करायचा? त्याची तयारी आणि चर्चा खरं तर आधीपासूनच सुरु झालेली असते. पण बऱ्याचदा तिकिट्स बुक होत नाहीत तर काही वेळा प्लॅन ठरूनही कॅन्सल होतात. तर काही वेळा नक्की कुठे जायचं याची योग्य माहितीही नसते. मग अशावेळी दहा जणांना फोन करावा लागतो किंवा मग ऑनलाईन बुकिंग शोधण्यापासून धांदल होत असते. इतकंच नाही तर कधीकधी पास असणाऱ्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही किंवा इतर काही ना काही गोंधळ झाल्याचे अनुभव आपण सगळ्यांनीच घेतले आहेत. या सगळ्यापासून वाचायचं असेल तर तुम्हाला आम्ही या लेखातून मुंबईत नक्की यावर्षी तुम्ही कुठे नवरात्रौत्सव साजरा करू शकता याची इत्यंभूत माहिती देत आहोत.
गरबा खेळण्यासाठी अनेक मोठी मैदानं तर आहेतच. पण त्याशिवाय मुंबईमध्ये अशी अनेक नवरात्रोत्सव मंडळं आहेत जिथे गरबा आणि दांडियांचं आयोजन करण्यात येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मोफत खेळायला जाता येतं. शिवाय तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना घेऊनही जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरजही भासत नाही. तसंच काही ठिकाणी खास मोफत अशा कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येतं. पण काही ठिकाणी गरबा खेळायला जाण्यात मुंबईमध्ये मजा आहे. ही ठिकाणं गेल्या कित्येक वर्षांपासून गरबा आणि दांडियांसाठी प्रसिद्ध असून याठिकाणी अनेक मोठे कलाकार परफॉर्म करतात आणि शिवाय त्या ठिकाणांना भेट देण्यासाठी सेलिब्रिटीही येत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी जास्त क्राऊडमध्ये गरबा खेळायला लोकांना अधिक मजा येते. शिवाय बऱ्याच दिवसांनी आपल्या कुटुंबाबरोबर आणि मित्रमैत्रिणींबरोबर चांगला वेळही घालवता येतो. ज्याची आपल्याला नेहमीच्या धावपळीत जास्त गरज असते. यावर्षी असे गरबा कुठे आयोजित करण्यात आले आहेत याची माहिती जाणून घ्या.
चला तर मग वाट कसली बघताय? लागा तयारीला...
खरं तर मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी गरबा अथवा विविध कार्यक्रम साजरे होत असतात. पण त्यापैकी गरबा आणि दांडिया खेळायला जाण्यासाठी काही प्रसिद्ध जागा आहेत. या ठिकाणी गरबा खेळायला आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह जायला खूपच मजा येते. यावर्षी तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता ते नक्की वाचा आणि आपल्या मित्रपरिवारासह दांडिया आणि गरबाची मजा लुटा.
नवरात्री म्हटलं की, फाल्गुनी पाठक हे जणू काही गेले कित्येक वर्ष समीकरणच बनलं आहे. फाल्गुनी पाठकच्या गरब्याला जाण्यासाठी अनेक जण वेटिंग लिस्टवर असतात. त्याचं बुकिंगदेखील पटकन बंद होतं. तिच्या एनर्जेटिक गाण्यांवर डान्स करणंं हा प्रत्येकासाठी एक अप्रतिम अनुभव ठरतो. यावर्षी ही ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक मुंबईत असून बोरिवलीमध्ये परफॉर्म करणार आहे.
कुठे - प्रमोद महाजन कॉम्प्लेक्स, बोरिवली (Pramod Mahajan Complex, Borivali)
Google Map links - इथे क्लिक करा
तिकिटाची किंमत - Rs. 400 पासून पुढे
Link to book - इथे क्लिक करा
मुंबईमध्ये दरवर्षा मोठ्या प्रमाणावर या मैदानात गरबा खेळण्यात येतो. यावर्षीदेखील इथे नवरात्रोत्सवासाठी गरबा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या 20 वर्षांपासून हे मैदान गरबा आणि दांडियांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून इथे लोक गरब्याची मजा लुटायला येतात. अप्रतिम संगीत, विविध खाण्याचे स्टॉल्स आणि वेगवेगळ्या फॅशन्स यांची इथे चलती असते. या ठिकाणी नवरात्रोत्सवातील एकापेक्षा एक फॅशन आणि व्हरायटी पाहायला मिळतात.
कुठे - कोरा केंद्र ग्राऊंड्स, बोरिवली (Kora Kedra Grounds, Borivali)
Google Map links - इथे क्लिक करा
तिकिटाची किंमत - Rs. 450 पासून पुढे
Link to book - अजून पास मिळायला सुरुवात झालेली नाही
गेल्या काही वर्षापासून बीकेसीमधील जिओ गार्डन हेदेखील गरबा आणि दांडियांसाठी प्रसिद्ध होत आहे. जिओ गार्डन म्हटलं की, इथे तुम्हाला जास्तीत जास्त सेलिब्रिटीजची वर्दळ दिसते. वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल आणि तितकाच मोठा क्राऊड इथे गरबा खेळण्यासाठी येतो. इथे प्रत्येक येणाऱ्यांची खास व्यवस्था करण्यात येते. तसंच ही अंबानीच्या मालकीची जागा असल्याने इथे नवरात्रोत्सवात वेगवेगळे अनेक कार्यक्रमही करण्यात येतात. तुम्हीदेखील यावर्षी इथे जाऊ शकता.
कुठे - जिओ गार्डन्स, बीकेसी, बांद्रा (Jio Garden, BKC, Bandra)
Google Map links - इथे क्लिक करा
तिकिटाची किंमत - Rs. 350 पासून पुढे
Link to book - इथे क्लिक करा
गोरेगावमधील नेस्को मैदानदेखील गेल्या कित्येक वर्षापासून दांंडिया आणि गरबापासून प्रसिद्ध आहे. इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक खेळायला येतात. नवरात्रीचे नऊ दिवस इथे गरबा आयोजित करण्यात येतो. पार्थिव गोहील हे गरबा आणि दांडियाच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध नाव आहे. इथे या ठिकाणी तुम्हाला पार्थिवच्या गाण्यांवर नाचण्याची मजा घेता येते. अगदी पारंपरिक गुजराती स्टाईल गरबा खेळण्याची मजा या ग्राऊंडमध्ये घेता येते. मुंबईतील बऱ्याच ठिकाणी आऊटडोअर असल्याने गरबा रात्री 10 वाजता बंद करण्यात येतो. पण नेस्को हे इनडोअर असल्याने इथे साधारण रात्री 1 वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारासह अथवा कुटुंबासह गरब्याची मजा लुटता येते. तुम्हाला जर रात्री उशीरापर्यंत मजा करायची असेल, नाचायचं असेल तर तुम्ही नक्कीच गोरेगावमधील या ठिकाणाला भेट देऊ शकता.
कुठे - नेस्को ग्राऊंड, गोरेगाव पूर्व (NESCO, Goregoan East)
Google Map links - इथे क्लिक करा
तिकिटाची किंमत - Rs. 500 पासून पुढे
Link to book - इथे क्लिक करा
इथला नवरात्र उत्सव हा खास असतो. फोर्ट मर्चंट वेल्फेअर असोसिएशचे साधारण 1000 अधिक दुकानदार आणि सभासद एकत्रित येऊन इथल्या गरबा आयोजित करतात. इथे गरबा खेळण्यासाठी घालण्यात येणारे कपडे हेदेखील खास गुजरातमधील कच्छ या ठिकाणावरून मागवण्यात येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुजराती लोकांच्या मातीशी नाळ ठेवणाऱ्या सर्व गोष्टी इथे करण्यात येतातच पण त्याशिवाय इथे गरबा खेळण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. इथे तुम्हाला मोफत गरबा खेळता येतो. तुम्हाला जर इतर ठिकाणी जाणं परवडत नसेल आणि तरीही आपल्या मित्रमैत्रिणींसह गरब्याची मजा लुटायची असेल तर तुम्ही मुंबईतील या ठिकाणाला नक्की भेट देऊ शकता.
कुठे - कच्छ विसा ओस्वाल समाज वाडी, मस्जिद बंदर (Kutch Visa Oswal Samaj Wadi, Masjid Bunder)
Google Map links - इथे क्लिक करा
तिकिटाची किंमत - मोफत
Link to book - नोंदणी करण्याची गरज नाही. तुम्ही असाच प्रवेश करू शकता.
फाल्गुनी पाठकप्रमाणेच मुंबईमध्ये प्रीत आणि पिंकी या दोन्ही बहिणी गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या 25 वर्षांपासून प्रीती आणि पिंकी आपल्या दमदार आवाजाने गरब्याला प्रेक्षकांचं मनोरंजन करत आल्या आहेत. प्रीती आणि पिंकीची काही गाणी तर खूपच प्रसिद्ध आहेत आणि त्या गाण्यांवर गरबा आणि दांडिया खेळायला अधिक मजा येते. त्यांच्या गाण्यांवर थिरकण्यासाठी तरूणाई नेहमीच उत्सुक असते. प्रीती आणि पिंकी दरवर्षी बोरिवलीलाच आपला हा कार्यक्रम नऊ दिवस करतात. त्यामुळे यावर्षी तुम्हीसुद्धा गरबा खेळण्यासाठी उत्सुक असाल तर आपल्या ग्रुपसह जाऊ शकता. अर्थात यासाठी लागणारे पास मिळणंही आवश्यक आहे.
कुठे - कच्छी ग्राऊंड्स, बोरिवली (Kutchi grounds, Borivali)
Google Map links - इथे क्लिक करा
तिकिटाची किंमत - अजूनही किंमत फायनल नाही
Link to book - नोंदणीसाठी अजून साईट ओपन नाही
प्रत्येक ठिकाणी परफॉर्मन्स आणि जोरजोरात गाजावाजा गरबा खेळला जातो. पण पारंपरिकरित्या आणि बँडच्या आवाजावर जो मूळ गरबा आणि दांडिया आहे तो वड्याळ्यातील या श्री आझाद नगर नवरात्री महोत्सव मंडळात आजही जागृत ठेवला आहे. पारंपरिक वेशभूषेसह पारंपरिक गाण्यांवर आणि कच्छ बँडसह हा गरबा इथे नऊ दिवस खेळला जातो. हेच याचं वैशिष्ट्य कायमस्वरूपी आजपर्यंत इथे जपून ठेवण्यात आलं आहे. फक्त बीट्सवर इथे गरब्याची मजा लुटली जाते. जी पूर्वपरंपरेने चालत आली आहे.
कुठे - आझाद नगर नवरात्री चौक, आरएके चौक, वडाळा (पश्चिम) (Azad Nagar Navratri Chowk, RAK Road, Wadala West)
Google Map links - इथे क्लिक करा
तिकिटाची किंमत - मोफत
Link to book - नोंदणीची गरज नाही
गरबा हा सहसा मैदानांमध्ये अथवा आऊटडोअरच खेळला जातो. पण सहारा स्टार या 5 स्टार हॉटेलमध्येही गरब्याचं आयोजन करण्यात येतं. इथे हाय एन्ड आणि सेलिब्रिटी जास्त प्रमाणात दिसतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा इनडोअर असल्याने इथे तुम्हाला ए. सी. च्या थंडगार वाऱ्यात गरबा आणि दांडिया खेळण्याचा आनंद घेता येतो. तुम्ही अगदी नाचून नाचून कितीही थकलात तरीही घामाच्या धारा फारच कमी प्रमाणात लागतात. तसंच इथे गरब्यासह तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांचाही आनंद घेता येतो. सहारा स्टार हे मुळातच हॉटेल असल्याने इथे नवरात्रोत्सवात खास गुजराती पदार्थांची रेलचेलही असते.
कुठे - हॉटेल सहारा स्टार, विलेपार्ले पूर्व (Hotel Sahara Star, Vileparle East)
Google Map links - इथे क्लिक करा
तिकिटाची किंमत - Rs. 800 पासून पुढे
Link to book - इथे क्लिक करा
दक्षिण मुंबईतील लोकांसाठी खास आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आहे. पण केवळ 6 आणि 7 ऑक्टोबर या दोनच दिवशी इथे गरबा आणि दांडिया खेळता येणार आहेत. बाकीचे दिवस मात्र तुम्हाला दुसरीकडे काही पर्याय आहे का हे पाहावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला सेलिब्रिटी आणि इतर काही हाय प्रोफाईल व्यक्तीही दिसण्याची शक्यता आहे. पण अजूनही या ठिकाणी जाण्यासाठी लागणाऱ्या तिकिटांची किंमत मात्र फायनल करण्यात आलेली नाही. एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही या वर्षी तुमच्या मित्रपरिवारासह या हायफाय गरब्यासाठी जाण्याचा प्लॅन करू शकता.
कुठे - लॅटिट्यूड बँक्वेट्स, कमला मिल्स, लोअर परेल (Lattitude Banquets, Kamla Mills, Lower Parel)
Google Map links - इथे क्लिक करा
तिकिटाची किंमत - तिकिटांची किंमत अजूनही फायनल नाही
Link to book - इथे क्लिक करा
तसं तर ठाणे मुंबईपासून लांब नाही. ठाणे हा मुंबईचा भाग सहसा मानला जात नाही. पण तरीही गरबा म्हटलं की कुठेही जायला एका पायावर तयार होणारेही असतात. ठाण्यामध्येही ठाणे रस रंग नेहमी मोठा गरबा आयोजित करत असतात. ठाण्यामध्ये गरबा खेळण्यासाठी सर्वात चांगली जागा ही असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर यावर्षी काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ठाण्याला जाऊन गरबा नक्की खेळू शकता. उमेश बारोट, दिव्या जोशी, अमर देसाई यासारखे प्रसिद्ध कलाकार या गरब्यामध्ये परफॉर्म करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला इथेही एक वेगळा अनुभव मिळेल.
कुठे - मॉडेल्ला मिल कंपाऊंड, ठाणे (Modella mill compound, Thane)
Google Map links - इथे क्लिक करा
तिकिटाची किंमत - Rs. 350 पासून पुढे
Link to book - इथे क्लिक करा