आपण आपल्या कॉमन ब्युटी आणि आरोग्याच्या समस्या नेहमीच आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करत असतो. पण हीच गोष्ट जेव्हा आपल्या सेक्शुअल हायजीन अथवा प्रायव्हेट पार्टच्या साफसफाईच्या बाबतीत असेल तर मात्र आपण अगदी बोलायलादेखील कचरतो. पण तुम्हाला माहीत आहे का? मुलींना आपल्या निरोगी आरोग्यासाठी आपल्या सेक्शुअल हेल्थ आणि व्हजायनाच्या साफसफाईच्या बाबतीत जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मुख्यत्वे ज्या मुलींचं लग्न होणार आहे अथवा ज्या मुलींचं लग्न झालं आहे त्यांनी आपल्या सेक्शुअल हायजीनची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. वास्तविक हायजीन म्हणजे नक्की काय तर निरोगी राहण्याची पद्धती. तुम्ही याकडे वेळवर लक्ष न दिल्यास, तुम्हाला याचा पुढे त्रास होऊ शकतो. तसंच तुम्ही एखाद्या आजारानेही ग्रस्त होऊ शकता. त्यामुळे चांगल्या सेक्शुअल हेल्थसाठी नक्की काय काय मूलभूत हायजीनची काळजी घ्यायला हवी ते आपण पाहूया.
आपला प्रायव्हेट पार्ट अर्थात व्हजायना निरोगी राखण्यासाठी नेहमी तुम्ही कॉटनचेच अंडरवेअर वापरा. रेशमी अथवा सिंथेटिक कपड्याच्या अंडरवेअरमुळे तुम्हाला त्वचेवर रॅशेस येतात. घामामध्ये हे कपडे घाम शोषून घेऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा अंडरगारमेंट हे नेहमी स्वच्छ आणि सुकलेलेच घालायला हवेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अंडरवेअरचा स्टॉक हा प्रत्येक 3 ते 6 महिन्यांनी बदलणं आवश्यक आहे. कारण आपण कितीही साफ करायचं म्हटलं तरीही अंडरवेअर अस्वच्छ राहतात. त्यामुळे अशावेळी त्यामध्ये बॅक्टेरिया होण्याची शक्यता असते. यामुळे तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन निर्माण होऊ शकतं. या गोष्टीचीही काळजी घ्या की, अंडरवेअर टाईट असू नये. त्यामुळे तुम्हाला आलेला घाम बाहेर पडत नाही आणि त्यामुळे बॅक्टेरिया अधिक वाढण्याची शक्यता असते.
होत असेल White Discharge, तर माहीत असायलाच हव्यात ‘या’ गोष्टी
एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार मासिक पाळीदरम्यान व्हजायनाची अर्थात आपल्या प्रायव्हेट पार्टची काळजी घेणं आणि साफसफाई ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. पाळीदरम्यान याची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर इन्फेक्शनव्यतिरिक्त युरेटस आणि व्हजायनाशी निगडीत अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता निर्माण होते. कारण पिरियड्सदरम्यान इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशावेळी सॅनिटरी पॅड, पँटी लायनर अथवा टॅम्पॉन सारख्या गोष्टींचा जास्त काळ वापर करू नका. प्रत्येक 6 तासानंतर वापरत राहा.
प्यूबिक हेअर अर्थात प्रायव्हेट पार्टवरील केस काढताना नेहमी काळजी घ्यावी. कारण असं न केल्यास, बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन त्या ठिकाणी पुळ्या येऊ शकतात. तुम्ही जर एखाद्या शेव्हरने हे केस काढणार असाल तर तो शेव्हर स्वच्छ असायला हवा आणि जर क्रिम असेल तर नवीन असायला हवं या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. अन्यथा तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. तुम्ही जर एखाद्या पार्लरमधून बिकिनी वॅक्स करून घेणार असाल तर बेसिक हायजीन तपासून घ्या.
सेक्स करण्यापूर्वी जर तुम्हाला बाथरूमला जावंसं वाटत असेल तर तुम्ही दाबून धरू नका. कारण असं केल्यास, ब्लॅडरमध्ये असलेले बॅक्टेरिया तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. तसंच आपल्या जोडीदाराला तुम्ही सेक्स केल्यानंतर प्रायव्हेट पार्ट धुताना त्यावर फोरस्किन काढून धुवायला सांगा. त्यामुळे आतमध्ये स्पर्म जाण्याची आशंका राहात नाही. व्हजायनाच्या जवळपास परफ्यूम मारू नका. यामुळे अलर्जी होण्याचा धोका असतो. तसंच असं केल्यास, व्हजायनल डिस्चार्ज वाढतो. मुलींच्या प्रायव्हेट पार्टमध्ये pH अॅसिडिक असतं तर मुलांच्या बाबतीत हे उलट असतं. त्यामुळे व्हजायनाचं pH बिघडतं. म्हणूनच UTI सारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे सेक्स केल्यावर लवकरात लवकर व्हजायना पाण्याने साफ करून घ्यायला हवी. पण तुम्हाला जर बाळ हवं असेल तर असं करू नका.
- व्हजायनाच्या आजूबाजूला साबण लावू नका. कारण त्यामुळे व्हजायना आणि त्याच्या आजूबाजूला असणारे चांगले बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात. जे त्वचेचं इन्फेक्शन थांबवण्यासाठी फायदेशीर असतात.
- रोज अथवा एक दिवस आड तुम्ही आंघोळ करताना कोमट पाण्याने व्हजायना धुवा. त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका टळतो.
- नेहमी आपला प्रायव्हेट पार्ट हा पुढून मागे धुवायला हवी. मागून पुढे असं कधीही धुवू नये. कारण पाण्याबरोबर मागच्या बाजूचे बॅक्टेरिया व्हजायनापर्यंत पोहचून तुमच्या व्हजायनाला धोका पोहचवू शकतात.
- तुम्हाला वाटत असेल की व्हजायनाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं आहे तर त्वरीत डॉक्टरांची भेट घ्या
- शारीरिक संबंध ठेवताना जर जळजळ होत असेल तर काही दिवस सेक्स करू नका
तुमच्या पार्टनरला माहीत असायला हव्या व्हजायनाबाबतच्या '11' गोष्टी