अवधूत गुप्ते तयार करणार पहिली Crowdsource गणपती आरती

अवधूत गुप्ते तयार करणार पहिली Crowdsource गणपती आरती

सगळीकडे गणेशोत्सवामुळे आनंदी आणि उत्साही वातावरण आहे. अशातच यंदाच्या गणेशोत्सव खास करण्यासाठी लोकप्रिय संगीतकार व गायक अवधूत गुप्ते आणि गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर यांनी एकत्र येऊन पहिली क्राऊडसोर्स्ड गणपती आरती तयार करण्याचा मानस केला आहे. या अशा प्रकारच्या पहिल्या आणि अतिशय अनोख्या गणपती आरतीसाठी जास्तीत जास्त लोकांनी शब्दांचे योगदान करावे यासाठी अवधूतने आवाहन केले आहे.

अवधूतची आगळीवेगळी संकल्पना

अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर प्रोफाईलवर आपण गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलरसोबत पहिली क्राऊडसोर्स्ड गणपती आरती तयार करत असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. संगीतकार अवधूत यांनी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की गणपतीबाप्पा आपल्या अनेक रूपांमधून आपल्या जीवनात आनंदाचे, पावित्र्याचे रंग भरत असतात. श्रीगणेश ही अष्टपैलू आणि बहुगुणी देवता आहे, त्यामुळे त्यांची स्तुती करणारी आरती देखील अतिशय अनोखी आणि वैविध्यपूर्ण असायला हवी आणि म्हणूनच ते सादर करत आहेत बाप्पाच्या आरतीचा 'नया अवतार'.  आरती कशी तयार होणार याचे उदाहरण देताना अवधूत यांनी स्वतः काही ओळी रचल्या आहेत - "लाईफ को रंगों से भरने तू आया, सब का तू देवा, सब का तू देवा"   गणेशभक्तांनीदेखील मोठ्या संख्येने आणि उत्साहाने या उपक्रमात सहभागी होऊन आरतीच्या ओळी सुचवाव्यात असे आवाहन अवधूत गुप्ते यांनी केले आहे.  या ओळींवरून अवधूत गुप्ते गणेश आरती रचतील आणि अशातऱ्हेने "बाप्पा के आरती का नया अवतार" अर्थात बाप्पाच्या आरतीचा नवा अवतार निर्माण होईल.

गोदरेज एक्सर्टचा अनोखा उपक्रम

गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीमच्या सहयोगाने हाती घेण्यात आलेला हा अभिनव उपक्रम आणि गणपती आरतीच्या नव्या अवताराबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सांगितले, "गेली अनेक वर्षे लोकांना एकजूट करण्याच्या कमी गणेशोत्सव मोलाची भूमिका बजावत आहे.  यंदा मी आणि गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर एकत्र येऊन गणेश आरतीचा नवा अवतार सादर करून काही अनोखे आणि नवेकरू पाहत आहोत.  ही आरती जरी नवी असली तरी लोकांना एकजूट करण्याचा गणेशोत्सवाचा मूळ उद्देश त्यातून साध्य केला जाणार आहे.  म्हणूनच आम्ही या आरतीचे बोल क्राऊडसोर्स करणार आहोत.  त्यासाठी श्रीगणेश भक्तांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि अतिशय अनोख्या पद्धतीने गणेशाचे स्वागत करावे. मला पक्की खात्रीआहे की या नवीन आरतीमुळे यंदाच्या गणेशोत्सवाचे आनंद आणि उत्साहाचे रंग अधिकच खुलून येतील."  पुढच्या आठवड्यापासून अवधूत गुप्ते आरतीच्या संगीतरचनेचे काम सुरु करतील.  भारतातील कोणत्याही भागातील कोणीही व्यक्ती या उपक्रमात सहभागी होऊ शकते.  अवधूत गुप्ते यांच्या इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर प्रोफाईल्सवर जाऊन आणि कमेंट सेक्शनमध्ये स्वतः रचलेल्या आरतीच्या ओळी पोस्ट करायच्या आहेत.  अवधूत गुप्ते आणि गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर या क्राऊडसोर्स्डगणपतीचे आरतीचे प्रकाशन त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर गणेशोत्सवादरम्यान करतील. 

अधिक वाचा

#MemoriesOfYourBappa: मराठी सेलिब्रेटींच्या आठवणीतला बाप्पा

#POPxoMarathiBappa : अंबानींकडे गणपतीचं जंगी सेलिब्रेशन

व्हीआयपी गाढव'मधून शीतल अहिरराव आणि भाऊ कदमची रंगली जोडी