हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं जी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरुन खाली जाते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार याची उत्सुकता अनेकांमध्ये असणार यात शंका नाही. प्रेक्षकांना एकीकडे ‘हिरकणी’ सिनेमाविषयी उत्सुकता असताना दुसरीकडे हे देखील जाणून घेण्यास आतुर होते की, नेमकी कोणती अभिनेत्री ‘हिरकणी’ साकारणार? आता या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे कारण ‘हिरकणी’ सिनेमाचे मुख्य पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’चे नवीन पोस्टर नुकतेच पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधून प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे आणि सोनालीच्या माध्यमातून हिरकणीला मिळालेला चेहरा लोकांच्या नक्कीच कायमस्वरुपी स्मरणात राहील याची खात्री आहे. विशेष म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर यांनी मोशन पोस्टरला आवाज दिला आहे. या पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी हिरकणी उर्फ सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक, राजेश मापुस्कर, लॉरेन्स डिसुझा उपस्थित होते. ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटानंतर प्रसाद ओक आता कोणत्या चित्रपटाची नवी निर्मिती करणार याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता होती. प्रसादने एक वेगळाच विषय घेऊन आता ती उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढवली आहे. प्रसाद ओकला त्याच्या चाहत्यांनी नेहमीच प्रेम दिलं आहे आणि प्रसादनेही आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारून आणि वेगळा विषय हाताळत दिग्दर्शन करत प्रेक्षकांना आनंद दिला आहे.
वयाचं अंतर असूनही प्रेमात आकंठ बुडाल्या आहेत टीव्हीवरील ‘या’ जोड्या
सोनाली कुलकर्णी हे नाव काही इंडस्ट्रीला नवं नाही. पण या चित्रपटात सोनालीने नक्कीच वेगळ्या धाटणीची भूमिका स्वीकारून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सोनालीने अनेक मराठी चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता हिरकणीच्या भूमिकेला सोनाली कसा न्याय देणार आणि हिरकणीची भूमिका सोनाली कशी वठवणार याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांमध्ये शिगेला पोहचली आहे. सोनालीचा हा नवा अवतार प्रेक्षकांना भावतोय का हे लवकरच कळेल.
प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’चे नवीन पोस्टर नुकतेच पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधून प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे आणि सोनालीच्या माध्यमातून हिरकणीला मिळालेला चेहरा लोकांच्या नक्कीच कायमस्वरुपी स्मरणात राहील याची खात्री आहे. विशेष म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर यांनी मोशन पोस्टरला आवाज दिला आहे. या पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी हिरकणी उर्फ सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक, राजेश मापुस्कर, लॉरेन्स डिसुझा उपस्थित होते. ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटानंतर प्रसाद ओक आता कोणत्या चित्रपटाची नवी निर्मिती करणार याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता होती. प्रसादने एक वेगळाच विषय घेऊन आता ती उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढवली आहे. प्रसाद ओकला त्याच्या चाहत्यांनी नेहमीच प्रेम दिलं आहे आणि प्रसादनेही आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारून आणि वेगळा विषय हाताळत दिग्दर्शन करत प्रेक्षकांना आनंद दिला आहे.
Ash लवकरच दिसणार डबल रोलमध्ये, एका हटके भूमिकेत
POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.
तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.