ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
HouseTips : मुलांची खोली सजवताना लक्षात घ्या या गोष्टी

HouseTips : मुलांची खोली सजवताना लक्षात घ्या या गोष्टी

फक्त काटूर्न्सची पोस्टर, भिंतीला दिलेले भडक रंग किंवा छताला लावलेले रेडिअम स्टिकर्स यांनी मुलांची खोली डेकोरेट होत नाही. आजकाल पालक आपल्या मुलांच्या खोल्यांना हटके आणि interactive पद्धतीने सजवू इच्छितात. खरंतर आजकाल इंटिरिअर करताना #kidsroom लाही विशेष प्राधान्य दिलं जातं. पण साधारणपणे पालक एक थीम ठरवून त्याप्रमाणे मुलांची खोली सजवतात. असं करू नका. जर तुमच्याकडे बजेट आणि वेळ कमी असेल तर मग तुम्ही पुन्हा वापरता येतील अशा वस्तूंनीही किड्सरूम डेकोरेट करू शकता. या संदर्भातल्याच काही सोप्या आणि बजेट टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

रंगांची जादू

आपण नेहमी पाहतो की, मुलीची खोली असेल तर गुलाबी आणि मुलाची खोली असेल तर निळा रंग दिला जातो. पण यापुढे जाऊनही विचार करा. नव्या काळातील नवीन शेड्स वापरून पाहा. जसं पीच, निऑन शेड्स किंवा लाईट यलो सारख्या शेड्स ज्या gender बेस्ड नसतील.

वाचा – घरातील वास्तु टिप्स

ADVERTISEMENT

फर्निचरची योग्य निवड

पालक नेहमी रंग निवडताना जेवढा वेळ देतात तेवढा वेळ फर्निचर निवडीला देत नाहीत किंवा अगदी खोलीच्या रंगांप्रमाणेच फर्निचर असायला हवं असं नाही. काही फर्निचर हे रूमच्या रंगाशी मिळतंजुळतं तर काही फर्निचर opposite शेड्सचं निवडा. पण फर्निचर हे किड्स फ्रेंडली असावं आणि जे तुम्हाला दुसऱ्या रूम्समध्ये वापरता येईल असं असावं. म्हणजे त्याचा गरज पडल्यास इतरत्र वापर करता येईल. तसंच ठराविक वेळाने मुलांच्या रूममधील फर्निचर बदलत राहा. कारण मुलांनाही बदल आवडतोच. 

अभ्यासासाठी पूरक वातावरण

आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यात आपल्या घरातील वातावरणाचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे मुलांची रूम सजवतानाही या गोष्टीची काळजी घ्या की, त्यांच्या खोलीतील वातावरण हे अभ्यासाला पूरक असेल. एजुकेशनल वातावरणासाठी रूममध्ये चार्ट्स, बोर्ड्स आणि इतर माहितीच्या पोस्टर्सनी भिंती सजवा. ज्यामुळे मुलांना येताजाता अभ्यासाची गोडी लागेल. याशिवाय तुम्ही एखाद्या कोपऱ्यात छोटी लायब्ररी किंवा चॉकबोर्डही लावू शकता. ज्यामुळे मोकळ्या वेळेत मुलांना आणि तुम्हाला एकत्र काहीतरी क्रिएटीव्ह करता येईल.

Also Read Home Decor Ideas In Marathi

ADVERTISEMENT

मुलांची आवडही घ्या लक्षात

मुलांच्या रूमला सजवताना त्यांची आवडही लक्षात घ्या. त्यांच्या पर्सनॅलिटीनुसार रंगांची निवड करा. जर ते खूप energetic असतील तर डोळ्यांना थंडावा देणारे किंवा peaceful वाटणारे कलर रूमला द्या. ज्यामुळे मुलांना रूममध्ये आल्यावर शांत आणि रिलॅक्सिंग वाटेल. तुम्ही भिंतीवर डूडलिंग केलेले वॉलपेपर्स, स्क्रिबल्स किंवा मोटीव्हेशनल कोट्स ही लावू शकता.

सजावटीमध्ये मुलांचाही सहभाग

जर तुमच्या मुलाला ड्रॉईंगची आवड असेल तर त्यांच्या आवडीने पेटींग्ज्स निवडा किंवा त्याने रेखाटलेल्या एखाद्या चित्राने खोली सजवा. जर त्याला विज्ञानाची आवड असेल तर ग्लोबल वॉर्मिंग किंवा सायन्सशी निगडीत विषयांवरील चार्ट रूममध्ये लावा. त्या रूममध्ये एखादं ट्री-हाऊस किंवा टेंटसारखी गोष्ट बनवा म्हणजे त्यांना ती खोली अजून आपलीशी वाटेल.

नॅचरल टच

मुलांच्या खोलीतील खिडक्या मोठ्या पण सुरक्षित उपाययुक्त ठेवा. ज्यामुळे त्या रूममध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा खेळती राहील. एखादं रोपटं लावा आणि ते सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा मुलांवर टाका. यामुळे मुलांनाही निसर्गाप्रती प्रेम वाटेल.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

टॉप 10 आयडियाजमुळे तुमचं बेडरूम दिसेल अधिक सुंदर!

बेडरूमसाठी फॉलो करा या वास्तू टीप्स

घराच्या सौदर्यांत भर टाकणाऱ्या ‘कॉटन आणि हँडलूम’ पडद्यांच्या टेंडविषयी बरंच काही…

ADVERTISEMENT
08 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT