तुम्ही अनेकदा उंदरांमुळे झालेल्या नुकसानाबद्दल ऐकलं असेल. एकदा घरात उंदीर शिरला की काही खरं नाही. उंदराला सोडून बाकी सगळ्यांचीच झोप हमखास उडते. मग सुरू होते उंदराला पकडण्याची धावपळ. काय उपाय करावा या उंदरांसाठी असा प्रश्न घरातल्या प्रत्येकालाच पडतो. उंदरांना मारण्याचं औषधं आणा, पिंजरा लावा. पण आता चिंता नको. कारण या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उंदराला घराबाहेर घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय. जे तुम्ही घरातील वस्तू वापरून करू शकता.
उंदीर घरात घुसणे हे तुमच्या वास्तूसाठी चांगलं नसल्याचं मानण्यात येतं. कारण उंदीर घरात असणं हे दारिद्रयाचं लक्षणं मानलं जातं. उंदरांमुळे घरामध्ये नकारात्मक प्रभावही वाढतो. तसंच उंदरांमुळे घरातही आजार पसरण्याची भीती असते. जर तुमची इच्छा असेल की, उंदराला मारल्याशिवाय ते घराबाहेर जावे. तर हे घरगुती उपाय नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील.
उंदीर हा कोपऱ्यात लपणार आणि अंधारात राहणारा प्राणी आहे. याच कारणामुळे तो नकारात्मकतेचं प्रतीकही मानला जातो. उंदीर हे नेहमी अंधारातच बाहेर पडतात आणि घरातल्या गोष्टीचं नुकसान करतात.
तुम्हाला माहीत आहे का की, उंदरांना कोणताही उग्र वास सहन होत नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणाहून उंदीर घरात शिरतो असं वाटतं किंवा लपला आहे असं वाटतं. तिकडे कापसाच्या बोळ्यावर पुदीन्याचं तेल लावून ठेवा. असं केल्यास त्या ठिकाणी उंदीर पुन्हा येणार किंवा लपणार नाही. याशिवाय उंदराला घरापासून लांबच ठेवण्यासाठी तुम्ही पुदीन्याच्या रोपाची लागवडही करू शकता.
आपल्या रोजच्या खाण्यासाठी वापरात असलेली लाल मिरची उंदरांवरही जालीम उपाय आहे. तुमच्याकडे उंदरांचा सुळसुळाट झाला असेल तर उंदरांच्या लपण्याच्या ठिकाणी लाल मिरचीची पावडर ठेवा. उंदीर घरात घुसण्याआधी नक्कीच विचार करेल. मग पाहा उंदीर कसे तुमच्या घरातून बाहेर पळ काढतात.
घरात वापरण्यात येणाऱ्या गरम मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे तमालपत्र. मिरचीसोबत तुम्ही याचाही वापर उंदरांचा त्रास टाळण्यासाठी करू शकता.
जर तुम्हाला उंदरांना घरात कधीच प्रवेश करू द्यायचा नसेल तर आवड असल्यास तुम्ही मांजर पाळू शकता. कारण तुम्हाला तर माहीत आहेच मांजर आणि उंदरातील वैर. जर तुम्ही घरात मांजर पाळलीत तर घरात उंदरांचा त्रास कधीच होणार नाही.
वर सांगितल्याप्रमाणे उंदरांना उग्र वास आवडत नाही. त्यामुळे तुम्ही उंदरांपासून सुटकेसाठी पेपरमिंटच्या गोळ्यांचाही वापर करू शकता. याच्या वासाने उंदीर नक्कीच घराबाहेर पळ काढतील.
तुरटीची पावडर बघताचा उंदीर दूर पळतील. जिथे उंदराने त्याचं बिळ बनवलं आहे असं तुम्हाला वाटतं तिकडे तुरटीची पावडर टाका. उंदराचा त्रास नक्कीच कमी होईल.
हो...आश्चर्य वाटलं ना काळी मिरी आणि कांदा हे उपाय वाचून. काळी मिरी पाण्यात मिक्स करून ते पाणी उंदरांचा सुळसुळाट असणाऱ्या जागी शिंपडा. उंदरांचा तुमच्या घरातील हैदोस नक्कीच कमी होईल. तसंच तुम्ही कांद्याचा वापरही करू शकता. कारण कांद्याचा वासही उग्र असतो. कांद्याचे छोटे छोटे तुकडे कापून उंदरांच्या बिळाजवळ की लपण्याच्या जागी ठेवा. उंदीर पुन्हा कधी तिथे फिरकणार नाहीत.
तुम्हाला माहीत आहे का, उंदरांना पळवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता ते आपले केस. आश्चर्य वाटलं ना. पण उंदरांना पळवण्यासाठीही हाही एक चांगला उपाय आहे. कारण आपले केस उंदराने गिळल्यास त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे ते केस पडलेल्या ठिकाणी जात नाहीत.
सर्वात महत्त्वाची टीप : तुमच्या घरात उंदीर येऊ नये म्हणून घर स्वच्छ ठेवा. तसंच एका ठिकाणी जास्त अडगळीचं सामान ठेवू नका. नेहमी सामान आवरून आणि कमीतकमी ठेवा. कारण कोंदट आणि अडगळीच्या ठिकाणी उंदरांचा वावर जास्त असतो. खासकरून पावसाच्या काळात उंदीर हमखास घरात शिरतात. त्यामुळे वर सांगितलेले उपायही नक्की करून पाहा आणि उंदरांपासून सुटका मिळवा.
P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.