पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी हल्ली अनेक जण पेडिक्युअर अगदी आवर्जून करतात. म्हणजे ज्यांना घरच्या घरी काळजी घेता येत नसेल अशा व्यक्ती तर अगदी हमखास सलूनमध्ये जाऊन पेडिक्युअर करतातच. पण हल्ली सगळ्यांमध्ये तुम्हाला इतके पर्याय मिळतात की, पेडिक्युअरमध्येही तुम्हाला असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला हल्ली सलोनमध्ये उपलब्ध करुन दिले जातात. तुम्हालाही पेडिक्युअर करायला आवडत असेल तर मग तुम्ही अगदी हमखास पेडिक्युअरचे हे प्रकार जाणून घ्यायला हवे.
स्पा हा शब्द आता सगळ्यांनाच्याच ओळखीचा आहे. कारण हल्ली पार्लर किंवा सलूनमध्ये गेल्यानंतर अनेकदा हेअर स्पा, फुट स्पा असे काही करण्याचा सल्ला नक्कीच दिला जातो. यामध्येच पायांचे सौंदर्य वाढविणाऱ्या स्पा पेडिक्युअरचा देखील समावेश असतो. स्पा पेडिक्युअरबद्दल सांगायचे तर या प्रकारच्या पेडिक्युअरमध्ये तुमच्या साध्या पेडिक्युअरप्रमाणे नेल कटींग, फायलिंग, क्युटकल रिमुव्हिंग, मसाज असे केले जाते.याचा कालावधीत हा साध्या पेडिक्युअरपेक्षा जास्त असतो. तुमच्या पायांना अधिक आराम देण्याचे काम या प्रकारच्या पेडिक्युअरमध्ये केले जाते. शिवाय सगळ्यात शेवटी तुमच्या पायांना मास्कही लावला जातो. एकूणच स्वत:च्या पायांना रॉयल ट्रिट देणारे असे हे पेडिक्युअर आहे.याची किंमत साधारण 700 रुपयांपासून पुढे असते.
एखाद्याच्या पायची सुंदर नेलपेंट पाहिली तर आपल्यालाही वाटते की, आपली नेलपेंट अशी चांगली राहात नाही. तर त्या मागे कारण आहे. जेल पेडिक्युअर जेल पेडिक्युअर हा प्रकार हल्ली सर्रास सगळ्या सलोनमध्ये असतो. आता इतर कोणत्याही पेडिक्युअरप्रमाणे तुम्हाला पेडिक्युअर केले जाते. पण सगळ्यात शेवटी जो इफेक्ट असतो तो तुम्हाला जेल पेडिक्युअरमध्ये मिळतो. आता जेल पेडिक्युअरसाठी वापरली जाणारी नेलपेंट ही जेलपॉलिश असते. जी जास्त काळासाठी टिकू शकते. शिवाय हे जेल पेडिक्युअर करताना तुमच्या क्युटीकलला एक अशी जेल लावण्यात येते. ज्यामुळे तुमचे क्युटीकल सहजासहजी आणि पटकन वाढत नाही. हे पेडिक्युअर खूप काळासाठी टिकते. हे पेडिक्युअर साधारण 500 रुपयांपासून पुढे असते.
हॉट स्टोन पेडिक्युअर हे इतर पेडिक्युअरच्या तुलनेत थोडे वेगळे आहे. या पेडिक्युअरसाठी बॉडी पॉलिशिंगच्या गोष्टी वापरता येतात. पायांना मास्क लावल्यानंतर पाय स्वच्छ करुन त्यावर तेलाने मसाज केला जातो. हे करताना मसाजचे स्टोन गरम करुन ते पायावर फिरवले जातात. पायांना त्याचा तब्बल 20 मिनिटांपर्यंत मसाज केला जातो. या पेडिक्युअरची किंमत साधारण 1000 ते 1200 रुपयांच्या घरात असते.
आता तुम्ही कधीतरी आईस्क्रिम पेडिक्युअर याविषयी जर ऐकले असेल तर तुम्हाला या बद्दल अधिक माहिती हवी. आईस्क्रिम पेडिक्युअरसाठी खास फुट सोक वापरण्यात येते. आईस्क्रिमच्या आकारामधील आणि त्याच्या फ्लेवरमधील सोक सोप या गरम पाण्यामध्ये टाकला जातो. यामुळे तुमचे पाय अधिक नरम आणि मुलायम होतात. पाय संपूर्ण स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला लावण्यात येणारे क्रिमही खास असते. शिवाय मसाज आधी तुम्हाला एक पॅक लावण्यात येतो. हा पॅक तुम्हाला आराम तर देतोच शिवाय तुमच्या पायाची त्वचा मुलायम करतो. हे पेडिक्युअर तुलनेने थोडे महाग असते म्हणजे साधारण 900 ते 1000 रुपये यासाठी आकारले जातात.
जर तुम्ही चॉकलेट प्रेमी असाल तर तुम्ही अगदी हमखास चॉकलेट पेडिक्युअर करायला हवे. चॉकलेट पेडिक्युअरसाठी सगळे चॉकलेट प्रोडक्ट वापरले जातात. चॉकलेट सोकमध्ये पाय बुडवून ठेवला जातो. चॉकलेट उत्तम अँटीऑक्सिडंट असल्यामुळे तुमच्या पायावरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते. त्यावर चॉकलेट स्क्रब, चॉकलेट मसाज ऑईल वापरण्यात येते. हे पेडिक्युअर तुम्हाला साध्या पार्लर किंवा सलोनमध्ये मिळणं शक्य नाही. याची किंमतही जास्त असते. साधारण 1500 रुपयांच्या घरात हे पेडिक्युअर असते.
आता तुम्ही पेडिक्युअर करायला जाणार असाल तर या प्रकारातील पेडिक्युअर नक्की करुन पाहा आणि तुमच्या पायांचे सौंदर्य अधिक खुलवा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.