....आणि कोणताही प्लॅन नसताना आम्ही SEX केलं

....आणि कोणताही प्लॅन नसताना आम्ही SEX केलं

आयुष्यात कधीच काही प्लॅन नसतं.. (हा म्हणजे काहींच लाईफ हे फारचं प्लॅन असेल) पण Life is unpredictable म्हणतात ते अगदी खरं आहे. प्रेमातही असं अनेकदा होतं. म्हणजे काही गोष्टी आपण ठरवलेल्या नसतात. पण त्या होतात. तुम्ही सुद्धा प्लॅन नसताना काही गोष्टी केल्या आहेत का? ‘सेक्स’ केलं आहे का? हा म्हणजे कोणताही प्लॅन नसताना बरं का! आमच्यासोबत लोकांनी त्यांचे असेच काही अनुभव शेअर केले आहेत. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यात हा क्षण अचानक नेमका आला कधी ते

जेव्हा अशा गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतात… तेव्हा तुम्हाला असते sex ची गरज

Table of Contents

  हम तुम एक कमरे मे बंद हो

  shutterstock

  आमच्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप अलिबागला फिरण्यासाठी गेलो होतो. मस्त दोन ते तीन दिवसांचा आमचा प्लॅन होता. ग्रुपमध्ये कपल असं काही नव्हतं. म्हणजे आम्ही सगळे चांगले मित्र- मैत्रीण होतो. अलिबागला पोहोचेपर्यंत आम्हाला इतका वेळ गेला की, आम्ही सगळे फारच दमून गेलो. ज्यावेळी हॉटेलमध्ये पोहोचलो त्यावेळी आम्हाला आरामाची फारच गरज होती. मी आणि रसिका सोडून बाकी सगळ्यांनी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघांनी एकाच रुममध्ये राहणे पसंत केले. आम्ही दोघांनी रुममध्ये राहून काहीतरी खेळण्याचा विचार केला. आम्ही पत्ते खेळायचे ठरवले. पत्ते खेळता खेळता आम्ही नको त्या गोष्टींवर बोलायला सुरुवात केली. हा खेळ इतका पुढे गेला ही, आम्ही एकमेकांच्या फारच जवळ आलो. अचानक मी रसिकाला किस केलं.मी काय चुकीचे केलं हे कळायच्या आत रसिकाने मला किस केलं. आम्ही असे कधी काही करु असे वाटले सुद्धा नव्हते. रसिका आणि मी एकत्र एका बेडवर SEX एन्जॉय करतोय यावर मला विश्वासच बसत नव्हता. आम्ही दोघांनीही असा कधीच एकमेकांबद्दल विचार केला नव्हता. त्यानंतर आम्ही एकमेकांशी त्याबद्दल काहीच बोललो नाही. हम तुम एक कमरे मे बंद हो अशी काहीशी आमची अवस्था झाली होती. पण जितका वेळ आम्ही एकत्र होतो तितका वेळ आम्ही दोघे जणू स्वर्गात होतो. बाकी सगळे मित्र परतल्यानंतर मात्र आम्ही सगळं काही नॉर्मल असल्याचं दाखवलं पण ते दोन दिवस एकमेकांपासून दूर राहण्याचा आम्हाला कंटाळा आला होता.

  आणि आम्ही आमच्या पार्टनरला चीट केलं

  shutterstock

  माझं माझ्या बॉयफ्रेंडवर खूप प्रेम आहे. पण माझ्याकडून अशी चूक कधी होईल असे कधी वाटले नव्हते. मी आणि माझा बिझनेस पार्टनर एका मिटींगसाठी बाहेर गेलो होतो. पण आमची मिटींग इतक्या उशीरापर्यंत चालली की, आम्हाला त्या दिवशी निघणे फारच कठीण होते. आम्ही एका हॉटेलमध्ये आलो. फ्लाईट अगदी तीन-चार तासानंतर होती म्हणून आम्ही एकच रुम घेण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या बॉयफ्रेंडशी फोनवर बोलत होते. त्याला आम्ही काय करणार आहोत ते सगळं सागंत होते. त्याचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे त्याने काळजी घ्या असे म्हणत फोन ठेवला. मलाही बरीच काम करायची होती. माझा पार्टनर माझ्याच वयाचा होता काहीच तास एकमेकांसोबत काढायचे म्हणून आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. त्याला माझ्या रिलेशनशीपबद्दल सगळे काही माहीत होते.पण एक वेळ अशी आली की, त्याने मला अचानक स्पर्श केला. त्याच्या त्या स्पर्शामुळे मी मोहरुनच गेले. मला काय झालं ते मला कळलं नाही. मी अचानक त्याच्या बाजूने वळले. त्याच्या मिठीत मी काही क्षणांसाठी विसावले. त्यानंतर आम्ही सेक्स केलं. मी त्या क्षणी माझ्या बॉयफ्रेंडला विसरुन गेले होते. माझा पार्टनरही विवाहीत होता. पण त्याच्याकडूनही ही चूक झाली होती.  फ्लाईटसाठी आता काहीच तास शिल्लक होते. मला खूप अपराध्यासारखे वाटले. मी पुन्हा कधीही त्याच्यासमोर गेले नाही आणि तो ही त्याच्या बायकोशिवाय माझ्यासमोर आला नाही. यानंतर अशी चूक पुन्हा होणार नाही याची मी खबरदारी बाळगते.

  पावसाळ्यात sexचा आनंद असतो खास, महिलांनी शेअर केले त्यांचे अनुभव

  आयुष्यातील हवाहवासा क्षण

  shutterstock

  आमच्या रिलेशनशीपला 3 वर्षे झाली आहेत. पण आम्हाला आमचा असा वेळ कधीच घालवता आला नाही. आमच्या कामाच्या वेळा,करीअर यामध्ये या सगळ्या गोष्टी राहून गेल्या आहेत. आमच्यातील वाढतं जाणार अंतर आमच्यासाठी काळजीचे कारण होते. पण मग आम्ही एक दिवस भेटायचं ठरवलं. संपूर्ण दिवस आम्ही आम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करणार होतो. सकाळीच आम्ही मुव्हीला जाण्याचे ठरवले. खूप दिवसांनी एकत्र असल्यामुळे आम्हाला थोडे वेगळे तर नक्कीच वाटत होते. पण आम्ही खूश होतो. एकमेकांचा हात पकडता पकडता एकमेकांना जवळ घेऊ लागलो. त्याने मला अचानक ओठांवर किस केलं. मग काय आधीच आम्हाला एकमेकांची ओढ होती. त्यात अशी संधी चालून आल्यानंतर करायचे काय असा प्रश्न पडला. आम्ही लगेचच बाहेर पडून हॉटेलमध्ये जाण्याचे ठरवले. त्याने फोनमधून हॉटेलची एक रुम आमच्यासाठी बुक केली. आम्ही रुममध्ये गेलो आणि जवळजवळ तासभर तरी आम्ही मनसोक्त सेक्स केलं. कित्येक महिन्यांपासून आमच्यातील दुरावा असा मिटला होता. मला प्रत्येक क्षणी आनंद होत होता. इतका की, मला हा क्षण कधीच जाऊ नये असे वाटत होते. त्यानंतर पुन्हा जेव्हा कधी वेळ येईल असे आम्हाला वाटले त्याआधीच आम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन करु लागलो.

  पहिल्यांदा *Condom वापरुन सेक्स केले तेव्हा…. वाटले  

  आमची काहीही तयारी नव्हती

  shutterstock

  मी आणि माझा बॉयफ्रेंड नाईट आऊटसाठी बाहेर गेलो होतो. मजा-मस्ती करायची असा आमचा मस्त प्लॅन जमला होता. आम्ही मुव्ही बघत होतो. अचानक आम्ही एकमेकांकडे वळलो. या आधी आम्हाला एकमेकांबद्दल असे कधीच वाटले नव्हते. पण त्या दिवशी आम्हाला एकमेकांकडून काहीतरी वेगळे हवे होते. आम्ही सोफ्यावरच होतो. अचानक त्याने त्याचे कपडे काढायला सुरुवात केली. आम्ही काय करतोय आम्हाला चांगलच कळत होतं. पण आम्हाला आनंद येत होता. आम्ही असं काहीच प्लॅन केलं नव्हतं. सगळं अचानक घडत होतं. मी कसलीच तयारी केली नव्हती. अक्षरश: कसलीच तयारी केली नव्हती. आम्ही खूपच पुढे निघून जातं होतो. सेक्ससाठी आम्ही तयारी केली नव्हती. पण सगळं काही फ्लोमध्ये होत होतं. आमच्याकडे कंडोमही नव्हते. पण ते नसताना कसलीही भविष्याची तमा न बाळगता आम्ही सेक्स केलं. एकदा नाही तर वारंवार. आम्ही त्या रात्री एकमेकांच्या फारच जवळ होतो. त्यानंतर आम्ही सेक्सपूर्वी खूप काळजी घेतली खरी पण तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही.

  आवरता आवरता आले नाकी नऊ

  shutterstock

  लग्नानंतर सेक्स होणं अगदी स्वाभाविक असतं असं म्हणतात. पण आमच्या दोघांच्या बाबतीत असे झाले नाही. घरातील पाहुणे त्यांची उठबस करेपर्यंत आमचा वेळ असाच जात होता. मला तर पाहुणे घरातून जात नाहीत याचा कंटाळा आला होता. ते सगळे माझेच नातेवाईक होते पण ते मला नकोसे झाले होते. आम्हाला आमच्या दोघांच्या प्रायव्हसीसाठी एक मिनिटही मिळत नव्हता आणि कोणालाच हे कळत नव्हते. पण मी एकदा संधी काढलीच. माझ्या बायकोला मी रात्री टेरेसवर बोलावून घेतले. घरातील कोणालाच कळणार नाही अशी वेळ ठरवून सगळे प्लॅन केले. ती वर आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. मग काय आम्ही दोघे तिथेच विरघळलो. लग्नाला 15 दिवस झाले होते. काहीही सोय नसताना आणि काहीही नसताना आम्ही चक्क एकमेकांवर होतो…. टेरेसवर!!! मला विश्वास बसत नव्हता. आम्ही तिथे सेक्स करत होतो. या दिवसाची आम्ही लग्न झाल्यापासून पाहात होतो. भेटून एकमेकांसोबत बोलण्याचा विचार असताना अचानक असे झाल्यामुळे आमचा आनंद गगनात मावत नव्हता. पण त्यानंतर सगळं आवरुन खाली येईपर्यंत नाकी नऊ आलो. पण त्यानंतर आम्ही रोजच हे सुरु केलं.पाहुणे जाईपर्यंत

  खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.