वय कितीही असो अगदी कोणत्याही वयात प्रत्येक स्त्रीला लांबसडक आणि काळेभोर कस हवे असतात. महिलांसाठी त्यांचे केस किती महत्वाचे असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणूनच अगदी कोणत्याही वयात तुम्हाला सुंदर केस मिळवून देण्यासाठी ‘गव्हांकुर ’ एकदम बेस्ट आहे. तुम्ही गव्हांकुर बद्दल ऐकले असेल पण त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला माहीत नसेल तर आज गव्हांकुराबद्दल सगळी माहिती घेऊया.
आता सगळ्यात महत्वाचा आणि बेसिक प्रश्न म्हणजे गव्हांकुर म्हणजे काय? गव्हांकुर म्हणजे गव्हाला आलेले अंकुर. अनेक जण त्याला 'हिरवे रक्त' असे देखील म्हणतात. साध्या गवताच्या पात्याप्रमाणे वाटणारे हे गवत अत्यंत गुणकारी असते. गव्हापासून आलेले अंकुर म्हणून त्याला गव्हांकुर असे म्हणतात. आयुर्वेदात गव्हांकुराचे अनेक फायदे सांगितले आहेत. अनेक रोगांवर गव्हांकुर उत्तम असून परदेशातही अनेक औषधांमध्ये त्याचा समावेश केला जातो. गव्हांकुरामध्ये व्हिटॅमिन,क्षार आणि प्रोटीन यांची भरपूर मात्रा असते.
जर तुमचे केस गळत असतील किंवा तुम्हाला केसांच्या अन्य समस्या असतील तर तुम्ही गव्हांकुराचा वापर करायला हवा. आता गव्हांकुर कसे घ्यायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते देखील पाहुया.
गव्हांकुर रस
सर्वसाधारणपणे गव्हांकुराचा रस हा प्यायला जातो. गव्हांकुराच्या पात्या घेऊन त्या मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस काढून घ्यावा. तयार रस साधारण अर्धा कपभर या रसाचे नित्यनेमाने सेवन करावे. तुम्हाला तुमच्या केसांच्या वाढीत फरक झालेला जाणवेल. केसांच्या समस्या अगदी आठवडाभरात कमी होतील. शिवाय पांढऱ्या केसांची समस्याही कमी होईल.
गव्हांकुर आणि आवळा रस
आता तुम्हाला एकाचवेळी दोन फायदे मिळवायचे असतील. म्हणजे केसांची वाढ आणि चमकदार केस हवे असतील तर तुम्ही गव्हांकुराच्या रसात आवळा रसही घालू शकता. यामुळे तुम्हाला आवळा आणि गव्हाचा फायदा मिळेल.
गव्हांकुराचा पाला
तुम्हाला जर गव्हांकुराचा रस प्यायचा नसेल तर तुम्ही गव्हांकुराचे कोवळे गवत छान चावूनही खाऊ शकता. सॅलेड खाताना त्यामध्ये गव्हांकुराचे गवत कापून घातले तरी चालू शकते.
हल्ली बाजारात गव्हाकुंराची तयार पावडर मिळते. तुम्ही त्याचा उपयोग करुन देखील गव्हांकुराचे सेवन करु शकता. तुम्हाला पाण्यात थेट पावडर मिसळून त्या रसाचे सेवन करायचे असते.
आता गव्हांकुराचे फायदे पाहून तुम्ही गव्हांकुर घरीच करण्याचा निर्णय घेतला असेल तर फारच उत्तम. ते अगदी सोपेही आहे म्हणा. गव्हांकुर करण्यासाठी तुम्हाला मातीचीही गरज नाही. मूठभर गहू तुम्हाला स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत. पाणी निथळून तुम्हाला एका भांडयात गहू ठेवायचे आहे. वर पातळ कपडा ठेवून तुम्हाला त्याला कोंब फुटू द्यायचे आहेत. एकदा कोंब फुटले की, तुम्हाला एखाद्या जाळीदार भांड्यात ते घेऊन त्या खाली एखादे भांडे राहील असे पाहायचे आहे. त्यात पाणी भरायचे आहे. म्हणजे गव्हांकुराच्या मुळांना पाणी लागून त्यांची छान जोमाने वाढ होईल.साधारण बोटाइतके वाढले की, मग त्यांची तुम्हाला छाटणी करायची आहे. साधारण गव्हांकुर रुजण्यासाठी आणि पाती वाढण्यासाठी आठवडा तरी लागतोच. गव्हाकुंराचा फायदा सतत मिळत राहावा असे वाटत असेल तर तुम्ही साधारण दोन दिवसांनंतर गव्हांकुर करायला घ्यायचे आहे.
अशाप्रकारे घरच्या घरी गव्हांकुर उगवून मिळवा सुंदर आणि मजबूत केस
पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय (Home Remedies For Black Hair In Marathi)
*खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.