ADVERTISEMENT
home / Fitness
स्वयंपाकघरातील अशा वस्तू ज्यामुळे असतो कॅन्सर होण्याचा धोका

स्वयंपाकघरातील अशा वस्तू ज्यामुळे असतो कॅन्सर होण्याचा धोका

आपला दिवस सुरू होतो तो स्वयंपाकघरातून आणि संपतोही स्वयंपाकघरातच. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या स्वयंपाकघरात अशा काही वस्तू असतात ज्यामुळे कॅन्सरचा धोका संभवतो. हे वाचून नक्कीच तुम्हाला धक्का बसला ना? पण हे खरं आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला जे सोयीस्कर आहे त्याचा आपण वापर करत असतो. पण या गोष्टी आपल्या शरीरासाठी किती पोषक आहेत अथवा नाही याचा आपण विचारही करत नाही.  खरंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचा तोटाच माहीत नसतो. पण आपल्या स्वयंपाकघरात अशा काही वस्तू आहेत ज्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार उद्भवण्याचाही धोका असतो. आपण नक्की या वस्तू कोणत्या आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे – 

अॅल्युमिनिअम फॉईल

Shutterstock

प्रत्येक स्वयंपाकघरात तुम्हाला अॅल्युमिनिअम फॉईल तर नक्कीच सापडेल. ऑफिसला जाताना बऱ्याच जणांना अॅल्युमिनिअमच्या फॉईलमध्ये पोळ्या गुंडाळून घेऊन जायची सवय असते. पण ही सवय तुम्हाला त्रासदायक ठरू शकते.  कारण तुम्ही सकाळी पॅक केलेल्या या पोळ्या अथवा भाकऱ्या दुपारी साधारण 5 तासाने खाणार असता. यातून तुमच्या पोळ्यांना साधारण 2-5 मिलिग्रॅम अॅल्युमिनिअम लागतं. जे शरीरासाठी घातक ठरतं. दिवसाला इतकं अॅल्युमिनिअम तुमच्या पोटात जातं. असं जर महिनाभर तुम्ही खात असाल तर तुम्हीच विचार करा की, अॅल्युमिनिअममुळे तुम्हाला किती धोका असू शकतो. अति अॅल्युमिनिअम पोटात गेल्याने तुम्हाला पोटाच्या कॅन्सरचा धोका उद्भवतो. त्यामुळे आता ही फॉईल वापरण्यापूर्वी  विचार करा आणि मगच त्याचा वापर करा. 

ADVERTISEMENT

रिफाईन्ड ऑईल

Shutterstock

आपल्या भाज्या अथवा भारतीय पदार्थ हे तेलाशिवाय पूर्णच होत नाहीत. आपल्याला प्रत्येक गोष्टीत तेल लागतं आणि तेदेखील रिफाईन्ड ऑईल. पण तेल रिफाईन्ड करण्यासाठी जी प्रक्रिया करण्यात येते त्यासाठी अॅसिडचा वापर करण्यात येतो याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? त्यातून येणारा हा उग्र वास घालवण्यासाठी हेक्सनॉल नावाच्या एका केमिकलचा वापर करण्यात येतो. जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ या तेलामध्ये तळता तेव्हा त्यातील ट्रान्स पॅट ऑक्सिडाईज्ड बाहेर सोडतं. याचा शरीराला त्रास होतो. त्यामुळेच तुम्हाला हृदयरोग आणि कॅन्सर असे मोठे आजार होण्याचा धोका उद्भवतो. त्यातही जर तुम्ही पुन्हा पुन्हा तळलेलं रिफाईन्ड ऑईल वापरलं तर हा धोका तुम्हाला अधिक जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खातानाही थोडा विचार करा. सध्या अनेक लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं आणि त्याचं हेच महत्त्वाचं कारण आहे. 

वर्किंग वुमन्ससाठी खास किचन टीप्स

ADVERTISEMENT

नॉनस्टिक भांडी

Shutterstock

स्वयंपाकघरात नॉनस्टिक भांडी तर असतातच. पण त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो असा विचारही कोणाच्या मनात येणार नाही. नॉनस्टिक भांड्यांमध्ये  आपण केलेलं जेवण हे उच्च तापमानावर करतो आणि त्यामुळे त्या भांड्यातून येणारे किरण हे त्यातील कोटिंगला प्रभावित करतात. त्यामुळे तुमचं लिव्हर आणि पचनक्रिया बिघडते.  तसंच यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. हे किरण तुमच्या शरीरासाठी घातक ठरतात. पण याची आपल्याला जराही कल्पना नसते. त्यामुळे आपण बिनधास्त नॉनस्टिक भांड्याचा वापर स्वयंपाकासाठी करत असतो. पण आता याचा विचारपूर्वक वापर करा. 

VastuTips: तुमच्या किचनमधील हे वास्तूदोष आजच दूर करा

ADVERTISEMENT

प्लास्टिकची बाटली

Shutterstock

प्लास्टिक हा तर आता जागतिक विषय झाला आहे. प्लास्टिकच्या नियमित वापरामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती आणि हार्मोन्स या दोन्हीवर परिणाम होतो. यामुळे तुमच्यातील लठ्ठपणा वाढून वजनवाढीची शक्यता वाढते. शिवाय प्लास्टिकच्या डब्यामध्ये जेवण गरम केल्याने जे टॉक्झिन्स बाहेर पडतात त्यामुळे शरीरातील इन्शुलिनचे प्रमाणही वाढतं आणि त्यातून तुम्हाला कॅन्सरचा धोका उद्भवतो. त्यामुळे तुम्ही जर सतत प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे.

अस्वच्छ किचन सिंक स्वच्छ करायचे आहे.. मग सोप्या टीप्स येतील कामी

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

22 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT