जेवणानंतर कधीच करु नका या 5 चुका, अन्यथा होईल त्रास

जेवणानंतर कधीच करु नका या 5 चुका, अन्यथा होईल त्रास

दुपारी छान पोट भरुन जेवल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात. पण या अनेक गोष्टी ज्या तुम्ही करु इच्छिता त्या तुमच्या आरोग्यााठी चांगल्या नाहीत. त्यामुळे दुपारी जेवल्यानंतर जर तुम्ही काही सर्वसाधारण चुका करत असाल तर मग तुम्ही या चुका करणं आताच थांबवा. जेवणानंतर तुम्ही नेमक्या कोणत्या 5 चुका करायला नको ते पाहुया.

 

जेवणानंतर डुलकी काढणे

shutterstock

दुपारी तुम्ही अगदी कुठेही असा जेवल्यानंतर प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर झोपेची एक चादर येतेच. अशावेळी एक तरी डुलकी काढता यावी असे प्रत्येकाला वाटते. ऑफिसमध्ये नसल्यावर दुपारची झोप तर अजिबातच टाळता येत नाही. पण जर तुम्ही जेवणानंतर झोप काढत असाल तर असे अजिबात करुन नका. जेवणानंतर लगेचच डुलकी काढल्यामुळे अन्न पचत नाही. जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर मग तुम्ही अजिबात झोपायला नको  कारण तुम्हाला हमखास अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते. शिवाय तुमच्या घशाशी सतत आंबट आंबट चव लागत राहते. 

केसांसाठी करताय मेंदीचा उपयोग, तर जाणून घ्या कशी करावी मिक्स

फळ खाणं

shutterstock

उत्तम आरोग्यासाठी फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्ही कधीही फळ खात असाल तर त्याला काहीही अर्थ नाही. कारण जर तुम्ही जेवणानंतर फळ खात असाल तर मग ती फळं अजिबात पचत नाही.  तुम्हाला फळ खायची असतील तर ती तुम्ही जेवणाआधी किमान तास-दोन तास आधी खायला हवीत. तरच त्या फळांचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही फळं खा. पण दोन्ही वेळांच्या जेवणानंतर तुम्ही ती फळं अजिबात खायला नको. 

चहा कॉफीचे सेवन

shutterstock

अनेकांना जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण जेवणानंतर तुम्ही लगेचच याचे सेवन करत असाल तर तुम्ही ते करणे आजच थांबवा. चहा- कॉफीच्या सेवनामुळे तुमच्या अन्नातील प्रोटीन शरीरात घट्ट होतात आणि ते पचण्यास अडथळा निर्माण करतात. असे झाल्यास काहींना अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेवणाआधी एक तास आणि जेवणानंतर किमान एक तास चहा कॉफीचे सेवन करु नका. 

सलाड आणि फळं खाल्ल्यानंतर पाणी पिणं टाळणं आवश्यक

चालणे किंवा शतपावली करणे

shutterstock

काहींंना जेवल्यानंतर चालण्याची सवय असते. पण तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. याचे कारण असे की, जेवणानंतर लगेचच तुम्ही चाललात की, तुमचे अन्न पचण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेवल्यानंतर थोडा वेळ बसून मगच तुम्ही चाला. चालतानाही तुमचा वेग जास्त नको. तुम्ही अगदी हळुहळु फेरफटका मारा. 

जेवणानंतर आंघोळ करणे

shutterstock

जेवणानंतर लगेचच आंघोळ करण्याची काहींना सवय असते. विशेषत: रात्रीच्यावेळी जेवणानंतर खूप जण आंघोळ करतात. तुम्ही जर असे करत असाल तर आताच तुम्ही हे थांवबा कारण जर तुम्ही रात्री जेवणानंतर आंघोळ करत असाल तर त्यामुळे तुमचे अन्न पचू शकत नाही. याचे कारण असे की, आंघोळीमुळे तुमच्या पोटाजवळील रक्तपुरवठा खंडीत होतो. ते इतर भांगांकडे गेल्यामुळे तुमचे अन्न पचण्यास अडथळा निर्माण होतो.


त्यामुळे जर तुम्ही या 5 चुका करत असाल तर आताच या चुका करणे तुम्ही टाळा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.