‘बनवाबनवी' चित्रपटातील या अभिनेत्याचा मुलगाही दिसतो त्याच्यासारखाच

‘बनवाबनवी' चित्रपटातील या अभिनेत्याचा मुलगाही दिसतो त्याच्यासारखाच

मराठीतील ‘बनवाबनवी’ या चित्रपटाचा विसर पडणे अशक्यच आहे.आजही ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग आजही लोकांच्या लक्षात आहे आणि पर्यायाने या चित्रपटाची स्टारकास्टही. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यासोबत आणखी एक चेहरा दिसला होता तो म्हणजे सिद्धार्थ रे याचा. सावळा पण दिसायला सुंदर असा सिद्धार्थ रे आज आपल्यात नाहीत. पण या अभिनेत्याचा मुलगाही आता तितकाच छान दिसू लागला आहे. लाईमलाईटपासून दूर असलेल्या त्याचा हा मुलगा सध्या काय करतोय ते जाणून घेऊया. सिद्धार्थ आणि शांतीप्रिया या दोघांचीही नावे 'स' वरून असल्याने त्यांनी आपल्या मुलांची नावेदेखील 'स' अक्षरावरून ठेवली आहेत. 

तो सध्या काय करतोय

Instagram

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रे याच्या मुलाचे नाव शिश्या रे आहे. त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट सर्च केल्यावर तो आम्हाला सापडला खरा. पण हा तोच शिश्या रे असेल का असा थोडा प्रश्न होता. सिद्धार्थची झलक असलेल्या शिश्याच्या या अकाऊंटमध्ये सिद्धार्थ रे चा फोटो दिसला आणि मग हे त्याचेच अकाऊंट असल्याचे ठाम झाले. शिश्या इन्स्टाग्रामवर फार अॅक्टीव्ह असतो असे वाटत नाही. त्याचे काही मोजकेच फोटो यामध्ये दिसतात. तो काय करतो याचा अंदाज लावणे सध्या कठीण आहे. पण तो दिग्दर्शनाच्या क्षेत्रात असल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर अभिनेता व्हायला आवडेल असे देखील म्हटले आहे. पण त्याच्या या निवडक फोटोवरुन अंदाज येणे थोडे कठीणच आहे. 

 

दयाबेन’च्या कमबॅकमुळे गोकुळधाममध्ये आनंदोत्सव

Instagram

शांतिप्रियासोबत केलं लग्न

Instagram

सिद्धार्थ रे याने 1999 साली अभिनेत्री शांतिप्रियासोबत लग्न केले.सिद्धार्थ आणि शांतिप्रियाला दोन मुलं असून साश्या आणि सोनिया अशी या मुलांची नावे आहेत. शांतिप्रियाने साऊथच्या चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. शांतिप्रिया ही एकेकाळची गाजलेली अभिनेत्री असून ती साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रियाची बहीण आहे. शांतिप्रियाचे इन्स्टाग्राम अकाऊंट असून तिचे सौंदर्य आजही तिने टिकवून ठेवले आहे.

Bigg Boss 13: फॅक्टरी टास्कनंतर होणार फिनालेमध्ये डायरेक्ट एंट्री

सिद्धार्थ रे बद्दल तुम्हाला काय माहीत आहे?

सिद्धार्थ रे अनेकांच्या लक्षात आहे. कदाचित त्याचे नाव आज अनेकांच्या पटकन लक्षात येणार नाही. सिद्धार्थ चित्रपट निर्माते व्हि. शांताराम यांचा नातू आहे. व्हि. शांताराम यांची पहिली पत्नी विमला शांताराम यांची मुलगी चारुशिला शांताराम हिचा मुलगा आहे. सिद्धार्थ ने बालकलाकार म्हणून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली. ‘चानी’ या चित्रपटात तो पहिल्यांदा दिसला होता. 1980 साली आलेल्या ‘थोडीसी बेफवाई’ या चित्रपटातून त्याने डेब्यू केला. त्यानंतर वंश (1992), मणि रत्नम यांचा अग्नी नतचरित्रम, परवाने( 1992), बाजीगर ( 1993), पहचान (1993) या काही चित्रपटांमधून दिसला. ‘बनवाबनवी’ या चित्रपटाने त्याला नवी ओळख दिली. त्याची ही भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. पण 2004 साली त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले. त्यावेळी त्याची मुलं 4 वर्षांची सुद्धा नव्हती.

आता यानंतर तुम्हालाही  सिद्धार्थ रे ची नक्कीच आठवण झाली असेल.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.