किचन एक्सपर्ट बनण्याआधी लक्षात घ्या या 10 गोष्टी

किचन एक्सपर्ट बनण्याआधी लक्षात घ्या या 10 गोष्टी

घरापासून लांब राहणारे यंगस्टर्स किंवा नवविवाहीत जोडपी आपल्या घरच्या जेवणाला खूप मिस करतात. जर तुमच्याही सेकंड होम किंवा पीजीमध्ये किचनची व्यवस्था असेल तर या 10 टिप्सच्या मदतीने तुम्हीही बनू शकता  किचन एक्सपर्ट.

प्लॅनिंगने करा प्रत्येक काम

जेवण करतानाही प्लॅन करणं आवश्यक असतं. कोणतीही डिश बनवण्याआधी हे ठरवून घ्या की तुमच्या किचनमध्ये सर्व सामान उपलब्ध आहे की नाही. सर्व मसाले, हर्ब्स आणि भाज्या योग्य प्रमाणात बाऊलमध्ये काढून घ्या. मग त्या डिशच्या रेसिपीप्रमाणे सर्व वस्तू किचनमधील ओट्यावर सेट करा. सगळं सामान जर समोर असेल तर तुम्हाला ती डिश बनवणं सोपं जाईल.

कटिंग बोर्डची योग्य साईज

किचनमध्ये मोठ्या आकाराचा कटिंग बोर्ड असणं आवश्यक आहे. त्यामुळे एक चांगला 2/3 फीटचा चॉपिंग बोर्ड विकत घ्या. तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेजसाठी वेगवेगळा चॉपिंग बोर्डही घेऊ शकता. जसं एक लाल आणि एक हिरव्या रंगाचा. 

मीठाचं महत्त्व आहे मोठं

साधारण टेबल सॉल्टशिवाय इतरही प्रकारची आणि चवीची मीठं बाजारात मिळतात. जर तुम्हाला डिशला वेगळी चव द्यायची असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारच्या मीठाबाबत माहिती घेऊन ते वापरू शकता.

फ्रेश हर्ब्सचा करा वापर

कोणतीही डिश बनवताना ती चवदार बनवण्यासाठी ताज्या हर्ब्सचा वापर करणं आवश्यक आहे. हर्ब्सच्या बाबतीतली एक गोष्ट म्हणजे यांचा वापर फार थोडा असतो पण विकत घेताना मात्र मोठ्या प्रमाणात विकत घ्यावे लागतात. रोजमेरी, बे लीव्ह्स आणि थाईमसारख्या हर्ब्सना फ्रीजमध्ये बऱ्याच काळ ठेवता येऊ शकतं. हे हर्ब्स नेहमी ड्राय पेपर टॉवेलने कव्हर करावे.

भाज्या चिरताना

जर तुम्ही पहिल्यांदा किंवा कुकिंगमध्ये नवीन असाल तेव्हा युट्युब ट्युटोरियल पाहून भाज्या चिरण्याची योग्य पद्धत शिकू शकता. खासकरून कांदा, टोमॅटो आणि अवकॅडो हे चिरण्याचे व्हिडिओज नक्की पाहा. प्रोफेशनल पद्धतीने या भाज्या चिरल्यामुळे खूप वेळ वाचवता येईल.

भाज्या दिसतील ताज्या

शिजवल्यानंतरही भाज्या हिरव्यागार दिसण्यासाठी त्या मीठ घातलेल्या पाण्यात ब्लांच करून घ्या. त्या थोड्या शिजल्यावर बाहेर काढून मग थंड पाण्यात प्लंज करा. नंतर त्यातील पाणी निथळून घ्या. यामुळे त्या फ्रेश राहतील.

सीड्स टोस्ट करणं आवश्यक

बडीशोप, जिरं आणि कोथिंबीर यासारख्या मसाल्यांची चव वाढवण्यासाठी हे मसाले आधी थोडे भाजून घ्यावे. त्यामुळे त्यांच्या चवीत नक्कीच फरक पडतो.

तेलाचे अनेक प्रकार

साधारण तेलांसोबतच एक्स्ट्रा व्हर्जिन ऑईल, व्हीट जर्म, फ्लॅक्स सीड आणि अक्रोड यासारखी हेल्दी आणि टेस्टी तेलंही तुम्ही वापरू शकता. या तेलांमध्ये व्हिटॅमीन ई आणि ओमेगा 3 फॅटी एसिड्सचे योग्य प्रमाण असते. याचा वापर तुम्ही सॅलेडमध्येही करू शकता.

सीजनल वस्तूंची माहिती

जेवण टेस्टी बनवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्यात सीजनल वस्तूंचा वापर करणे. जसं मटर किंवा गाजर ही काही महिनेच चांगली मिळतात. त्यामुळे जेव्हा या भाज्यांचा सीजन असेल तेव्हा त्यांचा भरपूर वापर करावा.

स्टोरेज मेथडबाबत

किचन सांभाळताना हे समजून घ्या की, प्रत्येक भाजी आणि मसाला स्टोर करण्याची पद्धत वेगळी असते. काही फ्रिजमध्ये ठेवावे तर काही बाहेर ठेवावे लागतात. या गोष्टी समजण्यासाठी सर्व रिसर्च करणे आवश्यक आहे. एक तास जरी तुम्ही इंटरनेटवर रिसर्च केलंत तर तुम्हाला हमखास योग्य ती माहिती मिळेल. ज्यामुळे तुमचं सामान व्यवस्थित राहील. 

 

कुकिंगबाबत कोणतीही समस्या असल्यास तुम्ही युट्यूब ट्युटोरियल्सशी मदत घेऊ शकता. यावर तुम्हाला कोणत्याही डिशची सोपी रेसिपी मिळू शकते.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.