ADVERTISEMENT
home / आरोग्य
दररोज धण्या-जिऱ्याचं पाणी प्या आणि निरोगी राहा

दररोज धण्या-जिऱ्याचं पाणी प्या आणि निरोगी राहा

धणे म्हणजेच कोथिंबिरीच्या रोपाला आलेले फळ. धणे सुकवून ते गरम मसाला तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातात. याशिवाय धणे हे खोकल्यावरील औषध म्हणूनदेखील वापरले जाते. जीर्ण खोकला कमी करण्यासाठी जेष्ठमध आणि धण्याचा काढा दिला जातो. मूत्राशयाशी निगडीत समस्यांवर धण्याचं पाणी पिणं हितकारक ठरतं. धणे लहान मुलांना जंताच्या समस्येवर उपयोगी आहेत. धण्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात. धण्यासोबतच जिरेदेखील शरीरासाठी अतिशय उत्तम असतं. जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. धणे आणि जिरे एकत्र केल्यास त्याचा शरीरावर चांगला फायदा होतो. यासाठीच धणे आणि जिरे पाण्यात भिजवून त्याचं पाणी घेतलं जातं. यासाठी जाणून घ्या धणे-जिऱ्याचं पाणी पिण्याचे शरीरावर काय परिणाम होतात. 

धण्या-जिऱ्याचं पाणी कसं तयार कराल –

एका भांड्यांमध्ये दोन ग्लास पाणी घ्या त्यात एक चमचा धणे, एक चमचा जिरे आणि पाच ते सहा काळ्या मनूका टाका. सकाळी त्या पाण्यातून काळ्या मनूका बाहेर काढा त्या चमच्याने  स्मॅश करा आणि त्याचा गर गाळून घ्या. जिरे आणि धण्याचं पाणीदेखील गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यात काळ्या मनूक्यांचा गर आणि पत्री खडीसाखरेचे एक अथवा दोन खडे टाका. साखर विरघळ्यावर सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्या.

( जर तुमच्याजवळ अख्खे धणे अथवा जिरे नसेल तर सकाळी एक ग्लास पाण्यात तुम्ही धणे जिरे पावडरदेखील मिसळून ते पेय तयार करू शकता.)

ADVERTISEMENT

Shutterstock

धण्या-जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढते

धण्यामध्ये अॅंटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. धण्यामुळे  वातावरणातील होणाऱ्या बदलांपासून तुमचं रक्षण होतं. शिवाय जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्व आणि अँटी ऑक्सीडंट आजारपणाला सामोरं जाण्याची ताकत  वाढवतात. जिरंदेखील तुमची प्रतिकारशक्ती वाढवतं. ज्यामुळे तुम्हाला सर्दी,खोकला, पडसं असे आजार कमी होतात. 

 

ADVERTISEMENT

Shutterstock

मासिक पाळीचा त्रास कमी होतो

मासिक पाळीत अनेक महिलांना पोटात अथवा कंबरेत क्रॅंम्प येतात. दिवसभर थकल्यासारखं वाटतं. अशावेळी धणे-जिऱ्याच्या पाण्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.धण्यामधील दाहशामक गुणधर्म आणि जिऱ्यामधील फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम या मिनरल्समुळे तुम्हाला मासिक पाळीत होणारा त्रास कमी करण्यास मदत होते. 

पचनसंंस्था सुधारते

आजकाल अवेळी जेवण करणे, बराचकाळ उपाशी राहणं, रात्री उशीरा जेवणे या जीवनशैलीमुळे अनेकांना पचनाच्या समस्या जाणवतात. मात्र धणे आणि जिऱ्याचं पाणी पिण्यामुळे तुमच्या पचनसंस्थेला चालना मिळते. ज्यामुळे तुमच्या पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. धणे आणि जिऱ्याच्या सेवनाने जेवण लवकर आणि चांगलं पचत. यासाठीच नियमित धणे-जिऱ्याचं पाणी पिणं शरीरासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतं. 

त्वचेसाठी उत्तम

धणे जिऱ्याचं पाणी  नियमित पिण्यामुळे तुमची त्वचा डिटॉक्स होते. धण्यामधील अॅंटि ऑक्सिडंट तुमच्या त्वचेचं इनफेक्शनपासून  संरक्षण करतात. जिऱ्यामधील व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही धणे जिऱ्याचं पाणी रोज घेतलं तर तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज येतं आमि चेहऱ्यावरील अॅक्नेची समस्या दूर होते. जिऱ्यामध्ये अँटी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेचं कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शन (Skin Infections) पासूनही रक्षणच होतं. 

ADVERTISEMENT

Shutterstock

तोंडाची दुर्गंधी कमी होते

कांदा,लसणीचे पदार्थ अती प्रमाणात खाण्यामुळे अथवा तोंडाच्या आरोग्य समस्येमुळे तोंडातून सतत घाणेरडा वास येण्याची समस्या असते. मात्र धणे आणि जिरे हे उत्तम मुखवास म्हणूनदेखील वापरले जाते. यासाठीच जर तुम्ही नियमित धणे-जिऱ्याचं पाणी प्यायला तर तुम्हाला या समस्येपासून नक्कीच मुक्ती मिळू शकते. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा –

आरोग्यासाठी फायदेशीर ठरते बहुगुणी आळशी

ADVERTISEMENT

जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

हळदीच्या अतीसेवनामुळे वाढू शकतो Miscarriage चा धोका

22 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT