उरलेल्या चहाच्या चोथ्याचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकीत

 उरलेल्या चहाच्या चोथ्याचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकीत

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही मस्त वाफाळलेल्या चहाने होत असते. चहाचा एक घोट पोटात गेला की, मगच खऱ्या अर्थाने सकाळ झाली असे अनेकांना वाटते. दिवसातून कितीतरी वेळा चहा बनवला जातो आणि उकळला जातो. बेसिनमध्ये कितीतरी वेळा चहाचे भांडे धुतले जाते. जेवढा वेळ चहा बनवला जातो. तेवढा वेळ उरलेली चहाची पावडर ही फेकून दिली जाते. पण या पुढे चहाची पावडर कधीही फेकून देऊ नका कारण या उरलेल्या चहा पावडरचे खूप फायदे आहे.

डोळ्याची पापणी नक्की का फडफडते, जाणून घ्या कारणं

केसांची चमक वाढवते

shutterstock

चमकदार केसांसाठी चहा पावडर वापरलेली तुम्ही नक्कीच पाहिली नसेल. पण चहाची पावडर तुमचे केस छान चमकवू शकते. तुम्ही चहा केल्यानंतर त्यात दूध घालू नका. ज्यावेळी तुमचा चहा संपेल त्यावेळी त्यात पाणी घालून पुन्हा एकदा चहा उकळून घ्या. तयार चहाचे पाणी थंड करुन तुम्ही आंघोळीला गेल्यानंतर केसांच्या मुळाला चहाचे पाणी लावायचे आहे. हे पाणी लावल्यानंतर थोडासा मसाज करुन तुम्ही तुमच्या शॅम्पूने केस धुवू शकता. तुम्हाला तुमचे केस चमकदार दिसतील. पाणी उकळून झाल्यानंतर उरलेला चहापावडरचा चोथा फेकू नका कारण त्याचाही उपयोग आहे.

डोळ्याखालील काळी वर्तुळ कमी करते

shutterstock

चहा पावडरच्या उरलेला चोथा घेऊन तुम्ही तुमच्या डोळ्यांखाली ठेवा. किमान दहा मिनिटांसाठी तरी तुम्ही हा प्रयोग करुन पाहा. एकतर तुम्हाला थंडावा तर वाटेल.पण कालकांतराने तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळंसुद्धा कमी होतील. आठवड्यातून किमान 3 दिवस तरी हा प्रयोग आवर्जून करुन पाहा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. या शिवाय तुमच्या त्वचेची जळजळ होत असेल तर ती देखील चहा पावडरमुळे कमी होईल.

घाणेरडा वास शोषून घेते

shutterstock

फ्रिजमध्ये कधीकधी आपण इतक्या वस्तू भरुन ठेवतो की, आपल्यालाच त्याचा उग्र वास येऊ लागतो. फ्रिज उघडल्यानंतर भपकारा यावा असे साहजिकच कोणाला वाटणार नाही. तुमच्या फ्रिजमध्ये भाज्या, अंडी, मांस, मासे असे सगळे काही भरलेले असेल तर मग तुम्ही चहाच्या पावडरचा उपयोग करा. उरलेली चहापावडर टिश्यू पेपरमध्ये किंवा मलमलच्या कपड्यात बांधून ती फ्रिजमध्ये ठेवा. तुम्ही टी बॅग वापरत असाल तर मग तुम्ही त्या टी बॅगच थेट फ्रिजमध्ये ठेवून द्या. फ्रिजमधील  वेगवेगळे वास चहा पावडर शोषून घेईल.

तुम्हाला असेल कोंडा तर हे त्रास तुम्हाला होणारच...

फर्निचर करते स्वच्छ

shutterstock

प्रत्येकाकडे लाकडाने फर्निचर असतेच. लाकडाचे फर्निचर दिसायला जितके छान दिसते तितकीच त्याची काळजी घ्यावी लागते. उरलेल्या चहा पावडरचा उपयोग तुम्ही फर्निचर स्वच्छ करण्यासाठी करु शकता. चहा पावडरमधील अतिरिक्त पावडर काढून ती लाकडाच्या फर्निचरवर चोळा. लाकडावर साचलेली घाण, धूळ निघून जाईल आणि तुमचे फर्निचर चमकेल.

खत म्हणूनही करु शकतो वापर

shutterstock

आता तुम्हाला काहीही करायचे नसेल तर तुम्ही उरलेल्या चहा पावडरचा उपयोग खत म्हणून करु शकता. तुम्हाला यासाठी विशेष अशी मेहनत घ्यावी लागत नाही. चहाच्या पावडरचे खत तयार करण्यासाठी तुम्हाला चहाची पावडर वाळवून घ्यायची आहे आणि ती तुमच्या झाडांमध्ये तुम्ही तशीच वापरु शकता. हल्ली अनेक ठिकाणी मातीच्या जड कुंड्या ठेवण्यास परवानगी देत नाही. अशावेळी तुम्ही काही झाडं ही अशा चहापावडरमध्ये लावू शकता. साधारण कुंडीभर चहापावडर जमा करण्यााठी तुम्हाला किमान 15 मिनिटं तरी लागतीलच. 


आता चहाची पावडर कधीच फेकून देऊ नका. उलट तुम्ही याचा वापर करा आणि त्याचे फायदे मिळवा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.