हैदराबादमध्ये जाणार असाल तर इथे खा चविष्ट चिकन बिर्याणी

हैदराबादमध्ये जाणार असाल तर इथे खा चविष्ट चिकन बिर्याणी

मस्त फळफळीत शिजलेला बासमती भात, वेगवेगळ्या मसाल्यात शिजवलेलं चिकन… हम्म्म विचार करुनच तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहात नाही. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी बनवल्या जातात. पण त्यात हैदराबादच्या हैदराबादी बिर्याणीचा उल्लेख आवर्जून केला जातो. देशभरात कुठेही फिरा पण एकदा तरी हैदराबादमध्ये बनणारी नवाब स्टाईल बिर्याणी चाखा असे म्हटले जाते. म्हणूनच ही बिर्याणी चाखण्यासाठी मी हैदराबादला गेले होते. त्यावेळी चाखलेल्या चिकन बिर्याणीनंतर चविष्ट बिर्याणी काय असते याचा अंदाज आला. पण तुम्ही नेमकी कुठे बिर्याणी खायला हवी हे देखील तुम्हाला माहीत हवे.

शादाब बिर्याणी

Instagram

चार मिनार परिसरातील शादाब बिर्याणी ही हॉटेल बिर्याणी प्रेमींसाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. येथे तुम्हाला लोकांची कायमच गर्दी दिसेल आणि इथे लोक तुम्हाला कायमच बिर्याणी खाताना दिसतील. चिकन, मटण बिर्याणी असे दोन्ही प्रकार तुम्हाला इथे मिळतात. 

जमेची बाजू 

 • बिर्याणीची चव उत्तम आहे. तुम्हाला फार तिखट आवडत नसेल तर तुम्हाला ही बिर्याणी नक्की आवडेल. 
 • तेल योग्य प्रमाणात घातल्यामुळे ही बिर्याणी तेलकट लागत नाही. 
 • चिकन पिसेस योग्य शिजवल्यामुळे ते खाल्ल्यानंतर छान विरघळतात. योग्य प्रमाणात शिजवल्यामुळे चिकन पिसेस चिवट लागत नाही. 
 • बिर्याणीमध्ये भातासोबत मसालाही चांगला असावा लागतो. शादाबचा मसाला आणि भात यांचे प्रमाण योग्य आहे. भाताच्या प्रत्येक कणासोबत तुम्हाला चविष्ट मसाला लागतो. जो बिर्याणीची चव अधिक खुलवतो. 
 • खिशाला परवडणारी 

म्हणून येईल कंटाळा

 •  या ठिकाणी तुम्हाला कायमच गर्दी दिसेल. त्यामुळे भूकेच्या वेळी गेल्यानंतर तुम्हाला इथे खूप वेळ वाट पाहावी लागते.
 •  या ठिकाणी असलेला अॅम्बियन्स तुम्हाला कदाचित तितकासा आवडणार नाही. 


 पत्ता : चार मिनार जवळच्या परिसरात

सणाच्या दिवसात खास लुक देतील ब्लाऊजचे हे हॉट डिझाईन्स

बावर्ची हॉटेल

Instagram

बिर्याणीसाठी हैदराबादमधील बावर्ची हॉटेलसुद्धा प्रसिद्ध आहे. गेल्या  25 वर्षांपासून हे हॉटेल असून येथील बिर्याणीला 2017 साली best biryani म्हणून सन्मानित करण्यात आले त्या दिवसापासून या बिर्याणीची प्रसिद्धी आणखी वाढली आहे.बिर्याणीची चव छान मसालेदार आहे. तुम्ही मसालेदार खाणारे असाल तर तुम्हाला ही बिर्याणी नक्की आवडेल. महत्वाची गोष्ट अशी की, बावर्चीची शाखा अजून कुठेही नाही त्यामुळे तुम्ही नीट पाहून जा. कारण या नावाची अनेक हॉटेल या ठिकाणी आहेत .

जमेची बाजू 

 • मस्त चटकदार चव याची खासियत आहे.
 • सगळ्या गोष्टी अगदी योग्य प्रमाणात यात  घातलेल्या आहेत. 
 • या बिर्याणीची चव तुम्ही एकदा तरी चाखून पाहायला हवी. 
 • कुटुंबासोबत जाण्याचे योग्य हे योग्य ठिकाण आहे. 
 • खिशाला परवडणारे असून  तुम्हाला येथील चव नक्की आवडेल. 

म्हणून येईल कंटाळा 

लोकांची गर्दी 

पत्ता:  संध्या थिएटरच्यासमोर चिकडपल्ली 

पॅराडाईज बिर्याणी

Instagram

हैदराबाद म्हटले की, पहिल्यांदा पॅरेडाईज येथील बिर्याणीचे नाव घेतले जाते. पण या ठिकाणी गेल्यानंतर अपेक्षा भंग होतो. कारण येथील बिर्याणी कोरडी आहे.फारच कमी मसाला आणि मोठे मोठे चिकन पीस यामुळे ही बिर्याणी हवी तशी खाता येत नाही. चिकन चांगले शिजलेले असूनही ते नीट खाता येत नाही. त्यामुळेच ही बिर्याणी जास्त जात नाही. शिवाय किमतीच्या तुलनेत ही बिर्याणी इतकी चांगली नाही. या बिर्याणीचा अॅम्बियन्स चांगला असून तुम्हाला या ठिकाणी चांगला वेळ घालवता येईल. येथील बिर्याणीपेक्षा स्टाटर्स चांगले आहेत. 


मग आता हैदराबादला गेला असाल तर तुम्ही या ठिकाणांना भेट द्याच शिवाय इतर काही लोकल ठिकाणांनाही नक्की भेट द्या तुम्हाला येथील बिर्याणी कदाचित जास्त आवडू शकेल.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.