ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
बॉयफ्रेंडला काय द्यावे कधीच कळत नाही.. मग या गिफ्ट आयडियाज तुमच्यासाठी

बॉयफ्रेंडला काय द्यावे कधीच कळत नाही.. मग या गिफ्ट आयडियाज तुमच्यासाठी

मुलींना देण्यासाठी बाजारात इतक्या वस्तू असतात की त्यांना काय द्यावे असा प्रस्न पडतो. तर त्या उलट मुलांच्या बाबतीत आहे. कारण मुलांना देण्यासाठी इतक्या मोजक्या वस्तू असतात की, त्यांना काय द्यावे हे अनेकांना कळत नाही. विशेषत: बॉयफ्रेंडच्या बाबतीत कारण इतर पुरुषांच्या बाबतीत काही गोष्टी ठिक असतात पण प्रत्येक गर्लफ्रेंडला आपल्या बॉयफ्रेंडसाठी काहीतरी नक्कीच स्पेशल करायचे असते. त्यांना इंप्रेस करण्यासाठी त्यांना छान गिफ्ट देऊन इंप्रेसही करायचे असते. पण काहींना बॉयफ्रेंडला काय द्यावे हे कधीच कळत नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही खास गिफ्ट आयडियाज काढल्या आहेत. तुमच्या बॉयफ्रेंडला तुम्ही त्याच्या खास दिवशी काही गिफ्ट हमखास देऊ शकता.

बॉयफ्रेंडला वाढदिवसाला देण्यासाठी 10 गिफ्ट आयडियाज (Birthday Gift Ideas For Boyfriend)

Instagram

वाढदिवसाला मुलांना तुमच्याकडून नक्कीच काही खास हवे असते. घरातील व्यक्तींनंतर त्याला चांगल्या ओळखणाऱ्या फक्त तुम्ही असता. त्यामुळे तुम्ही त्याच्या वाढदिवशी हे 10 गिफ्ट देऊ शकता. हे असे गिफ्टस आहेत जे त्यांना नक्कीच त्यांच्या प्रत्येक दिवशी वापरता येतील.

ADVERTISEMENT

बॉयफ्रेंडसाठी ख्रिसमस गिफ्ट देखील वाचा

1. पॉवर बँक (Power Bank)

हल्ली ही गोष्ट सगळ्यांसाठीच अगदी मस्ट झाली आहे. कामात कितीही व्यग्र असलं तरी बॉयफ्रेंडशी बोलल्याशिवाय आपला दिवसच जात नाही. मग काय व्हिडिओ कॉल एकदा तरी होतोच. त्यासाठी तुमच्या स्मार्ट फोनची बॅटरीही वापरली जाते. त्यामुळेच त्याच्यासोबत सतत कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही त्याला मस्त पॉवर बँक गिफ्ट म्हणून देऊ शकतात. बाजारात अनेक प्रकारच्या पॉवर बँक मिळतात. म्हणजे तुम्हाला अगदी 1000 mAH पासून या पॉवर बँक मिळतात. पण तुम्हाला काहीतरी चांगले द्यायचे आहे हे लक्षात घेऊन तुम्ही 20000 पॉवरची क्षमता असलेली पॉवर बँक घ्यायला काहीच हरकत नाही.

फक्त खाण्यासाठीच नाहीतर अक्रोड आहे सौंदर्यदायी

2. जीम प्रोटीन्स (Protein Shake)

फिट राहणं हल्ली अनेकांना आवडतं. जर तुमचा बॉयफ्रेंड जर फिटनेसच्या बाबतीत फारच जागरुक असेल तर मग त्याला जीमशी निगडीत काही देण्याचा तुम्ही विचार करत असाल तर मग तुम्हाला त्याला जीन सप्लिमेंटस देता येतील. आता या सप्लिमेंटस म्हणजे काही रिस्की वस्तू नाही बरं का! जीममध्ये तुमच्या शरीरातील एनर्जी टिकवून तुम्हाला सुदृढ करण्याचे काम या सप्लिमेंटमधून होत असते. जर तुमचा बॉयफ्रेंड जीमला रोज जात असेल आणि अशाप्रकारच्या सप्लिमेंट घेत असेल तर त्याला वाढदिवसाला देण्यासाठी ही बेस्ट गोष्ट आहे.

ADVERTISEMENT

3. स्मार्ट वॉच (Smart Watch)

हल्ली नुसतं घड्याळ घालण्यापेक्षा अनेकांना स्मार्ट वॉच घालायला फार आवडते. दिवसभरात तुम्ही काय काय अॅक्टिव्हिटी करता ते यामध्ये दिसत असते.या शिवायही स्मार्ट वॉच वेगवेगळ्या सुविधांनी युक्त असते. तुमचा बजेट चांगला असेल तर तुम्ही चांगल्या आणि मोठ्या कंपनीचे बेस्ट स्मार्ट वॉच तुमच्या बॉयफ्रेंडला देऊ शकता तो नक्कीच तुमच्या या गिफ्टमुळे खूश होईल.

4. वायरलेस हेडफोन (Wireless Headphone)

हेडफोन नसेल अशी व्यक्ती कदाचित आपल्याला अजिबात सापडणार नाही. मुलांना हेडफोन्स, वायरलेस एअरपॉड असं कॅरी करायला फारच आवडत असतं. फोननंतर जर कोणती गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची असेल तर ते आहेत हेडफोन्स. तुमच्या बॉयफ्रेंडलाही हेडफोन्स आवडतात मग तुम्ही त्यांना नक्की हे द्यायला हवे. कारण ही गोष्ट कायम त्यांच्या जवळ राहणारी आहे. त्यामुळे तुमची आठवण त्याल प्रत्येकवेळी होणे साहजिकच आहे.

5. स्पोर्टस शूज (Sports Shoes)

मुलांना कितीही शूज द्या ते कमीच असतात. फॉर्मल शूजपेक्षा मुलांना नेहमीच स्पोर्टस शूज आवडतात. जर तुमच्या बॉयफ्रेंडला तुम्हाला स्पोर्टस शूज द्यायचे असतील तर तुम्हाला चांगल्या ब्रँडचे स्टायलिश शूज अगदी हमखास गिफ्ट देता येतील. कितीही नाही म्हटले तरी मुलांना स्पोर्टस शूज आवडतात. तुम्ही चांगले शूज घेणार असाल तर ते तुम्हाला थोडे महाग मिळतील.

6. लेदर बेल्ट ( Leather Belt)

बॉयफ्रेंडला देण्यासाठीचा एक आणखी चांगला पर्याय म्हणजे लेदर बेल्ट. कारण प्रत्येक मुलाला लेदर बेल्ट हा अगदी हमखास लागतो. त्यामुळेच तुम्ही एखादा छान लेदर बेल्ट अगदी आरामात त्याला त्याच्या वाढदिवसासाठी घेऊ शकता. तुम्हाला ऑनलाईन चांगले लेदर बेल्ट अगदी आरामात मिळू शकतील.तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला असा एखादा बेल्ट गिफ्ट म्हणून देऊ शकता.

ADVERTISEMENT

7. ग्रुमिंग किट (Grooming Kit)

तुमच्या बॉयफ्रेंडला वाढवलेली दाढी चांगली दिसत असेल तर मग त्याला अगदी हमखास तुम्ही एखादे ग्रुमिंग किट द्यायला हवे. ग्रुमिंग किट ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक मुलाला अगद हमखास हवी असते. ग्रुमिंग किट देण्यामागे कारण इतकेच आहे ते फारच ऑरगनायझर असते त्यामुळे मुलांना प्रवासात कॅरी करायला फार सोपे जाते. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास एखादे ग्रुमिंग किट नक्कीच भेट म्हणून द्या.

8. दाढीशी निगडीत प्रोडक्ट (Beard Products)

ग्रुमिंग किटसोबतच मुलांना त्यांच्या दाढीला चांगले ठेवण्यासाठी हल्ली काही प्रोडक्टही मिळतात. हे प्रोडक्ट देखील मुलांना त्यांच्या किटमध्ये हवे असे वाटतात. त्यामुळे तुम्ही चांगले दाढीशी निगडीत प्रोडक्ट त्यांना घेऊन द्या.

9. शेड्स (Sunglasses)

मुलांना कितीही गॉगल द्या ते कमीच असतात. त्यामुळे तुम्ही त्यांना आणखी एखादा शेड्स किंवा गॉगल तुमच्या बॉयफ्रेंडला भेट म्हणून दिला तर चालू शकेल. शेड्सच्या स्टाईल या नेहमी बदलत असतात त्यामुळे तुम्हाला एखादा शेड्स देण्यास काहीच हरकत नाही.  

10. गेम सीडीज (Game CD)

तुमचा बॉयफ्रेंड गेम्सचा चाहता असेल तर तुम्हाला गेम सीडी घेऊन देण्यास काहीच हरकत नाही. तुम्ही त्यांना मस्त गेम सीडीज देऊ शकता. तुम्हाला बाजारात अनेक ठिकाणी अशा सीडीज मिळू शकतात. याशिवाय तुम्हाला ऑनलाईनही गेम सीडीज मिळू शकतात. 

ADVERTISEMENT

तुमच्या खास दिवशी बॉयफ्रेंडला द्या हे 10 गिफ्ट (Special Gift Ideas For Him)

आता तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी वाढदिवसाचीच वाट पाहण्याची काहीच गरज नाही.तुमच्या आयुष्यातील स्पेशल दिवस तुम्ही त्याला गिफ्ट देऊ शकता. आता हे गिफ्ट फार काही मोठे असण्याची गरज नाही. तुमच्या दोघांच्या नात्यातील खास दिवशीही तुम्ही काही गिफ्ट नक्कीच देऊ शकता. 

1. आरसा (Mirror)

दाढी करण्यासाठी मुलांना आरसा हा लागतोच. त्यांच्यासाठी ही अगदी बेसिक गरज आहे. त्यामुळे तुम्ही जर त्यांना काही वेगळी वस्तू देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच अशाप्रकारचा आरसा त्यांना द्यायला हवा. बाजारात अनेक प्रकारचे आरसे मिळतात. पण मुलाना लागणारा आरसा हा फार वेगळा असतो.

2. कॉकटेल किट (Cocktail Kit)

आता तुमचा बॉयफ्रेंड पार्टीचा चाहता असेल तर तुम्ही त्याला अगदी हमखास कॉकटेल किट आवर्जून द्यायला हवे. तुम्ही एखादी डेट प्लॅन करणार असाल तर अशावेळी तुम्हाला याचा वापर करता येईल. शिवाय ही अशी वस्तू आहे जी खूप वर्षे टिकूसुद्धा शकते. त्यामुळे जर काही हटके देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही याचा विचार करायला काहीच हरकत नाही.

3. जीमचे कपडे (Gym Wear)

मुलांना स्पोर्टसवेअरमध्ये कायमच इंटरेस्ट असतो. तुमचा बॉयफ्रेंड जर फिटनेस फ्रिक असेल तर तुम्ही त्याला तुमच्या आवडीचे जीमचे कपडे देऊ शकता. मुलांना जीम वेअरमध्ये ट्रॅक पँट किंवा छान टिशर्ट तुम्हाला गिफ्ट करता येतील

ADVERTISEMENT

4. पेन (Pen)

पेन देण्यासाठी कधीच काही स्पेशल असावे लागत नाही. पण पेन हे सगळ्यांकडेच असते. जर तुम्हाला छान पेन गिफ्ट करता आले तर उत्तमच. आता चांगले पेन गिफ्ट करण्यासाठी तुम्हाला फार पैसा खर्च करावा लागत नाही तर त्यामध्ये तुमचे प्रेम असणे आवश्यक असते. त्यामुळे तुमच्या आवडीचे पेन तुम्ही त्याला देऊ शकता.

5. फॅन्सी सॉक्स ( Fancy Socks)

हल्ली मुलींपेक्षाही मुलांना सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात. मग ते शूजच्या आत घातले जाणारे सॉक्स का असेना. हल्ली वेगवेगळ्या कंपनीचे इतके चांगले सॉक्स मिळतात की, तुम्ही नक्कीच ते त्यांना घेऊन द्यायला हवेत.

6. टाय (Tie)

मुलांच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी फॉर्मल ड्रेस असतोच. या फॉर्मल ड्रेसवर मुलांना टाय हवाच. म्हणूनच तुम्ही त्याला टाय गिफ्ट देऊ शकता. मुलांना गिफ्ट देण्यासाठी अनेक प्रकारच्या टाय मिळतात. तुम्ही त्या देखील ट्राय करायला हरकत नाही.

7. फूट स्प्रे (Foot Spray)

बाहेर मिटींगसाठी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाताना तुमच्या पायांना वास आलेला वास अजिबात आलेला चालत नाही. अशावेळी तुम्ही मुलांच्या ग्रुमिंग किटमध्ये तुम्ही ही एक गोष्ट सुद्धा त्यांना देऊ शकता. 

ADVERTISEMENT

8. पासपोर्ट कव्हर (Passport Cover)

परदेशी प्रवास करताना पासपोर्ट कॅरी करण्यासाठी तुम्ही मुलांना एक पासपोर्ट कव्हर देऊ शकता. तुम्हाला ऑनलाईन चांगले पासपोर्ट कव्हर अगदी आरामात यामध्ये मिळू शकतील. मुलांना फॉर्मल कव्हरसोबत तुम्ही फंकी कव्हरही घेऊ शकता. 

9. डायरी (Diary)

रोजच्या काही चांगल्या गोष्टी लिहिण्यासाठी एक तरी डायरी प्रत्येकाकाडे असते. तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला त्यांच्या कामानुसार डायरी देऊ शकता. हल्ली इतक्या वेगळ्या डिझाईन्सच्या डायरी मिळतात की, तुम्ही एखादी डायरी नक्कीच घ्यायला हवी. 

10. ऑरगनायझर (Organizer)

तुमच्या बॉयफ्रेंडवर कामाचा ताण अधिक असेल तर तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला ऑरगनायझर घ्यायला हवे.  ऑरगनायझर हे महिन्यानुसार मिळते. त्यामुळे कामाच्या तारखा आणि तुम्हाला भेटण्याच्या तारखा या सगळ्या अगदी व्यवस्थित मॅनेज करता येतात.

 

ADVERTISEMENT

वर्षपूर्तीला द्या तुमच्या जोडीदाराला हे 10 गिफ्ट (Anniversary Gift Ideas For Boyfriend)

अॅनिव्हरसरी ही नात्यातील अशी गोष्ट आहे जी तुम्ही साजरी करायला हवी.ती स्पेशल ही असायला हवी. जसं तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडकडून काही अपेक्षा करता तशी अपेक्षा त्यांनाही असते. त्यामुळे तुम्ही त्यांना अगदी हमखास गिफ्ट देऊ शकता. 

1. कपल टीशर्ट (Couple T-Shirt)

2.परफ्युम (Perfume)

स्पेशल दिवशी तुम्हाला फिल गुड देखील व्हायला हवे. त्यामुळे तुम्ही छान सुंगधी क्षणांसाठी त्याला परफ्युम देऊ शकता. अनेकदा मुलांना परफ्युम दिल्यानंतर काही गैरसमज होतात. म्हणूनच ते देताना खूप विचार करुन द्या. जर त्यामुळे गैरसमज निर्माण होणार असतील तर तुम्ही हा पर्याय अजिबात निवडू नका.

3. पैशांचे पाकीट (Wallet)

पैशांचे छान पाकीट ही तुमच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट देऊ शकता. मुलांसाठी वॉलेट हे फारच महत्वाचे असते त्यामुळे तुम्ही ही वस्तू गिफ्ट म्हणून अगदी आरामात तुमच्या बॉयफ्रेंडला देऊ शकता.

4. ब्रिफकेस किंवा ऑफिस बॅग (Briefcase)

मुलांसाठी ऑफिस बॅगही तितकीच महत्वाची असते त्यामुळे तुम्ही त्यांना चंगल्या ऑफिसच्या बॅगसुद्धा देऊ शकता. लेदर किंवा कपड्याच्या बॅगची निवड तुम्ही घेऊ शकता.

ADVERTISEMENT

5. ट्रॅव्हल बॅग (Travel Bag)

तुमचा बॉयफ्रेंड जर खूप फिरणारा असेल तर मग तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला हमखास ट्रॅव्हल बॅग द्यायला हवी. कारण या ट्रॅव्हल बॅगचा उपयोग तुम्ही दोघे मस्त बाहेर फिरण्यासाठी करु शकता.

6. वाईन (Wine)

जर तुम्ही दोघे वाईन लव्हर असाल तर मग तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला छान वाईन गिफ्ट द्या. आता तुम्हाला तुमच्या रेंजनुसार वाईन मिळू शकतील. त्यादेखील तुम्ही हमखास गिफ्ट देऊ शकता.

7. ब्लुटूथ स्पीकर (Bluetooth Speaker)

ब्लुटुथ स्पीकरही तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट म्हणून देऊ शकता. ब्लुटुथ स्पीकर त्याला अगदी कधीही वापरता येतील. त्यामुळे तुम्ही लहान आणि वेगवेगळ्या कंपनीचे ब्लुटुथ स्पीकर घेऊ शकता.

8. कार अॅसेसरीज (Car Accessories)

मुलांना त्यांच्या वस्तू फार जपण्याची सवय असते. अशावेळी तुम्ही कार अॅक्सेसरीजदेखील गिफ्ट देता येऊ शकतात. कार अॅसेसरीजमध्ये  तुम्हाला बऱ्याच गोष्टी अगदी हमखास घेता येईल. 

ADVERTISEMENT

8. कार अॅसेसरीज (Car Accessories)

डीजिटल कॅमेरा ही कदाचित खूप मोठी किंमत वाटू शकेल. पण तुमच्या आयुष्यातील अनेक आठवणी कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला हा कॅमेरा नक्कीच उपयोगी पडेल.आता तुम्हाला तुमच्या रेंजनुसार चांगला कॅमेरा निवडता येईल.

10. जॅकेट्स (Jackets)

मुलांना त्यांच्या वॉर्डरोबमध्ये जॅकेट असावे असे हमखास वाटते. त्यामुळे तुम्ही त्यांना एखादे छान जॅकेटही तुम्ही घेऊ शकता.  मुलांनाही जॅकेटमध्ये हल्ली अनेक प्रकार मिळतात.

तुम्ही बनवून देऊ शकता हे 5 गिफ्ट (Handmade Gifts Ideas For Boyfriend)

प्रत्येक गोष्टी विकत घेऊन देण्याची गरज नसते तर तुम्ही काही गोष्टी तुमच्या हाताने देखील बनवून देऊ शकता. त्यामुळे तुम्ही या गोष्टीही ट्राय करा

1. आवडता पदार्थ (Cook Favorite Food)

ADVERTISEMENT

Instagram

असं म्हणतात की, एखाद्याच्या प्रेमाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. म्हणजेच चांगल्या पदार्थातून तुम्ही त्याच्या मनाच्या जवळ पोहोचू शकता. तुम्ही स्वत:च्या हाताने बनवलेला एखादा पदार्थ तुमच्या हाताने बनवून त्याला देऊ शकता. महागड्या गिफ्टपेक्षा तुम्ही असे मस्त काहीतरी करु शकता. छान डबा बनवून त्याला देऊ शकता. एखादे स्वीट तुम्ही त्याला देऊ शकता.

2. तुमच्या आठवणींचा कोलाज (Image Collage)

Instagram

ADVERTISEMENT

रिलेशनशीपमध्ये असल्यावर खूप फोटो काढणे आलेच. तुमच्या या जर्नीचा तुम्ही कोलाज करायला हवा. तुम्ही फोटोची कॉपी काढून छान त्याचा कोलाज करु शकता. त्यामुळे तुमच्या अनेक चांगल्या गोष्टी अनेक आनंदाचे प्रसंग तुम्ही या कोलजमध्ये एकत्र करुन ठेवा.

3. शुभेच्छापत्र (Greetings)

Instagram

तुम्ही हाताने बनवलेले शुभेच्छापत्र देखील त्यांना बनवून देऊ शकता. कारण या गोष्टी सुद्धा अनेकांना आवडतात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला येते तसे शुभेच्छापत्र बनवा.

ADVERTISEMENT

4. प्रेम पत्र (Love Letter)

तुमच्या मनातील भावना या ओठांवरही यायला हव्यात. जर तुम्हाला बोलणे शक्य नसेल तर मग तुम्ही प्रेमपत्र देखील लिहू शकता. प्रेमपत्र लिहिणे सगळ्यात बेस्ट आहे. कारण काही जणांना बोलता येत नाही. अशावेळी प्रेम पत्र हा एक चांगला पर्याय आहे.

5. आठवणींचा व्हिडिओ (Photo Video)

जर तुम्ही डिजिटल विश्वातील असाल तर तुम्हाला आठवणींचा एक व्हिडिओही गिफ्ट करता येईल. यामध्ये चुका होण्याची शक्यताही कमी असते. शिवाय तुम्हाला एकदम सरप्राईज देण्यासाठीही या व्हि़डिओचा उपयोग होतो. तुम्हाला हा व्हिडिओ मस्त व्हॉटसअॅपही करता येईल.

या वस्तू तर तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला द्यायलाच हव्यात (Personalized Gift Ideas For Him)

काही गिफ्ट खास आणि असे असतात की, ते तुमच्या जोडीदाराच्या अगदी जवळ असतात. हे खास गिफ्ट देखील तुम्ही नक्की द्या

1. Personalized Caricature

जर तुम्हाला काही हटके द्यायचे असेल तर तुम्ही अशाप्रकारचे काही युनिक गिफ्टसुद्धा नक्की देऊ शकता.हे गिफ्ट फनी तर आहेचच. पण तुमच्या या गिफ्टमुळे त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटेल. त्यामुळे तुम्ही असे काहीतरी नक्की द्या

ADVERTISEMENT

2. माहिती सांगणारी फोटोफ्रेम (Customized Photo Frame)

तुमच्या त्याच्या बद्दल काय भावना आहेत ते त्याला कळण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची फ्रेमसुद्धा त्याला मस्त गिफ्ट करु शकता. कारण तुम्हाला  यात नुसते फोटो नाहीत तर भावना व्यक्त करण्याची संधी मिळते.

3. तुमचे फोटो असलेलं घड्याळ (Customized Clock)

आयुष्यात चांगली व्यक्ती असेल तर चांगली वेळ येणारच हेच आठवण तुम्हाला हे घड्याळ नेहमी करुन देईल. म्हणूनच तुम्ही तुमच्या खोलीत अशाप्रकारचे घड्याळ  गिफ्ट देऊ शकता. आहे नाही हे हटके गिफ्ट

कोणत्याही नात्याची सुरुवात ही छान गोड असावी म्हणून तुम्ही अशाप्रकारचा केक देखील तयार करुन घेऊ शकता. तुम्हाला त्याच्या छान फोटोचा कोलाज करुन हा केक तयार करता येईल.

5. कॉंमिक पोस्टर (Comic Poster)

तुमची आवडती व्यक्तीला तुम्हाला हसवायचे असेल तर मग तुम्ही अगदी हमखास अशाप्रकारचे गिफ्ट तुमच्या बॉयफ्रेंडला द्यायला हवे.

ADVERTISEMENT

असे करा गिफ्ट पॅक (Gift Wrapping Ideas)

Instagram

गिफ्ट पॅकींग ही सुद्धा एक कला आहे. त्यामुळे तुम्हाला गिफ्ट पॅक करताना काही क्रिएटिव्ह गोष्टी करता येतील. तुम्ही मस्त क्विलींग किंवा कागदाचा वापर करुन तुमचे गिफ्ट सजवा. गिफ्ट सजवताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे गिफ्ट पॅकींग फार क्लिष्ट करुन ठेवू नका. त्यासाठीच  काही टीप्स 

  • गिफ्ट पॅक करताना छान ब्राईट कलर वापरा.
  • छान आकाराचे बॉक्स निवडा 
  • कागदाचा क्विलींगचा वापर करा 
  • क्रिएटीव्ह होऊन काही तरी करा. 
  • गिफ्ट पॅक करता येत नसेल तर तुम्ही काही ऑनलाईन व्हिडिओ पाहू शकता.

तुम्हालाही पडतात का हे प्रश्न (FAQs)

बॉयफ्रेंडला कसे इंप्रेस करु ?

तुम्ही अगदी साध्या साध्या गोष्टीतून तुमच्या बॉयफ्रेंडला सरप्राईज देऊ शकता. तुम्हाला आम्ही काही गिफ्ट आयडियाज सांगितल्या आहेत. तुम्हाला त्यापैकी काही करायचे नसेल तर तुम्ही मस्त त्याला बाहेर घेऊन जाऊन सरप्राईज करु शकता.

ADVERTISEMENT

बॉयफ्रेंडसाठी बेस्ट गिफ्ट कोणते ?

तुमच्या वेळेशिवाय त्याच्यासाठी कोणतीच मोठी गिफ्ट असून शकत नाही. पण जर तुम्हाला काही खास द्यायचे असेल तर तुम्ही त्याची ओळख जाणून घ्या आणि ती देण्याचा तुम्ही प्रयत्न करा.

गुलाबी ओठ हवे असतील तर करा वेलचीचा वापर

10 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT