गिफ्ट काय द्यायचे हा नेहमीच आपल्याला पडलेला प्रश्न असतो. वाढदिवस आणि वर्षपूर्तीचं कसंतरी चालून जातं. पण एखाद्याच्या घरी गृहप्रवेशाला जायचं म्हणजे काहीतरी चांगलंच घेऊन जावं असं अनेकांना वाटतं. पण चांगलं काही घेताना जर तुम्ही अशी गोष्ट घेत असाल जी त्या व्यक्तीला काहीच उपयोगाची नाही तर तुम्ही त्या गोष्टी देणे टाळा. प्रत्येकाला घरामध्ये विशिष्ट सजावट करायची असते. त्यामुळे तुम्ही काही गोष्टी देताना भान ठेवायला हवे.
आता तुम्हाला हा पर्याय थोडा वेगळा वाटेल पण हा पर्याय चांगला आहे. याचे कारण असे की, कोणतेही घर असले तरी बेडशीट कितीही दिल्या तरी कमी असतात. गिफ्ट करताना तुम्ही चांगल्या कॉटन बेडशीटची निवड करा. बेडशीट हा गिफ्ट देण्याचा उत्तम पर्याय असून तो फार महागडासुद्धा नाही. तुम्ही ज्याच्याकडे गृहप्रवेशाला जाणार आहात त्यांची साधारण निवड तुम्हाला माहीत असायला हवी. जर ती माहीत नसेल तर तुम्ही छान फ्रेश रंगाच्या बेडशीट त्यासाठी निवडा.
हिरवागार पुदीना फक्त चटणीसाठी नाहीतर सौंदर्यासाठीही आहे उत्तम
आता तुम्हाला फारच जवळच्या व्यक्तीला असे काही द्यायचे तर तुम्ही छान ड्रायफ्रुट भेट म्हणून देऊ शकता. हल्ली अनेक ठिकाणी ड्रायफ्रुट वर्षभर उपलब्ध असतात. तुम्हाला तुमच्या बजेटनुसार त्याचे बॉक्स करुन मिळू शकतात. ड्रायफ्रुटचा उपयोग घरी अनेक गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. शिवाय अनेक गोड पदार्थांमध्ये अगदी आवर्जून हे ड्रायफ्रुट वापरले जातात. त्यामुळे तुमचे हे गिफ्ट नक्कीच त्यांना नक्कीच आवडेल.
प्रत्येक नव्या घरात शुभ वस्तू दिल्या जातात. प्रत्येक हिंदू घरात तुळशीचे रोपटे हे आवर्जून लावले जाते. एखाद्याने अगदी काहीही देऊ नका असे म्हटले असेल पण तुम्हाला काहीतरी घेऊन जायचे असेल तर तुम्ही एखादे तुळशीचे छान रोपटे द्यायला काहीच हरकत नाही. घरात तुळशीचे रोप असेल तरी देखील एखादे तुळशीचे आणखी रोप लावायला काहीच हरकत नाही. या शिवाय तुम्ही इतरही काही झाडंसुद्धा देऊ शकता.
जर तुम्हाला काय घेऊ असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही गिफ्ट बॉऊचरसुद्धा देऊ शकता. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला गिफ्ट वाऊचर देता येतील.असे गिफ्ट वाऊचर द्या जे त्यांना घराचे सामान घेण्यासाठीही उपयोगी पडू शकते. त्यामुळे हा पर्याय निवडण्यास काहीही हरकत नाही. एखादी फ्रेम किंवा शोभेच्या वस्तू देणे टाळा कारण अशा वस्तू प्रत्येकाच्या इंटेरिअरला शोभणाऱ्या असतातच अशा नाही. कारण या वस्तू तशाच पडून राहतात किंवा त्या दुसऱ्याला सरकवल्या जातात. त्यामुळे तुम्ही या गिफ्ट आयडियाजचा नक्की विचार करा.
या राशीच्या व्यक्ती असतात धडाकेबाज, कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.