ADVERTISEMENT
home / Travel in India
भारतातील या नयनरम्य धबधब्यांना तुम्ही दिली आहेत का भेट (Waterfalls In India In Marathi)

भारतातील या नयनरम्य धबधब्यांना तुम्ही दिली आहेत का भेट (Waterfalls In India In Marathi)

मॉल किंवा शहरातील छानशौकीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा असे अनेकांना वाटते. म्हणूनच पावसाळ्यात अनेक जण धबधब्यांना भेट देण्यासाठी जातात. तुम्हालाही पाणी आवडत असेल तर देशातील काही धबधबे तुम्ही नक्की पाहायला हवे. आता तुम्ही म्हणाल आता कुठला धबधबा…. पण तुम्ही आतापासूनच काही प्लॅनिंग केले तर तुम्हाला पावसाळाही पावसाळ्यात या धबधब्यांना भेट देता येईल.

धबधब्यांना भेट देण्यासाठी भारतातील हा कालावधी आहे उत्तम (Best Time To Visit Waterfalls In India)

Instagram

धबधब्यांचा फोटो पाहिला की, अनेकदा आपल्याला धबधब्यांना भेट द्यावी असे वाटते. पण सगळेच धबधबे 12 महिने 365 दिवस वाहतात असे नाही.काही धबधबे हे केवळ पावसाळ्यातच भेट देण्यासारखे असतात.  तर काही धबधब्यांना तुम्ही कधीही भेट देऊ शकतात. भारतात एकूण 29 राज्य आणि 3 केंद्रशाषित प्रदेश आहेत. या राज्यांमधील काही बेस्ट धबधब्यांना भेट देण्याचा विचार करताना तुम्हाला तेथील हवामानाची योग्य माहिती हवी. शिवाय त्या प्रदेशात जाण्याचा योग्य कालावधी तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला फार अडचणी येणार नाहीत. त्यामुळे धबधब्याचा उत्तम कालावधी हा हवामानावर अबलंबून असतो.

ADVERTISEMENT

भारतातील या धबधब्यांना नक्की द्या भेट (List Of Waterfalls In India In Marathi)

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रसिद्ध असे धबधबे आहेत. जाणून घेऊया या धबधब्यांविषयी.. जेणेकरुन तुम्हाला तुमचे प्लॅनिंग अगदी नीट करता येईल.

1. अथिरापिल्ली धबधबा (Athirappilly Waterfall)

Instagram

जगातील सगळ्यात मोठा धबधबा म्हणून ‘नायगरा’ या धबधब्याची ओळख आहे. आता इतक्या दूर जाऊन नायगरा वॉटरफॉल पाहायला जमत नसेल तर मग भारतात नायगरा वॉटरफॉल नावाने ओळखला जाणारा धबधबा आहे. अथिरापल्ली धबधबा असे या धबधब्याचे नाव असून हा धबधबा केरळमध्ये आहे. चलाकुडी नदीवरील हा धबधबा आकाराने लहान असला तरी त्याची रुंदी ही नायगरा फॉलप्रमाणे आहे. त्याचे सौंदर्य पाहाण्यासारखे आहे. पण या धबधब्याला तुम्ही केवळ पावसातच भेट देऊ शकता. कारण याच दिवसात येथील नद्या पूर्ण भरलेल्या असतात. 

ADVERTISEMENT

कसे जाल?:  कोची विमानतळावरुन तुम्हाला केरळला जाता येईल.तेथून तुम्हाला पुढे वाहनं मिळू शकतील.

वाचा – केरळला जाणार असाल तर जाणून घ्या केरळ पर्यटन स्थळे

2. दुधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall)

गोव्यातील दुधसागर धबधबा ह प्रसिद्ध धबधबा आहे. गोवा अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. तसाच हा धबधबाही प्रसिद्ध आहे. गोव्यातील मांडवी नदीवर हा धबधबा आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्यच वेगळे असते. हा धबधबा इतका सुंदर आह की, हा धबधबा पाहण्यासाठी परदेशातून अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. दुधसागर धबधबा हा भारतातील एक सगळ्यात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. या धबधब्याची उंची 310 मीटर इतकी असून  रुंदी 3 मीटर इतकी आहे. हा धबधबा बारमाही आहे. पण पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच असते. 

कसे जाल?:  गोव्याला जाण्यासाठी खूप पर्याय आहेत. तुम्ही ट्रेनने किंवा फ्लाईटने गेलात तर तुम्हाला कुठनही वाहने मिळतील. पणजीपासून हे ठिकाण केवळ 60 किलोमीटर अंतरावर आहे. 

ADVERTISEMENT

वाचा – महाराष्ट्रातील 25 समुद्रकिनारे

3. खांदाधर धबधबा (Khandadhar Waterfall – 12th Highest Waterfall In India)

ओरिसामधील खांदाधर धबधबा हा देखील फारच प्रसिद्ध आहे. ओरिसामधील नंदापाणी या परिसरात हा धबधबा आहे. देशातील उंच धबधब्यांपैकी हा धबधबा 12 व्या क्रमांकावर आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे स्वरुप अगदी रौद्र झालेले असते. त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणाला भेट देऊ नका.कारण त्यावेळी या ठिकाणी घसरण्याची शक्यता अधिक असते.  हा धबधबा 244 मीटर उंचीचा आहे. यापासूनच काही अंतरावर तुम्हाला रोअरकेला नावाचा आणखी धबधबा पाहता येईल. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी खूप पाऊस पडतो त्यामुळे तेव्हा तिथे जाणे टाळा. 

कसे जाल?:  ओडीसावरुन तुम्हाला रोअरकेला करत  या ठिकाणी जाता येऊ शकेल. 

4. नोहकलीकाई धबधबा (Nohkalikai Waterfall – Tallest Plunge Waterfall In India)

आंध्रप्रदेशातील  नोहकलीकाई धबधबा हा चेरापुंजी येथे आहे.  1 हजार 115 फूट लांबीचा हा धबधबा असून चेरापुंजीसाठी हा धबधबा शान आहे. चेरापुंजी हे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी सगळयात जास्त पाऊस पडतो. त्यामुळे साहजिकच या राज्यात जास्तीत जास्त धबधबे तुम्हाला दिसतील. पण नोहकलीकाई धबाधबा हा तेथील सुंदर धबाधबा आहे. या ठिकाणी अवचितच उन पडते. पण उन्हात हा धबधबा फारच सुंदर दिसतो असे म्हणतात.चेरापुंजीला येणारा पर्यटक या धबधब्याला भेट दिल्याशिवाय जात नाही. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षण आहे.

ADVERTISEMENT

कसे जाल?: चेरापुंजीला जाण्यासाठी थेट मार्ग नाही त्यामुळे तुम्हाला मजल दरमजल करत आधी चेरापुंजीला पोहोचावे लागेल. तेथून तुम्हाला खासगी गाड्या मिळतील.

5. चित्रकूट धबधबा (Chitrakoot Waterfall)

Instagram

चित्रकूट धबधबा हा देखील भारतातील प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे. हा नैसर्गिक धबधबा असून छत्तीसगड राज्यातील जगदलपूर या ठिकाणी हा धबधबा आहे. जगदलपूर ठिकाणापासून 38 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. हा धबधबा 29 मीटर रुंद आहे. या धबधब्याला चित्रकोट, चित्रकोत अशा नावाने देखील ओळखले जाते. या धबधब्याला तुम्ही कधीही भेट देऊ शकता. नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला हा धबधबा इतका सुंदर आहे की, तो पाहता क्षणीच तुम्हाला तेथे आल्याचा आनंद मिळेल. 

ADVERTISEMENT

कसे जाल?:छत्तीसगड म्हटल्यावर अनेकांना नक्षलवादींची आठवण होते. पण तुम्हाला या ठिकाणी जाण्यास काहीच हरकत नाही. 

6. शिवानासमुद्रा धबधबा (Shivanasamudra Waterfall)

Instagram

कर्नाटकामधील चमाराजनगर या ठिकाणी एक छोटे गाव आहे ज्याचे नाव आहे शिवानासमुद्रा या गावाच्या नावावरुनच येथे असलेल्या धबधब्याला नाव पडले आहे. कावेरी नदीवर हा धबधबा असून हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण आहे.  300 फूट इतक्या उंचीचा हा धबधबा आहे. देशातील उंच धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे. हा धबधबा तुम्हाला वर्षभर या ठिकाणी जाता येणार नाही. या ठिकाणी ज्याचा योग्य कालावधी हा जुलै ते ऑक्टोबर असा आहे. तुम्ही या काळात येथे जाण्याचे प्लॅनिंग करा.

ADVERTISEMENT

 कसे जाल?: कर्नाटकला जाण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय आहेत तुम्ही त्यापैकी कोणताही मार्ग निवडू शकता.

7. धुवांधार धबधबा (Dhuandhar Waterfall)

Instagram

मध्यप्रदेशातील धुवांधार धबधबा हा देखील प्रसिद्ध आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील बेडाघाटात हा धबधबा असून नर्मदा नदीवर हा धबधबा आहे. हा धबधब्याचे पाणी धुराप्रमाणे उडाल्यासारखे वाटते. म्हणूनच त्याला धुवांधार धबधबा असे म्हणतात. हा धबधबा 100 फूट इतका उंचावर आहे. हा धबधबा पाहण्यासाठी तुम्हाला रोप वे चा वापरही करता येईल. रोप वेमुळे तुम्हाला संपूर्ण धबधबा नीट पाहू शकता. या धबधबा पसरलेला असून तो फारच सुंदर आहे. पण या ठिकाणी तुम्ही धो धो पावसात जाऊ नका. कारण या ठिकाणी खूप पाऊस असल्यास  धबधबा पाहता येणार नाही. 

ADVERTISEMENT

कसे जाल? : मध्यप्रदेशमधील बेडाघाट हा प्रसिद्ध भाग आहे. मध्यप्रदेशला जाण्यासाठी तुम्ही विमान किंवा ट्रेनने जाऊ शकता. 

8. एलिफंट धबधबा (Elephant Falls)

एलिफंट म्हणजेच धबधबा. हत्तीच्या मुखाच्या आकाराचा असलेला हा एलिफंट धबधबा शिलाँगमध्ये आहे. ब्रिटिशांनीच या धबधब्याला नाव दिले. ते त्याच्या दिसण्यावरुनच हा धबधबा त्याच्या वेगळेपणामुळेच प्रसिद्ध आहे. नॉर्थ- ईस्टमधील हा एक प्रसिद्ध धबधबा आहे. हा धबधबा वर्षभर पाहायला मिळतो. पण तरीदेखील पावसाळा संपल्यानंतर तुम्ही हिवाळ्यात गेलात तर तुम्हाला याचे सौंदर्य नीट पाहता येईल. त्यामुळे ऑगस्टनंतरचा काळ अधिक चांगला आहे. कारण त्यावेळी पाण्याचा फ्लो चांगला असतो.

कसे जाल ?: मेघालयमध्ये जातानाही तुम्हाला मजल दरमजल करतच जावे लागते. मेघालयमधील शिलाँगला जाण्यासाठी सगळ्यात जवळचे रेल्वेस्टेशन आणि विमानतळ गुवाहाटी आहे.

9. कुणे धबधबा (Kune Waterfall – 14th Highest Waterfall In India)

ADVERTISEMENT

Instagram

महाराष्ट्रातील लोणावळा हा परिसर पर्याटकांसाठी प्रसिद्ध आहे. बाराही महिने येथे पर्यटकांची गर्दी असते. मुंबई, पुण्यापासून जवळ असल्यामुळे या ठिकाणी लोकं अगदी हमखास जातात. शिवाय हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण असल्यामुळेही लोकं या ठिकाणाला पसंती देतात. या ठिकाणी असलेला कुणे धबधबा तितकाच प्रसिद्ध आहे. कुणे धबधबा हा देशातील 14 वा मोठा धबधबा आहे. धबधब्याची उंची 200मीटर उंचीचा आहे.या धबधब्याला तुम्ही पावसाळ्यात भेट द्यायला हवी.

कसे जाल?: पुण्यावरुन लोणावळ्याला जाण्यासाठी बरेच पर्याय आहेत. 

10. भिमलत धबधबा (Bhimlat Waterfall)

ADVERTISEMENT

Instagram

राजस्थानमध्ये हा धबधबा असून राजस्थान म्हटल्यावर अनेकांना केवळ वाळवंट आठवते. पण राजस्थानच्या वाळवंटात एक प्रसिद्ध धबधबा आहे ज्याचे नाव आहे भिमलत…बुंदी नावाच्या शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. या धबधब्याची उंची 60 मीटर असून हा धबधबा जिथे खाली येतो. त्या ठिकाणी एक कुंडदेखील तयार झाले आहे. भिमलत धबधबा पाहण्याचा विचार करत असाल तर  तुम्ही या ठिकाणी पावसाळ्यात जायला हवं. 

कसे जाल?: राजस्थानला जाण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तुम्हाला या धबधब्यासोबत इतर ठिकाणांनाही भेट देता येईल.

11. मंकी धबधबा (Monkey Falls)

ADVERTISEMENT

Instagram

कोईमतूर जिल्ह्यात मंकी धबधबा असून हा धबधबा नैसर्गिक पद्धतीने तयार झाला आहे. अनामलाई डोंगररांगांमधून हा धबधबा वाहतो. या ठिकाणी खूप माकड असल्यामुळेच या धबधब्याला मंकी असे नाव ठेवण्यात आले आहे. फॉरेस्ट विभागाच्या अख्त्यारित हा धबधबा येत असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला नियमांचे पालन करावेच लागते. शिवाय माकडांचा त्रास असल्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते विशेषत: तुमच्या सामानाची

कसे जाल?: कोईंमतूरला  जाण्यासाठी ट्रेन आणि विमानसेवा देखील आहे. कोईमतूरला आल्यानंतर तुम्हाला मंकी धबधब्याला जाण्यासाठी सहज वाहने मिळतील. या ठिकाणी जाण्याआधी तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून परवानगी घ्यावी लागते. 

12. अंब्रेला फॉल्स (Umbrella Falls)

ADVERTISEMENT

Instagram

महाराष्ट्रातील आणखी एक धबधबा म्हणून अंब्रेला धबधबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील भंडारदरा परीसरात हा धबधबा असून अनेक पर्यटकांचे ते आकर्षण आहे. विल्सन डॅमवरील हा धबधबा असून तुम्ही वर्षभरातून कधीही या ठिकाणाला भेट देऊ शकता. मुंबईपासून जवळ असल्यामुळे तुम्हाला एखाद्या वीकेंडला हा प्लॅन करता येईल. तुम्ही पावसात गेल्यानंतर याचे सौंदर्य तुम्हाला वेगळे दिसेल. त्यामुळे तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्यायला हवी. 

कसे जाल?: भंडारदराला जाण्यासाठी तुम्हाला बस मिळतील. बसस्टॉपपासून अगदी 500 मीटरच्या अंतरावर हा धबधबा आहे.

भारतात ट्रेकला जाण्यासाठी सर्वोत्तम आहेत ही ‘22’ ठिकाणं

ADVERTISEMENT

13. मिनुमुट्टी धबधबा (Meenmutty Falls)

केरळमधील हा आणखी एक प्रसिद्ध धबधबा आहे. मिनुमुट्टी नावाने हा धबधबा प्रसिद्ध असून हा देशातील उंच धबधब्यांपैकी एक आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम परीसरापासून 45 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. नेय्याकर रिझरवायर परिसरापासून हा भाग जवळ असून तुम्हाला थेट या धबधब्याकडे जाता येत नाही तर तुम्हाला 2 किलोमीटरचे ट्रेक करुन या ठिकाणी पोहोचावे लागते. पण इथे चालत जाणे तुम्हाला नक्कीच फायद्याचे वाटेल. 

कसे जाल?: तिरुअनंतपुरमला जाण्यासाठी तुम्हाला ट्रेन किंवा फ्लाईट घेता येईल. तुम्हाला या दोन्ही ठिकाणावरुन टॅक्सी करता येईल.

14. वानतवांग धबधबा (Vantawng Waterfall)

Instagram

ADVERTISEMENT

मिझोराम राज्यातील हा धबधबा देशातील दुसऱ्या क्रमांकावरील धबधबा आहे. मिझोराम राज्यातील तेंजावल परिसरात हा धबधबा आहे. येथील वनवा नदीवर हा धबधबा असून यावरुनच त्याचे नाव वानतवांग असे ठेवण्यात आले आहे. या धबधब्याचे पाणी 750 फुटांवरुन खाली कोसळते. त्यामुळे या पाण्याची गती ही अधिक असते. या पाण्यात पोहणे सोपे नाही. त्यामुळे तुम्ही या पाण्यात पोहण्याचा शहाणपणा न केलेला बरा 

कसे जाल?:  ट्रेन किंवा विमान असा दोन्ही प्रवास तुम्ही करु शकता. ट्रेनचा विचार करता बैराबी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे तर विमानाचा विचार करता लेंगपुई हे जवळचे विमानतळ आहे. पुढे तुम्हाला जाण्यासाठी खासगी गाड्या मिळतील.

15. भागसू धबधबा (Bhagsu Waterfall)

Instagram

ADVERTISEMENT

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला या परीसरात हा धबधबा असून भागसू धबधबा नावाने हा प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येतात.  हा धबधबा 12 महिने वाहणारा आहे. त्यामुळे तुम्हाला याला कधीही भेट देता येईल. पण पावसानंतरचा काळ हा अधिक चांगला मानला जातो. कारण हिमाचल प्रदेशात पावसाचे नक्की काही सांगता येत नाही. त्यामुळे पावसानंतर तुम्ही या ठिकाणाला भेट द्या. या धबधब्याशेजारी अनेक खाऊची दुकाने आहेत. तुम्हाला या ठिकाणी मस्त खाता येईल आणि धबधबा पाहता येईल. या धबधब्यापासून एक किलोमीटर अंतरावर भागसू मंदिरही आहे.

कसे जाल?: हिमाचल प्रदेशला जाण्यासाठी तुम्हाला दिल्लीवरुन हिमाचलला जाण्यासाठी बस मिळेल. तुम्हाला धर्मशालाला जाण्यासाठीही पर्याय मिळतील.

कार अथवा बसने प्रवास करताना उलटीचा होतो त्रास, ट्राय करा 5 टिप्स

16. अमृतधारा धबधबा (Amritdhara Waterfall)

ADVERTISEMENT

Instagram

छत्तीसगड जिल्ह्यात अमृतधारा धबधबा आहे. निसर्गाने नटलेला असा हा धबधबा आहे. घनदाट जंगलात असलेला हा धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. हिरवळीत नटलेला हा धबधबा तुम्ही वर्षभर कधीही पाहू शकता. पावसाळ्यात हा धबधबा दुथडी भरुन वाहतो. पण तुम्हाला पावसाळ्यात शक्य नसेल तर तुम्ही इतर दिवशीही जाऊ शकता. 

कसे जाल?: छत्तीसगडला जाण्यासाठी तुम्हाला ट्रेन किंवा फ्लाईटचा पर्याय आहे. फ्लाईटने तुम्हाला रायपूरला उतरता येईल. तर ट्रेनने तुम्हाला उदलकाचर किंवा अन्नापूर जंक्शनवरुननही जाता येईल.

17. चुन्नू समर फॉल्स (Chunnu Summer Falls)

ADVERTISEMENT

Instagram

जर तुम्ही दार्जिलिंगला जाण्याचा प्लॅन करणार असाल तर तुम्ही येथील चुन्नू समर फॉल्सला नक्कीच भेट द्यायला हवी. दार्जिलिंग शहरापासूनच काहीच किलोमीटर अतंरावर हा धबधबा आहे. या धबधब्याला उन्हाळ्यात भेट द्यायला हवी. त्यावेळी या धबधब्याचे पाणी वाहते असते. पिकनिकला जाण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. या धबधब्याजवळ रॉक गार्डनही आहे ते पाहण्यासारखे आहे. ही जागा फार मोठी असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मस्त फॅमिली पिकनिक करता येईल. अनेकदा दार्जिलिंगमध्ये गेल्यानंतर या ठिकाणाला भेट दिली जात नाही. पण तुम्ही नक्की या ठिकाणाला भेट द्या.

कसे जाल?: दार्जिलिंगला तुम्ही कोलकातावरुनही प्रवास करु शकता. पण तुम्हाला मजल-दरमजल करतच हा प्रवास करावा लागेल.

18. राजदारी धबधबा (Rajdari Waterfall)

ADVERTISEMENT

Instagram

उत्तरप्रदेशमधील चकाई परिसरात हा धबधबा आहे.या धबधब्यासारखा धबधबा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. या धबधब्याची रचना पूर्णत: वेगळी आहे. हा धबधबा 65 किलोमीटर लांबीचा आहे. या धबधब्याला भेट देण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही सप्टेंबर ते मार्च या कालावधीत या धबधब्याला भेट देऊ शकता.उन्हाळ्यात तुम्हाला या धबधब्याला भेट देताना येथील उन सहन होणार नाही. त्यामुळे तुम्ही या कालावधीत भेट देणे टाळा. 

कसे जाल?: तुम्हाला दिल्लीचा विमान प्रवास करत या ठिकाणी जाता येईल. या शिवाय तुम्ही ट्रेनने सुद्धा जाऊ शकता.

एकटयाने फिरायचे आहे.. मग भारतातील ही ठिकाणं आहेत बेस्ट

ADVERTISEMENT

19. बरकाना धबधबा (Barkana Waterfall – 10th Highest Waterfall In India)

कर्नाटक जिल्ह्यातील शिमोगा या शहरात बरकाना धबधबा आहे. हा देशातील दहाव्या क्रमांकावरील धबधबा असून तो 850 फूटांचा आहे. या ठिकाणी जाण्याचा योग्य काळ हा पावसातील आहे. पण पावसाळ्यात या ठिकाणी जळू असण्याची शक्यता अधिक असते. तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून तुम्ही सोबत मीठ किंवा तंबाखू ठेवा. जर तुम्हाला असे करायचे नसेल तर तुम्ही या ठिकाणी उन्हाळ्यातही जाऊ शकता. 

कसे जाल?: कर्नाटकला जाण्यासाठी तुम्हाला अधिक पर्याय आहेत.शिवाय तुम्हाला या धबधब्याकडे जाण्यासाठी अनेक खासगी गाड्या मिळतील

20. नवरंग धबधबा (Naurang Falls)

Instagram

ADVERTISEMENT

अरुणाचल प्रदेश मधील नवरंग धबधबा हा फारच प्रसिद्ध आहे. हा धबधबा 100 उंचीचा आहे. अरुणाचल प्रदेशमधील जंग शहरापासून हे ठिकाण जवळ आहे. या धबधब्याचे पाणी तवांग नदीला जाऊन मिळते. हा धबधबा अनेकांना अजूनही माहीत नाही. त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात किंवा इतर  वेळी या धबधब्याला भेट देण्यास काहीच हरकत नाही. 

कसे जाल?: अरुणाचल प्रदेशला जाण्यासाठी तुम्ही कोलकाता किंवा गुवाहाटीवरुन प्रवास करु शकता. 

21. पलानी धबधबा (Palani Waterfall)

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे हा धबधबा आहे. 492 फूट उंचीचा हा धबधबा असून या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. तुम्हाला या ठिकाणी नुसताच धबधबा नाही तर रिवर राफटींगचा आनंदही घेता येईल. तुमच्या कुटुंबियांसोबत तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही मार्च दरम्यान गेलात तर तुम्हाला या ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा आनंदही लुटता येईल. येथील धबधब्याचे पाणी विशालकाय असून त्याने कधीही नुकसान करु नये यासाठी त्याची पूजाही केली जाते. 

ADVERTISEMENT

कसे जाल?: दिल्ली, चंदीगढवरुन कुल्लूला जाण्यासाठी अनेक खासगी गाड्या आहेत.

22. गिरा धबधबा (Gira Waterfall)

Instagram

गुजरातमध्ये गिरा हा धबधबा आहे. हा धबधबा गुजरातमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण आहे. हा धबधबा 75 फुट उंच आहे. या धबधब्याचे पाणी अंबिका नदीला मिळते. एखाद्या वीकेंडला तुम्ही या धबधब्याला भेट देऊ शकता. 

ADVERTISEMENT

कसे जाल?: गुजरातला जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही सुरतला ट्रेनने किंवा विमानानेही जाऊ शकता.

23. व्हाईट सर्फ धबधबा (White Surf Waterfall)

Instagram

अंदमान निकोबार बेटावरील हा धबधबा आहे. हट बे टाऊनवरुन हा धबधबा काहीच अंतरावर असून निसर्गाने नटलेले असे हे ठिकाण आहे. स्वच्छ सुंदर आणि निसर्गाने नटलेले असे हे ठिकाण असून तुम्ही अंदमानला जाण्याचा विचार करत असाल तर मग तुम्हाला या धबधब्याला नक्कीच भेट द्यायला हवी. 

ADVERTISEMENT

कसे जाल?: अंदमानला पोहोचल्यानंतर तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती मिळू शकेल. तुम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या मिळतील. 

24. तांबडी धबधबा (Tambdi Waterfall)

Instagram

गोव्यामधील जुना धबधबा म्हणून तांबडी धबधब्याची ओळख आहे. तांबडी धबधबा 13व्या शतकापासून असून या धबधब्याजवळ एक मंदिर आहे. तांबडी सुरला मंदिराला भेट देताना येथील धबधबा पाहिल्याशिवाय लोक अजिबात जात नाही. हा नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला धबधबा असून तुम्ही एकदा तरी येथे जायला हवे. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य काही औरच असते. त

ADVERTISEMENT

कसे जाल?: गोव्यात गेल्यानंतर तांबडी सुरला मंदिराकडे जाण्यासाठी तुम्हाल अगदी सहज एखादे वाहन मिळू शकेल

25. बेअरशोला धबधबा (Bear Shola Waterfall)

Instagram

तामिळनाडूमधील या धबधब्याचे नाव फारच वेगळे आहे असे तुम्हाला वाटेल. कोडाईकानाल धरणापासून अगदी काहीच अंतरावर हा धबधबा आहे. हा धबधबा फारच सुंदर असून तुम्ही या धबधब्याला पावसाळ्यात भेट देऊ शकता. या धबधब्याजवळ हॉटेल्स असून तुम्ही या ठिकाणी राहू शकता. 

ADVERTISEMENT

कसे जाल?: तमिळनाडूला पोहोचल्यानंतर तुम्हाला कोडाईकनालला जाण्यासाठी बरेच पर्याय मिळतील.

धबधब्यांना भेट देण्यापूर्वी घ्या ही काळजी (Waterfall Safety Tips)

धबधब्यांना पाहिल्यांनतर काहींना अगदी मोहच आवरत नाही. मग काय अशा नयनरम्य ठिकाणी नको ते अपघात होतात. तुम्हाला ही टूर अँडव्हेचर वाटत असली तरी तुम्हाला काही काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते पाहुया 

  1. कोणत्याही प्लॅनिंगशिवाय धबधब्याला भेट देऊ नका. 
  2. एखाद्या ठिकाणाची संपूर्ण माहिती नसेल तर तेथे जाण्याचा अति शहाणपणा करु नका. 
  3. फोटो काढायला आवडत असेल तर सुरक्षित जाऊन काढा.
  4. स्थानिकांचे ऐकायला विसरु नका. कारण त्यांना त्याची जास्त माहिती असते. 
  5. धबधब्याचे पाणी वरुन पडत असल्यामुळे ते तुम्हाला जखमी करु शकते.त्यामुळे धबधब्याखाली उभे राहू नका. 
  6. धबधब्याचे पाणी कधीही वाढू शकते त्यामुळे तेथे पोहण्याचा अतिशहाणपणा करु नका. 
  7. मद्यपान किंवा धुम्रपान करणे टाळा. 
  8. लहान मुलांना धबधब्याजवळ नेऊ नका. 
  9. तुमच्या बॅगेत सेफ्टी किट असू द्या. 
  10. उंचावरील धबधब्यांना भेट देताना काळजी घ्या.

तुम्हाला पडले आहेत का हे प्रश्न (FAQs)

भारतात सगळ्यात मोठा धबधबा कुठे आहे?

कर्नाटकातील कुंचीकल धबधबा हा देशातील सगळ्यात मोठा धबधबा आहे. अगुंबे व्हॅलीमध्ये हा धबधबा असून त्याची उंची 1493  फूट इतकी आहे. इतक्या उंचावरुन हा धबधबा कोसळत असल्यामुळेच त्याचे सौंदर्य आहे. या ठिकाणी तुम्हाला नुसताच धबधबा नाही तर तुम्हाला निसर्गाचाही आनंद घेता येईल. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतील.

देशातील सगळ्यात सुंदर धबधबा कोणता ?

देशात अनेक सुंदर धबधबे आहेत. प्रत्येक राज्यात एक सुंदर धबधबा आहे. दुधसागर धबधबा, जोग धबधबा,आथीरापिल्ली धबधबा अशी काही धबधब्यांची नावे आहे. तुमच्यासाठी आम्ही 25 बेस्ट धबधब्यांची यादी काढली आहे.

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

19 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT