सकाळी उठल्यावर बघत असाल मोबाईल, तर वेळीच व्हा सावध!

सकाळी उठल्यावर बघत असाल मोबाईल, तर वेळीच व्हा सावध!

पूर्वी सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवाचं अथवा आई - बाबांचं दर्शन करण्याची पद्धत होती. पण आता आपल्यापैकी प्रत्येक जण सर्वात पहिले दर्शन घेतो ते म्हणजे आपल्या मुख्य देवाचं अर्थात मोबाईलचं. मोबाईलशिवाय आपलं पान हलत नाही. डोळे उघडल्यावर सर्वात पहिले आपण हातात घेतो तो मोबाईल आणि ही सवय हल्ली प्रत्येकालाच असते. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच चांगली नाही. त्यामुळे वेळीच ही सवय तुम्ही मोडायला हवी. पण उठून मोबाईल घेत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचे नक्की दुष्परिणाम काय आहेत हे माहीत नसतं. पण आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. सध्या उठल्या उठल्या मोबाईल हाताळणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याचं एका अभ्यासक्रमानुसारदेखील सिद्ध झालं आहे. पण ही सवय तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट ठरू शकते. पाहूया याचे दुष्परिणाम नक्की काय आहेत. 

1. दिवसभर जाणवतो तणाव

Shutterstock

सकाळी सकाळी डोळे उघडल्यानंतर आपण जेव्हा सर्वात पहिले मोबाईल बघतो तेव्हा मोबाईलचा प्रकाश एकदम डोळ्यात जातो. जे तुमच्या डोळ्यांसाठी अजिबातच चांगलं नाही. त्यामुळे दिवसभर सुरळीत काम करणं कठीण होतं. त्याशिवाय यामुळे दिवसभर तणाव जाणवतो. डोकं जड राहतं. त्यामुळे तुमचं डोकं जर दिवसभर दुखत असेल तर त्याचं मुख्य कारण हे उठल्या उठल्या मोबाईल बघणं आहे. त्यामुळे हे शक्यतो टाळा. जेणेकरून तुम्ही दिवसभर फ्रेश राहू शकाल. यापेक्षा तुम्ही सकाळी लवकर उठून चालायला जाणं फायदेशीर ठरतं

2. कार्यक्षमतेवर पडतो प्रभाव

तुम्ही सकाळी उठल्यानंतर मोबाईलवरील विविध नोटिफिकेशन्स पाहता. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या चांगल्या वाईट गोष्टीही असतात. त्यामुळे जर एखादी वाईट बाब असेल तर दिवसभर तुमच्या मनावर त्याची छाप राहते आणि दिवसभर तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत राहाता. त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर प्रभाव त्या गोष्टीचा प्रभाव पडतो. तुम्ही दिवसभर एकाच विचारात राहिल्याने तुमचं तुमच्या रोजच्या कामातदेखील लक्ष लागत नाही.

टेक्नोलॉजीचे साईड ईफेक्ट्स टाळण्यासाठी घ्या ही काळजी

3. रक्तदाब वाढण्यासही ठरतं कारणीभूत

Shutterstock

सकाळी उठल्यानंतर नेहमी चांगला विचार करावा असं आपल्याला नेहमीच सांगण्यात येतं. पण उठल्या उठल्या मोबाईल पाहिल्यानंतर सकाळीच समोर कोणती गोष्ट दिसेल हे तुम्हाला कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जर एखादी तुम्हाला त्रासदायक असणारी गोष्ट दिसली तर तुमचा रक्तदाब वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एका अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे. दिवसभर कामाचा आणि इतर गोष्टींचा ताण आणि त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या मोबाईलमधून अशा गोष्टी दिसल्यानंतर त्याचा सर्वप्रथम परिणाम हा तुमच्या मनावर होऊन तुमचा रक्तदाब वाढतो. याशिवाय अन्य आजारांनाही आमंत्रण मिळतं. 

मूळ चार्जर देखील वाचा

4. भूतकाळात रमतं मन

मोबाईल पाहिल्यानंतर काही भूतकाळातील आठवणीदेखील समोर येत असतात. अशावेळी बरीच माणसं ही वर्तमानात न जगता मागील दिवसांच्या गोष्टी वाचत भूतकाळात जातो.  त्यामुळे काही प्रमाणात त्रासही होतो आणि त्यामुळे वर्तमानात चालू असणाऱ्या कामांवर परिणाम होतो. त्यामुळे वर्तमान स्थिती मन व्यवस्थित लावण्यास तुम्ही सक्षम ठरत नाही. हा त्याचा महत्त्वाचा दुष्परिणाम आहे. 

मोबाईलची Battery संपली तर पटकन Charge करण्याच्या टिप्स

5. डोळ्यांना होतो त्रास

Shutterstock

सकाळीच उठल्यानंतर मोबाईलचा प्रखर प्रकाश डोळ्यात जातो.  त्यामुळे तुमच्या बुब्बुळांनाही जास्त प्रमाणात त्रास होतो. शिवाय डोळे दिवसभर त्यामुळे चुरचुरत राहातात. यासाठी कोणताही दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ही सवय वेळीच बदलण्याची गरज आहे. 

तुमचे त्रास तुम्ही स्वतःच कमी करू शकता. उठल्यानंतर मोबाईल हातात न घेता तोंड धुऊन झाल्यानंतर योग अथवा मेडिटेशन करून तुम्ही या त्रासापासून सुटका मिळवू शकता. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि स्वतःच स्वतःची योग्यरित्या काळजी घ्या.

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सूटदेखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.