कोरिओग्राफर रेमो डिसूझा अडकला तिसऱ्यांदा विवाहबंधनात

कोरिओग्राफर रेमो डिसूझा अडकला तिसऱ्यांदा विवाहबंधनात

बॉलीवूड कोरिओग्राफर रेमो डिसूझा तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना नक्कीच मोठा धक्का बसला आहे. मात्र हा धक्का सुखद आहे. कारण त्याने त्याची पत्नी लिजेल हिच्याशीच तिसऱ्यांदा पुन्हा विवाह केला आहे. रेमो आणि लिजेलच्या लग्नाला नुकतीच वीस वर्षे पुर्ण झाली आहेत आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी रेमोने लिजेलसोबत पुन्हा एकदा लग्न केलं आहे. ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या वीस वर्षांचा सहवास आणि आनंद नक्कीच त्रिगुणीत झाला आहे.  रेमोने हा विवाह त्याच्या आणि लिजेलच्या कुटुंबासोबत आणि काही खास मित्रमंडळींच्या साक्षीने केला आहे. या लग्नासाठी बॉलीवूडमधील काही खास मंडळी आवर्जून उपस्थित होती. ज्यामध्ये त्याचा वरूण धवन आणि श्रद्धा कपूर खास आमंत्रित होते. रेमोने त्याच्या लग्नसोहळ्याची काही क्षणचित्रं चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. 

अभिनेता वरूणने दिल्या खास शुभेच्छा

रेमो आणि लिजेलचा हा खास विवाह ख्रिश्चन पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये अगदी जवळचे नातेवाईक आणि खास बॉलीवूड मित्रमंडळी उपस्थित होतील. वरूण धवन आणि श्रद्धा कपूर रेमोच्या आगामी चित्रपटातून म्हणजेच स्ट्रीट डान्सर थ्रीडी या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. वरूणने रेमोच्या लग्नसोहळ्याचे काही खास फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यासोबत त्याने एक मजेशीर कॅप्शनदेखील दिलं आहे. " रेमो डिसूझा आणि लिझेल रेमो डिसूझा तुम्हाला तिसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा...लोकांना इथे एकदा लग्न करता  येत नाही आणि तुम्ही तीन वेळा करून दाखवलं. मला वाटतं तीन हा लकी नंबर आहे."

स्ट्रीट डान्स 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार

रेमो डिसूझाच्या एबीसीडीचा सिक्वल म्हणजेच 'स्ट्रीट डान्सर' लवकरच प्रदर्शित होणार आहे. रेमोच्या 'एबीसीडी' या चित्रपटाचा हा तिसरा भाग असणार आहे. यापूर्वी 'एबीसीडी' आणि 'एबीसीडी 2'  या चित्रपटांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. रेमोचे हे तिन्ही चित्रपट डान्स बेस्ड चित्रपट आहेत. एबीसीडी आणि एबीसीडी 2 या दोन्ही चित्रपटांमध्ये वरूण धवन आणि श्रद्धा कपूर ही जोडी झळकली होती. रेमोने दिग्दर्शित केलेला एबीसीडी हा पहिलाच थ्रीडी चित्रपट होता. आता स्ट्रिट डान्सर मध्येही आता वरूण आणि श्रद्धा ही लोकप्रिय जोडी एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं #rulebreakers असं हॅशटॅग आहे. यावरून वरूण आणि श्रद्धा या चित्रपटात डान्स फ्लोअरवर रुल ब्रेक करताना दिसणार असण्याची शक्यता आहे. स्ट्रिट डान्सर या वर्षी 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

स्ट्रीट डान्सर्स करणार डान्स फ्लोअरवर मस्ती

स्ट्रीट डान्सरमध्ये वरूण एका पंजाबी तरुणाची भूमिका निभावणार आहे तर श्रद्धा कपूर पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय प्रभू देवा आणि नोरा फतेही यांच्यादेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.  या चित्रपटात एबीसीडीमधील 'बेगुनाह' हे लोकप्रिय गाणं पुन्हा रिक्रिएट केलं जाणार असल्याची देखील चर्चा आहे. यापूर्वीच्या रेमोच्या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळालं असल्याने आता 'स्ट्रीट डान्सर' बाबतदेखील प्रेक्षकांच्या मनात प्रंचड उस्तुकता निर्माण झाली आहे.

फोटोसौैजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

'The Kapil Sharma show' मध्ये पुन्हा येणार का नवज्योत सिंह सिद्धू

माझ्यापासून 5 पावलं दूर उभे राहा.. आलियाने दिला दम

शाहिदची बायको Mira Rajput पण करणार का बॉलीवूडमध्ये एंट्री?