कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस (Curry Leaves For Hair Mask In Marathi)

Curry Leaves For Hair Mask In Marathi

आपल्या रोजच्या जेवणात कढीपत्त्याची फोडणी तर आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडते. कढीपत्त्याचा जेवणातील वापर तर सर्वांनाच परिचयाचा आहे. पण कढीपत्ता आपल्या सौंदर्यासाठीही तितकाच लाभदायक आहे असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पटेल का? पण हे खरं आहे. कढीपत्त्यामध्ये विटामिन सी, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस असे अनेक गुण आढळतात. हे गुणधर्म तुमची त्वचा आणि केस यासाठी फायदेशीर ठरत असतात. केसांच्या आपल्याला अनेक समस्या असतात. अशा समस्यांवर कढीपत्त्याचा हेअर मास्क हे उत्तम उपाय आहे. आपण पाहूया कढीपत्त्यांचे कशा प्रकारे केसांसाठी मास्क बनवू शकता. 

प्रोटीन करतं केसांना मजबूत (Protein Strengthens The Hair)

Shutterstock

कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या केसांना अधिक मॉईस्चराईज करतात आणि डेड स्किन सेल्स काढण्यासाठीही याची मदत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कढीपत्त्यामध्ये प्रोटीन आणि बीटा - कॅरोटिन असतं. यामुळे केस अधिक जाड आणि मजबूत होण्यास मदत मिळते. कढीपत्त्याचे बरेच फायदे आहेत.

कसा बनवावा हेअर मास्क

 • कढीपत्त्याची पानं धुवून वाळवून त्याची पेस्ट करावी
 • ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांना लावा
 • साधारण अर्धा तास झाल्यानंतर केस धुवा
 • आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग केल्यास तुमचे केस मजबूत होण्यास मदत होते

केसगळती रोखण्यास होते मदत (Helps To Prevent Hair Loss)

Shutterstock

केसगळती ही आजकालची सर्वात मोठी समस्या आहे. यावर आपण अनेक उपाय करून बघत असतो. वेगवेगळे शँपूही वापरतो. पण तुम्ही कढीपत्त्याचा उपायदेखील एकदा करून पाहा. कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट्समुळे केसांची वाढ होण्यास मदत होऊन केसगळती थांबण्यासदेखील मदत होते. 

कसा बनवावा हेअर मास्क

 • मूठभर कढीपत्त्याची पानं 2-3 चमचे नारळाच्या तेलात मिक्स करावी
 • पानं काळी होईपर्यंत हे मिश्रण गरम करावं
 • हे मिश्रण गार झाल्यावर केसांच्या मुळांवर या तेलाने मालिश करावी
 • अर्धा तास हे तसंच राहू द्यावं आणि नंतर केस धुवावे
 • आठवड्यातून तुम्ही हा प्रयोग साधारण दोन वेळा करू शकता

केसगळती कशी रोखावी

पांढऱ्या केसांसाठी (For White Hair)

Shutterstock

आजकालच्या लाईफस्टाईलमुळे कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. त्यासाठी हल्ली बरेचदा सगळेकडे केमिकल्स असणाऱ्या रंगांचा केस रंगवण्यासाठी उपयोग करतात. पण त्याऐवजी तुम्ही पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी घरगुती कढीपत्त्याचा हेअर मास्क बनवून उपाय करू शकता. याचा उपयोग करणंदेखील सोपं आहे. 

कसा बनवावा हेअर मास्क

 • कढीपत्त्याची पानं आणि दही वाटी मिक्सरमधून वाटून घ्यावं
 • या पेस्टने स्काल्पवर मसाज करावं
 • त्यानंतर केसांंनाही लावावं
 • अर्धा तास हे मिश्रण तसंच लावून ठेवावं आणि नंतर केस धुवावे
 • आठवड्यातून हा प्रयोग तुम्ही दोन वेळा करू शकता

पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय

केसांना मिळते चमक (Hair Gets Shine)

Shutterstock

केसांना चमक मिळवून देण्यासाठीही कढीपत्त्याचा उपयोग होतो. कढीपत्त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स तुमच्या केसांना अधिक चमक मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरतात. तसंच केसांना दुहेरी होण्यापासूनदेखील वाचवतात. तुम्हाला इतर कोणत्याही केमिकलयुक्त कंडिशनर अथवा शँपूची मदत न घेता कढीपत्त्याच्या नैसर्गिक उपायाने तुम्ही केसांची चमक परत मिळवू शकता. 

कसा बनवावा हेअर मास्क

 • कढीपत्त्याची पानं धुवून वाळवून त्याची पेस्ट करावी
 • त्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही लिंबाचा रसदेखील मिसळू शकता
 • हे मिश्रण केसांना लावा आणि किमान अर्धा तास तसंच ठेवा
 • तुमच्या केसांना चमक आलेली तुम्हाला दिसून येईल
 • आठवड्यातून हा प्रयोग तुम्ही दोन वेळा नक्कीच करू शकता

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या  https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.