DIY: नॅचरल ग्लोसाठी मसूर डाळीने घरीच तयार करा हे फेसपॅक

DIY: नॅचरल ग्लोसाठी मसूर डाळीने घरीच तयार करा हे फेसपॅक

मसूर डाळीचा वापर स्वयंपाकात भाजी अथवा डाळ करण्यासाठी केला जातो. मसूर डाळीपासून तयार केलेली दाल मखनी अतिशय चविष्ट लागते.  मसूर डाळ आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. कारण या डाळीत फॉफ्सरस, लोह, सोडियम, पोटॅशियम, सल्फर, झिंक, कॉपर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं. मात्र एवढंच नाही तर मसूरची डाळ तुमच्या त्वचेसाठीदेखील अतिशय गुणकारी आहे. पुर्वीच्या काळापासून मसूर डाळीचा वापर त्वचेवर सौंदर्यप्रसाधनाप्रमाणे केला जातो. यासाठीच मसूर डाळ वापरून तयार केलेले फेसपॅक तयार करा आणि यंदाची दिवाळी खास करा. 

मसूर डाळीच्या पीठाचे सौंदर्य फायदे

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो

मसूर डाळीने तुमच्या चेहऱ्यावर इंन्स्टंट आणि नैसर्गिक ग्लो येतो. बऱ्याचदा वातावरणातील बदल आणि धुळीचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचा काळंवडते. मात्र अशा त्वचेला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तुम्ही मसूर डाळीचा वापर करू शकता. 

काय कराल -

 • मसूर डाळ जाडसर वाटून घ्या
 • एका भांड्यात वाटलेल्या डाळीचे पीठ आणि  चिमुटभर हळद घ्या. 
 • गुलाबपाण्याच्या मदतीने एक फेसपॅक तयार करा
 • चेहऱ्यावर हा पॅक लावा
 • दहा मिनीटांनी सुकल्यावर हलक्या हाताने एखाद्या स्क्रबप्रमाणे हळुवार मसाज करत तो काढून टाका.
 • कोमट पाण्याने  चेहरा धुवा. 
 • नियमित आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास सुरूवात होईल.
Shutterstock

त्वचेचा कोरडेपणा कमी होतो

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर ती लवकर निस्तेज दिसू लागते. शिवाय कोरड्या त्वचेवर एजिंगच्या खुणा फार लवकर दिसतात. यासाठी तुमच्या कोरड्या त्वचेला मऊ आणि  मुलायम करण्यासाठी मसूर डाळीचा वापर करा.

काय कराल -

 • रात्रभर अर्धी वाटी मसूर डाळ पाण्यात भिजत ठेवा.
 • सकाळी भिजलेल्या डाळीतील पाणी निथळून काढून टाका.
 • मिक्सरमध्ये डाळ, चिमुटभर हळद आणि दूध यांची जाडसर पेस्ट तयार करा. 
 • वाटलेल्या मिश्रणात बदामाचे काही थेंब आणि ग्लिसरीन मिसळून एक पॅक तयार करा.

सनटॅन कमी होते

हिवाळा असो वा उन्हाळा अती सुर्यप्रकाशात  फिरल्यामुळे तुमच्या त्वचेवर टॅनिंग दिसू लागते. यासाठी त्वचेची काळजी सतत घ्यायसास हवी. मसूर डाळीमुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंगचे डाग कमी होऊ शकतात. 

काय कराल -

 • एका वाटीत मसूर डाळीचे पीठ घ्या
 • मसूर डाळीच्या पीठात गाजराचा रस मिसळा आणि फेसपॅक तयार करा. 
 • चेहऱ्यावर हा पॅक लावा आणि दहा ते वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.
 • चेहरा, मान आणि हात-पायाच्या त्वचेवर हा पॅक लावा आणि दहा ते वीस मिनीटांनी सुकल्यावर तो काढून कोमट पाण्याने चेहरा आणि हात-पाय धुवून टाका.
 • हिवाळ्यात हा उपाय कमीत कमी महिन्यातून दोन ते तीन वेळा जरूर करा.
Shutterstock

पिंपल्स कमी करण्यासाठी

तेलकट त्वचा असेल तर तुम्हाला एक्नेचा त्रास वारंवार जाणवतो. चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर चेहऱ्याची सतत काळजी घ्यावी लागते. मसूर डाळीमुळे तुमचे एक्ने हळूहळू कमी होऊ शकतात. 

काय कराल -

 • मुलतानी माती, चंदन पावडर. आणि मसूर डाळ समप्रमाणात घ्या. 
 • गुलाबपाण्याच्या मदतीने एक छान फेसपॅक तयार करा
 • चेहऱ्यावर हा फेसपॅक लावा आणि चेहरा दहा मिनीटांनी धुवून टाका. 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

नखांशिवाय नेलपेंटचा असाही होऊ शकतो वापर

गुलाबपाणी... त्वचा आणि केसांचं सौदर्य खुलवणारा नैसर्गिक उपाय!

ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा